…म्हणून दुपारच्या वेळी झोप घेणे आहे फायदेशीर: : भाग २

…म्हणून दुपारच्या वेळी झोप घेणे आहे फायदेशीर: भाग १

7) ज्यावेळी खूपदा थकवा आल्यासारखे जाणवते अशा वेळी काही जण चहा किंवा कॉफी अशा कॅफेन युक्त पदार्थांचा अवलंब झोप दूर करण्यासाठी करतात. चहा किंवा काँफीचे सेवन करण्याऐवजी दहा ते पंधरा मिनिटांची डुलकी घेतली असता शरीर पुन्हा एकदा नवीन काही शिकण्यासाठी तयार झालेले असते याउलट कँफेन हे निश्चितच शरीराला हानिकारक आहे.

8) दुपारपर्यंत आपल्या दैनंदिन आयुष्यातील जो काही तणाव निर्माण झालेला असतो तो साधारण तीस मिनिटे इतक्या कालावधीच्या वामकुक्षीने अगदी सहजपणे दूर करता येऊ शकतो असे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

9) वामकुक्षी घेतल्यानंतर आपल्या मेंदूमधील कल्पना शक्तीला चालना देणारा भाग अधिक सक्रियपणे कार्य करतो असे दिसून आले आहे कारण कल्पनाशक्तीचा परस्परसंबंध हा झोपेनंतर तणाव विरहीत मेंदूशी नेहमीच जोडला गेलेला आहे.

10) ज्येष्ठांमध्ये दुपारच्या वेळी घेतली गेलेली वामकुक्षी ही रात्रीच्या झोपेसाठी खूप हितकारक ठरते असेही सांगितले जाते.दुपारच्यावेळी साधारण एक ते तीनच्या दरम्यान तीस मिनिटे इतका वेळ वामकुक्षी घेतली असता व त्याला संध्याकाळच्या वेळी हलकासा व्यायाम किंवा चालण्याच्या व्यायामाची जोड दिली तर रात्रीच्या वेळी निद्रानाश यासारख्या समस्या उद्भवत नाही.

11) एक ते आठ वर्षांच्या मुलांमध्ये दुपारच्या वेळी झोप घेणे हे एकंदरीतच शरीराच्या अवयवांचे आणि मेंदूशी निगडीत कार्यांचे विकासाचा होण्यासाठी खूप आवश्यक असते.दुपारच्या वेळी झोप घेणाऱ्या लहान मुलांमध्ये माहिती संग्रहित करण्याची व लक्षात ठेवण्याची क्षमता ही दुपारच्यावेळी झोप न येणाऱ्या मुलांपेक्षा अधिक असल्याचे जाणवते.