Health

टाळ्या वाजवल्यामुळे होतात हे आजार दूर. फायदे बघून व्हाल चकित

टाळ्या वाजवल्यामुळे होतात हे आजार दूर. जाणून घ्या महत्वाची माहिती

आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकदा टाळ्या वाजवण्याचा सल्ला दिला जातो. टाळया वाचवण्याचे अनेक फायदे आध्यात्मिकदृष्ट्या तसेच शास्त्रीयदृष्ट्यादेखील सांगितले जातात. मात्र आजार ठीक करण्यासाठीदेखील ही प्रक्रिया कामी येते का? असे केल्यास आजार कसे ठीक होतात? याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण याविषयी माहिती घेणार आहोत.

टाळ्या वाजवणे हा एक्यूप्रेशर थेरपीचा प्रकार असल्याचे सांगितले जाते. ऍक्युप्रेशर थेरपीमध्ये शरीरातील विविध भागातील बिंदूंवर दाब देऊन शरीरातील व्याधी ठीक केल्या जातात. शरीरातील वेगवेगळ्या भागांत असलेल्या या बिंदूंना सांकेतिक क्रमांक देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कोणत्या वेळी कोणत्या बिंदूवर दाब द्यायचा याविषयी व्याधीनुसार ठरवले जाते.

टाळी वाजवत असताना 29 ऍक्युप्रेशर बिंदूंवर दबाव पडतो. टाळ्या वाजवताना तळहात लाल होतात. यामुळे शरीरात एकप्रकारचे बल निर्माण होते. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत सुरु होतो. तसेच श्वासोच्छवास जलदगतीने झाल्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे शरीरात एकप्रकारची ऊर्जा भरली जाऊन स्फूर्ती मिळते.

दररोज टाळ्या वाजवण्याचा व्यायाम केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी तसेच त्यांच्या संवर्धनासाठी टाळ्या वाजवणे हितावह आहे. टाळ्या वाजवल्यामुळे पूर्ण शरीरात एकप्रकारचे कंपनं निर्माण होतात. यामुळे वात आणि पित्त यांचे संतुलन राहते.

टाळ्या वाजवण्यामुळे सर्वांत जास्त फायदा होतो तो शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी. शरीरातील धमन्या आणि शिरांमधील घाण तसेच गाठी दूर होण्यास यामुळे मदत होते. शरीरातील अनेक मांसपेशीदेखील या व्यायामामुळे सक्रिय होतात. शरीराला एकप्रकारे नवीन ऊर्जा देण्याचं काम हा व्यायामप्रकार करतो.

(Disclaimer : ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नसून, ही माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. यामध्ये सांगितलेले उपचार किंवा सल्ला अंमलात आणण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)