जिरे खाण्याचे 15 फायदे जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील, १४ वा फायदा आहे सर्वांसाठी महत्वपूर्ण

भारतीय आहार शास्त्राने भारतीयांच्या आहारामध्ये सामाविष्ट केलेले पदार्थ हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने जाणीवपूर्वक केलेले आहेत.भारतीय आहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या निरनिराळ्या घटक पदार्थांमधून शरीराला स्वाद व चवी सोबत अनेक आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे फायदे सुद्धा मिळतात. भारतीय आहारामध्ये मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतातील कोणत्याही प्रदेशातील पदार्थ हे जि-याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

जिरे मोहरीची फोडणी ही जणू काही भारतीय अन्नपदार्थांचा अविभाज्य भाग आहे .जिरे यामुळे पदार्थाला उत्तम अशी चव तर मिळतेच पण याव्यतिरिक्त जि-याच्या सेवनाचे आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे आहेत.जिऱ्याचे सफेद जिरे ,काळे जीरे, शहाजिरे असे तीन प्रमुख प्रकार आहेत. या तीनही प्रकारच्या जि-यांचे गुणधर्म हे थोड्याबहुत फरकाने साधारण सारखेच असतात. आज आपण जि-याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला नक्की काय फायदे होतात हे बघणार आहोत.

1) जीरे हे  कफनाशक, पित्तशामक गुणधर्म असलेले आहे. जि-या मुळे भूक वाढण्यास साहाय्य मिळते. जी-यामुळे जुलाब थांबण्यास मदत मिळते.जिरे हे उलटी,मळमळ, अपचन इत्यादी त्रासांवर आरामदायी उपाय आहे .वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिरे सेवन केल्यास प्रभावी  फरक दिसून येतो.

2) जी-यामध्ये  एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जि-यामध्ये शरीराला उपयुक्त असणारे अनेक  क्षार सुद्धा असतात. जि-यामध्ये पॉटेशिअम (Potassium), मँगनीज, कॅल्शिअम (Calcium), झिंक (Zinc) आणि मॅग्नेशिअम (Magnesium यांसारखे उपयुक्त घटक असतात.जिरे हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्त्रोत आहे.

3) पचनसंस्थेशी निगडित निरनिराळ्या विकारांवर जिरे खूप प्रभावी ठरते.जि-यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीआँक्सिडंट असतात ज्यामुळे चयपचयाच्या कार्यात मोठी भूमिका बजावणा-या आतड्यांना निरोगी राखले जाते व परिणामी पचनक्रिया नीट पार पाडली जाते.पोटाशी निगडीत अजून एक समस्या म्हणजे जंत किंवा क्रुमी होय ,जिरे जंतांचासुद्धा नायनाट करतात.पोटामध्ये वायू धरण्याच्या समस्येवर सुद्धा.जिरे मात करु शकतात.पोटाशी निगडीत अपचन,गँसेस,शौचास त्रास होणे,यांसारख्या समस्या जिरे नियमित सेवन केल्यास दूर ठेवता येऊ शकतात.भूक वाढण्यासाठी जिरे हा उत्तम पर्याय आहे.जिरे,आवळा,काळे मीठ आणि ओवा यांच्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास भूक वाढते व खाल्लेले अन्न चांगले पचते.

4) जिरे हे तापशामक व उष्णताशामक आहे. सातत्याने तापाची कणकण येत असेल तर खूप पूर्वीपासून जिरे वापरले जाते.जिरे आणि जुना गूळ एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या करून या गोळ्यांचे एकवीस दिवस रोज सकाळ संध्याकाळ सेवन केले तर तापाची कणकण दूर होऊ शकते. याखेरीज जिरे पावडर आणि दूधाचे मिश्रण पिण्याचाही सल्ला ताप आल्यावर दिला जातो.उष्णतेमुळे ओठ किंवा तोंडावर जर आल्याचे दिसून येते.अशावेळी उष्णता शामक जिरे वाटून त्याचा लेप जर आलेल्या ठिकाणी लावावा.

5) सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पोट फुगणे,गँसेस या समस्या  मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे आढळून येते.यावर उपाय म्हणून जिरे,लिंबू आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण मुरवून ते सेवन करावे.
6) उचकी लागल्यावर तूप,जिरे आणि.लिंबू यांचे मिश्रण एकत्र घेतल्यास उचकी थांबते.

7) काही व्यक्तींना सर्वच हंगामात सर्दी चात्रास होतो.सर्दीचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा जिरे प्रभावी उपाय आहे. जिरे थोडेसे भाजून ते रूमालात बांधून त्याची पोटली तयार करून ती नाकाने हुंगावी यामुळे काही काळानंतर सर्दीचा त्रास कमी होतो.

8) बदधकोष्ठतेमुळे बैचेन झाल्यासारखे होते व यावर मात्रा म्हणून ताक,सैंधव मीठ आणि जिरे पावडर एकत्र करुश त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
9) उलटी किंवा मळमळ होत असेल तर जिरे चावून खावे.जिरे चावून खाल्ल्याने त्याच्या रसामुळे उलटी व मळमळ थांबते.
10) जिरे हे पित्तशामक आहे त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी जिरे व धन्याची पूड खडीसाखर सोबत सेवन केल्यास करपट ढेकर येणे,छातीत जळजळ होणे ही लक्षणे दूर केली जाऊ शकतात.

11) मुळव्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे. जिरे, सैंधव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मुळव्याधीपासून आराम मिळतो.
12) सांधेदुखी चा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो.सांधेदुखी वरही जिरे इलाज करू शकतात.जिरे,मेथ्या,ओवा,बडीशेप इत्यादि घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज खाल्ले तर सांधेदुखी वर आराम मिळतो.

14) बदलत्या जीवनशैली मुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका संभवतो.कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदय विकार उद्भवू शकतात.जिरे दररोज सातत्याने सेवन.केले तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
15) वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात.जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी सेवन केले तर वजन कमी होते असे सिद्ध झाले आहे.

(टीप : सदरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून ती अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )