चिंच खाण्याचे ५ फायदे, जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील, ५ वा फायदा आहे सर्वांसाठी महत्वपूर्ण

चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोवळ्या तुरट, आंबट चिंचा मीठासोबत खाणे म्हणजे निव्वळ पर्वणीच. मात्र अशी ही तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मानवी शरीरासाठी लाभदायक आहे. चला तर मग बीइंग महाराष्ट्रीयनच्या या लेखात जाणून घेऊयात आरोग्यवर्धक चिंचेचे एक से बढकर एक फायदे.

1) चिंचेच्या नियमित सेवनाने केसांचे आरोग्य सुदृढ राहून केसगळती थांबते. यामुळे केस मजबूत, लांब, दाट आणि काळेभोर होण्यास मदत होते.

2) चिंचेमधील हाइड्रोसिट्रिक आम्लामुळे मानवी शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. चिंचेचे नियमित सेवन शरीराचा स्थूलपणा कमी करण्यास मदत करते.

3) मधुमेहाच्या समस्येवरदेखील चिंच गुणकारी ठरते. चिंचेचे नियमित सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

4) शरीराची पचनशक्ती कमी असल्यास चिंच खाणं फायदेशीर ठरतं. चिंचेमधील फाइबर, टार्टेरिक आम्ल आणि पोटेशियम हे घटक पचनशक्ती मजबूत करण्यासाठी कार्य करतात.

5) चिंचेचे नियमित सेवन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते व मजबूत होते. चिंचेतील ‘क’ जीवनसत्व अनेक रोगांना शरीरापासून दूर करण्यास मदत करते.

(टीप : सदरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून ती अमलात आणण्यापूर्वी सदरील विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )