Home » रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत लवंगचे सेवन केले तर मिळतात हे फायदे,जाणून घ्या…
Health

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत लवंगचे सेवन केले तर मिळतात हे फायदे,जाणून घ्या…

भारतीय आहारामध्ये मसाल्यांचे खूपच महत्व आहे.भारतीय मसाल्यांमध्ये ओवा,जिरा,दगडफूल,तमाल पत्र,लवंगा,काळी मिरी,दालचिनी यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो.लवंगला भारतीय पदार्थांमध्ये खूपच महत्त्व आहे.लवंग केवळ पदार्थांच्या चवी मध्येच भर घालत नाही तर हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूपच हितकारी असते.लवंगचे खूप औषधी फायदे असतात.

लवंगचे आरोग्यासाठी चे फायदे हे संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झाले आहेत.पोट दुखी,दात दुखी,सर्दी,खोकला यांसारख्या आजारांवर लवंग खूपच गुणकारी मानले जाते.लवंग अपचनासारख्या आजारांमध्ये सुद्धा खूपच उपायकारक असते.रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विटामिन-ई,विटामिन-सी,फोलेट,रिबोफ्लेविन,विटामिन-ए,थियमिन,विटामिन-डी,ओमेगा 3 फैटी एसिड उपयुक्त घटकांचा लवंग यामध्ये समावेश असतो. या व्यतिरिक्त लवंगमध्ये एंट्री इनफ्लेमेटरी तत्व सुद्धा असतात.

लवंग खाण्याचे आपल्या शरीराला इतके जास्त फायदे असले तरीही लवंग खाण्याची सुद्धा एक योग्य अशी पद्धत असते.आज आपण लवंग खाण्याची योग्य पद्धत याबद्दल जाणून घेणार आहोत...

१) रात्रीच्या जेवणानंतर एक ते दोन लवंग गरम किंवा कोमट पाण्यासोबत सेवन केले असता आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात व विविध प्रकारच्या आजारांवर उपाय केले जातात.

२) जेवणानंतर कोमट पाण्यासोबत लवंगचे सेवन केले असता डायरिया,अपचन,बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात.

३) लवंगमध्ये अँटिऑक्सिडंट आणि एंटीबॅक्टरियल गुणधर्म असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी लवंगचे सेवन केले असता तारुण्यपीटिका आणि चेहऱ्यावरील डागांचे समस्या दूर होतात.

४) दातांच्या समस्यांवर लवंग खूपच प्रभावी ठरते. रात्रीच्या जेवणानंतर  दोन लहान लवंग कोमट पाण्यासोबत चावून सेवन केले असता दातांचे दुखणे दूर होते.

५) तुम्हाला खोकला आणि घशाच्या दुखण्याच्या समस्या निर्माण होत असतील तर रात्रीच्या वेळी लवंगचे सेवन केले असता या समस्येपासून आराम मिळतो.

६) तुमच्या हातात पायांमध्ये अनियमित हालचाली जाणवत असतील कंपन होत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे गरम पाण्यासोबत लवंगचे सेवन केले असता या दुखण्यापासून  मुक्तता मिळू शकते.

७) रात्रीच्या वेळी लवंगचे नियमितपणे सेवन केले असता रोगप्रतिकारक्षमता वेगाने वाढते. अनेक क्लिष्ट आजारांपासून सुद्धा ब्राँकायटिस यांसारख्या समस्यांपासून लवंगचे सेवन केले असता आराम मिळतो.

८) रात्रीच्या जेवणानंतर दोन ते तीन लवंगचे सेवन केल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते व हाडांचा विकास होतो.

९) मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा लवंग हे एक उत्तम पर्याय आहे.लवंगच्या सेवनामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखली जाते.