Articles Health

अस्सल मध कसा ओळखावा? वापरा या सोप्या पद्धती…

benefits of honey in marathi
benefits of honey in marathi

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक निरनिराळे आजार खूप लहान वयातच उद्भवल्याचे आढळून येते. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहारामध्ये सुद्धा अनेक बदल घडून आले आहेत. शरीरामध्ये निर्माण होणारी विषद्रव्ये बाहेर पडणे हे अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते. शरीरातील विषद्रव्यांना बाहेर पडण्यास साहाय्य करणाऱ्या अनेक नित्य जीवनातील सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपैकी एक  महत्वाचा पदार्थ म्हणजे मध होय.

आरोग्य, सौंदर्य इत्यादी उद्देशांसाठी मध वापरण्यावर सध्या भर दिला जातो. शरीराच्या अंतर्गत शुद्धी सोबतच त्वचा इत्यादींवर सुद्धा मधाचा उपयोग खूप प्रभावशाली ठरतो. मात्र बाजारामध्ये सहज रित्या उपलब्ध होणाऱ्या मधाचे निरनिराळे ब्रांड सध्या अस्तित्वात आहेत मात्र या ब्रँड पैकी सर्वच प्रकारचे मध अस्सल आहेत की नाही हे वादातीत आहेत. काही मध नकली असतात त्यामध्ये भेसळ केलेली असते व त्यामुळेच अशुद्ध असल्यास अशुद्ध मधाचे सेवन करून आरोग्याला हानी करून घेण्यापेक्षा एक जागरूक ग्राहक बनून मधाची शुद्धता व असलीपणा स्वतः तपासणे गरजेचे बनले आहे. मधाची शुद्धता तपासण्यासाठी खालील काही उपाय केले जाऊ शकतात.

अस्सल मध कसा ओळखावा?

 1) शुद्ध मधाची पारख करण्यासाठी आपण विकत घेतलेल्या मधामध्ये कापसाची वात भिजवून ती जाळली असता आवाज न करता जळाली तर तो मध शुद्ध आहे असे समजावे.

2) मध ओळखणे हे अतिशय सोपे आहे . जर मध शुद्ध असेल तर त्याच्या एक थेंब पाण्यामध्ये टाकला तर शुद्ध मध पाण्याच्या तळाशी जातो तरंगत नाही.

3) शुद्ध मध  सुती कापडावर टाकला तर तो घरंगळत खाली येतो. सुती कापडामध्ये शुद्ध मध शोषला जात नाही।

4) शुद्ध मध तपासण्यासाठी तो दोन बोटांमध्ये घेतला असता अन्य द्रवपदार्था प्रमाणे घरंगळत नाही कारण अस्सल मधाचा घट्टपणा अन्य द्रवपदार्थ पेक्षा खूप जास्त असतो.

5) अस्सल मध गरम केला की तो खूप जलद गतीने कॅरमलाईज्ड होते. याउलट नकली असलेला मध गरम केला असता त्याला बुडबुडे येण्यास सुरुवात होते व व तो कँरमेलाईज्ड होत नाही.

मधाचे फायदे?

1) मधाचे असे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. छातीमध्ये कफ होत असल्यास मध आणि आल्याचे चाटण काही दिवस घेतल्यास आराम मिळतो.

2) खोकल्याचा त्रास होत असेल तर एक चमचा अडुळशाचा रस आणि एक चमचा आल्याचा रस मधामध्ये घालून  दोन वेळा घेतल्यास फरक पडतो.

3) वजन कमी करण्यासाठीसुद्धा मधाचा वापर केला जातो. सकाळी अनशापोटी कोमट पाण्यामध्ये मध मिसळून ते मिश्रण घेण्याचा सल्ला अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दिला जातो.

4) मधाचे सेवन केल्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण नियंत्रित करता येऊ शकते.
5) मधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अँन्टिऑक्सिडंट असतात असतात.
6) मधाचे गुणधर्म अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असतात यामुळे जखमा चिघळण्यापासूनही संरक्षण होते.