Home » खुर्चीवर बसूनही तुम्ही करू शकता वजन कमी, हे ‘३’ व्यायाम ठरतील अत्यंत फायदेशीर…!
Health

खुर्चीवर बसूनही तुम्ही करू शकता वजन कमी, हे ‘३’ व्यायाम ठरतील अत्यंत फायदेशीर…!

बैठे काम करणा-या व्यक्तींच्या बाबतीत स्थूलपणा सारख्या समस्या निर्माण होतात.कामाच्या व्यस्त वेळापत्रकात व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही अशी बहुतेक जणांची तक्रार असते. मात्र अगदी बसल्या बसल्या खुर्चीवर सुद्धा व्यायाम करणे शक्य होते असे सांगितले तर निश्चितच आश्चर्य वाटेल. आज आपण अशाच काही व्यायामप्रकारांबद्दल आपण जाणून घेऊया.

1) आपल्या कामाच्या ठिकाणी खुर्चीवर बसलेले असताना खुर्चीवर हातांच्या आधारावर वरती व्हावे यामुळे आपल्या पाठीपासून ९० अंशाचा कोन तयार झालेला दिसतो. या व्यायाम प्रकाराला हॅंगिग बॉडी असेही म्हटले जाते.

2) आपल्या खांदे आणि छातीच्या व्यायामांद्वारे शरीर हलके करता येते. यासाठी खुर्चीवर बसले असता आपले हात मांड्यांवर ठेवून खांदे मागे ओढावेत व छाती पुढे घ्यावी.

3) खुर्चीवर बसून शरीराला ताण देऊन स्नायू मोकळे करण्याचा व्यायाम करता येऊ शकतो. यासाठी स्ट्रेचिंग हा व्यायाम केला जातो. आपला डावा हात खुर्चीवर बसून उजव्या हाताच्या साहाय्याने स्ट्रेच करावा.हाच व्यायाम पायांच्या बाबतही करता येऊ शकतो.