Health

चेहऱ्याला बर्फ लावल्यामुळे होतात ‘हे’ फायदे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

त्वचेचा दाह होणे जळजळ इत्यादी समस्यांवर निरनिराळे घरगुती उपाय सांगितले जातात अशाच घरगुती उपायांपैकी एक उपाय म्हणजे बर्फाचा वापर होय. बर्फाचा वापर केल्यामुळे खरोखरच त्वचेच्या समस्या दूर होतात का, बर्फाचा वापर त्वचेवर करण्याची योग्य पद्धत कोणती इत्यादी सर्व प्रश्नांविषयी आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोतः

आरोग्यविषयक समस्यांना दूर करण्यासाठी बर्फाचा वापर करण्याच्या पद्धतीला कोल्ड थेरेपी किंवा क्रायो थेरेपी असे म्हणतात .प्रामुख्याने मुका मार किंवा सूज यांसारख्या समस्यांमध्ये बर्फाचा वापर केला जातो .कोल्ड थेरपी मध्ये नसांच्या हलचाली काही प्रमाणात मंदावल्या जाऊन वेदना कमी होण्यास साहाय्य मिळते. रक्ताभिसरण प्रवाह प्रक्रिया मंदावून त्याद्वारे सूज कमी केली जाते. लवकरात लवकर हा मुका मार किंवा सूज भरून येण्यासाठी बर्फ स्नायूंना उत्तेजित करते.

बर्फाचा उपयोग त्वचेच्या समस्यांना दूर करण्यासाठी बर्फ लावण्याची सुद्धा योग्य ती पद्धत असते. यासाठी बर्फाचे चार ते पाच खडे कपड्यांमध्ये ठेवून हे गुंडाळलेले बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर गोलाकार स्थिती मध्ये दोन ते तीन मिनिटे फिरवावे .बर्फाचे खडे गोलाकार पद्धतीने दिवसभरात एकदोन वेळा आपल्या जबडा, हनुवटी, ओठ ,नाक ,कपाळ आणि गालावर फिरवावे.

डोळ्या खालच्या सूजेला दूर करण्यासाठी पाण्या पासून बनवलेला बर्फ डोळ्यांभोवती फिरवावा.याऐवजी ग्रीन टी किंवा साध्या चहाच्या पाण्यापासून बनवलेला बर्फ सुद्धा डोळ्याखाली गोलाकार पद्धतीने फिरवल्यास डोळ्याखालची सूज कमी होण्यास साहाय्य होते आणि डोळ्यांखाली ल त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते.

तारूण्य पिटीका पासून संरक्षण मिळवण्यासाठी बर्फाचा मसाज खूप उपयुक्त ठरतो. बर्फामुळे तारुण्यपिटिका मुळे होणारा त्वचेचा दाह कमी होतो आणि त्वचेतून अतिरिक्त तेल निर्माण करणाऱ्या ग्रंथींना सुद्धा नियंत्रणात आणण्याचे कामही केले जाते .तारुण्यपीटिकांवर बर्फाचा मसाज उपाय म्हणून करताना बर्फ वेळोवेळी बदलावा जेणेकरून एका भागातील तारुण्यपिटीकांचा संसर्ग दुसऱ्या भागावर होऊ नये.

बर्फाचा वापर हा नैसर्गिक रित्या एखादी दुखापत भरून येण्यासाठी केला जातो. बर्फाचा मसाज करण्यासाठी वापरला जाणारा बर्फ साध्या पाण्यात बनवण्या ऐवजी कोरफडीचा गर ,चहा किंवा कॉफी चे पाणी, ग्रीन टी चे पाणी इत्यादी वापरून बनवावा असे काही संशोधन सांगते.

कोरफडीचा गर हा त्वचेशी  निगडीत अनेक समस्यांवर प्रभावी ठरतो असे सिद्ध झाले आहे.बर्फामध्ये कोरफडीचा गर मिसळून त्याचे क्युब्ज तयार करून ठेवून बर्फाच्या फेशियल मध्ये वापरले जाऊ शकतात। मात्र असे बर्फाचे खडे नसले तर बर्फाचा फेशियल करण्याअगोदर कोरफड जेल लावून मग बर्फाने मालिश केले तरीही चालते.कोरफडीच्या बर्फाने तारुण्यपीटिका आणि सन बर्न सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

बर्फाच्या फेशियल साठी वापरल्या जाणाऱ्या बर्फामध्ये ग्रीन टी वापरावा असे ब्रिटीश जर्नल मधील एका संशोधनामध्ये सांगितले आहे. ग्रीन टी मध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बँक्टिरियल  असे गुणधर्म असतात त्यामुळे ग्रीन टी पासून बनवलेल्या बर्फाच्या मालिश मुळे चेह-याला विषाणू आणि जीवाणू पासून संरक्षण मिळते.

आपल्या त्वचेसाठी बर्फाचे इतके सारे फायदे असले तरीही त्वचारोगतज्ञ किंवा डॉक्टरांसोबत चर्चा करूनच बर्फाचा वापर आपल्या त्वचेच्या समस्या घालवण्यासाठी करावा. त्वचेचा पोत, आपण घेत असलेली काही औषधे किंवा काही आरोग्यविषयक समस्या यांचा प्रभाव बर्फाच्या त्वचेसाठीच्या वापरावर पडणारर नाही ना याची खात्री केल्याशिवाय बर्फाचा वापर करू नये.

चेहऱ्यावर वापरल्या जाणाऱ्या बर्फासाठी बर्फाचा एकच ट्रे वापरावा व त्या ट्रे ला दररोज नित्यनेमाने स्वच्छ करावे. बर्फाचा मसाज करण्याअगोदर चेहरा नीट स्वच्छ  करावा. मसाज करताना चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त पाणी पुसण्यासाठी जवळ एक टॉवेल किंवा टिशू जरूर बाळगावा.

मसाज करताना चेहऱ्यावर बर्फ कपड्याशिवाय फिरवू नये यामुळे आईस बर्न होऊ शकते म्हणूनच आपला हात आणि चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी  बर्फ कपड्यामध्ये गुंडाळून मगच चेह-यावर वापरावा.बर्फाचा मसाज करताना खूप जास्त वेळ बर्फ चेहऱ्यावर फिरवू नये यामुळे आईस बर्न  होण्याची शक्यता असते.बर्फाचा मसाज सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे कारण ही पद्धत तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त आहे. बर्फ अगदी सहजपणे उपलब्ध होतो. त्वचेच्या समस्या दूर करण्याची बर्फाचे फेशियल ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन बर्फाचे फेशियल केल्यास कोणतीही हानी होत नाही.