Health

जाणून घ्या सफरचंद खाण्याचे फायदे आणि तोटे

अँन अँपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे ही म्हण.आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एप्पल म्हणजे सफरचंद या फळाचे गुणधर्म व फायदे इतके जास्त आहेत  त्यावरूनच ही म्हण रूढ झाली आहे. जगभरातील सर्व देश ,प्रांत व निरनिराळ्या वयोगटात  सफरचंद आवडीने खाल्ले जाते .आज आपण सफरचंद या फळाविषयी जाणून घेणार आहोत.

१) सफरचंद या फळामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा भरलेली असते .एका मध्यम आकाराच्या सफरचंद मधून 95 ग्राम इतक्या कॅलरीज शरीरात जातात.तंतुमय पदार्थ ,नैसर्गिक शर्करा ,फँट,कार्बोहाइड्रेट ,प्रथिने,पाणी इत्यादी सर्वच घटकांचा समावेश सफरचंदामध्ये असतो त्यामुळे ते एक प्रकारचे सर्वसमावेशक फळ बनते.

२) वजन कमी करण्यासाठी जर आपण डाएट करत असाल तर सफरचंद हे फळ डाएटसाठी अगदी उत्तम पर्याय आहे .या फळांमध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात व कर्बोदके आणि अन्य तंतुजन्य पदार्थांचा व प्रथिनांचा भरपूर प्रमाणात समावेश या फळामध्ये असल्यामुळे पोट भरते व फार जास्त अतिरिक्त खाण्याची इच्छा निर्माण होत नाही .या फळामधील सर्वच पौष्टिक घटकांचे सेवन केल्यामुळे डायट करूनही शरीराला कोणत्याही पोषक मूल्यांचा अभाव जाणवत नाही .जर आपण आधीपासूनच सडपातळ असाल तरीही सफरचंदाचे सेवन करणे फायदेशीर असते कारण यामुळे अशक्तपणान जाणवता, कंटाळा न येता शरीराला स्फूर्ती मिळते.

३) सफरचंद खाण्याचा एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे हृदयाशी निगडित आजार बळावण्यापासून बचाव होतो. सफरचंदामध्ये विघटन होऊ शकणारे तंतू जन्य पदार्थ असल्यामुळे कोलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण कमी होण्यास मदत होते व परिणामी हृदय रोगांना आमंत्रण देण्यापासून रोखले जाते.

४) सफरचंदामध्ये अस्तित्वात असलेल्या एपिकेचिन या घटकामुळे शरीरातील रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित राखले जाते .तसेच हृदयविकाराचा झटकाही येण्यापासून काळजी घेण्यासाठी नियमित सफरचंदाचे सेवन करावे.

५) सफरचंदाचे सेवन करणे हे टाईप टू चा मधुमेहापासून बचाव करण्यासाठी सहाय्यकारी ठरते. सफरचंदाचे सेवन केल्यामुळे 100% नाही मात्र 28 ते 30 टक्के इतक्‍या प्रमाणात मधुमेहाला दूर राखण्यातत यश मिळू शकते यासाठी दररोज सफरचंदाचे सेवन करावे असे नाही तर आठवड्यातून दोन-तीन वेळा जरी ह्याचे सेवन केले तरी ह्याचे फायदे होऊ शकतात.

६) सफरचंदामध्ये पाणी व अन्य तंतुजन्य पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे सफरचंद खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते व त्यामुळेच अतिरिक्त खाण्याचे किंवा बिंज  इटिंगचे प्रमाण घटते.

७) सफरचंदाचे सेवन हा एकमेव उपाय कोणत्याही आजारावर होऊ शकत नाही मात्र यामुळे कोणताही विशिष्ट आजार शरीरामध्ये फैलावण्यापासून निश्चितच काही प्रमाणात आळा घातला जाऊ शकतो. तसेच सफरचंदामध्ये असलेले फ्लेवेनाँइड  या घटकामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये पसरण्यापासून साधारण 20 टक्के इतक्‍या प्रमाणात संरक्षण मिळू शकते.

8) पचनसंस्थेशी निगडीत आजारांमध्ये सुद्धा सफरचंद अतिशय प्रभावी उपाय ठरू शकते.जुलाब किंवा बद्धकोष्ठता या विकारांवर सफरचंदाच्या सेवनाने आराम मिळू शकतो.
9) सफरचंदामध्ये निरनिराळे अंडी ऑक्सीडेंट असतात ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत होते.
10) सफरचंदाचे नियमित सेवन केल्यामुळे अस्थमाचा अँटँक येण्यापासूनही बचाव होतो. सफरचंदाच्या सालीमध्ये असलेल्या क्युसेरिटिनमुळे होणारी जळजळ व अँलर्जीपासून संरक्षण मिळते.
11) सफरचंदाच्या सेवनामुळे शरीरातील हाडांचे आरोग्य चांगले राखले जाते.सफरचंदामुळे हाडांची डेन्सिटी कायम राखली जाते व कॅल्शियमचे प्रमाणही शरीरामध्ये योग्य त्या प्रमाणात असते.

सफरचंदाच्या पौष्टिकतेमुळे आपल्या शरीराला निश्चितच खूप फायदे आहेत मात्र सफरचंदाच्या अतिरिक्त सेवनामुळे काही दुष्परिणामही आपल्या शरीराला जाणवू शकतात. सफरचंदा मुळे शरीराला होणारे काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेतः
1) सफरचंद हे फळ फायदेशीर आहे मात्र काही प्रकृतीच्या व्यक्तींना सफरचंदाच्या खाण्यामुळे अँलर्जी किंवा तत्सम समस्या उद्भवू शकतात .जर एखाद्या व्यक्तीला बोर ,बदाम ,स्ट्रॉबेरीइत्यादीच्या सेवनामुळे काही ॲलर्जी होत असेल तर अशा व्यक्तीने सफरचंदाचे सेवन करण्याअगोदर निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे .
2) वजन कमी करण्यात सफरचंद प्रभावी भूमिका बजावते मात्र अतिरिक्त प्रमाणामध्ये सफरचंदाचे सेवन केले असता वजन वाढण्याचा धोका सुद्धा आहे.दिवसात एक सफरचंद सेवन करणे हे पुरेसे आणि उपयुक्त ठरते.