Home » अतिरिक्त झोपेची सवय ठरू शकते घातक, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार…!
Fashion Health

अतिरिक्त झोपेची सवय ठरू शकते घातक, होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार…!

उत्तम आरोग्यासाठी  उत्तम प्रकारे व योग्य प्रकारे झोप घेणे खूप आवश्यक असते. सर्व साधारणपणे आठ तासांची झोप घेणे हे निरोगी माणसाचे लक्षण आहे मात्र काही व्यक्तींना अति प्रमाणात झोप येण्याची ही समस्या असते. खूप जास्त प्रमाणात झोपणे हे आरोग्यासाठी फारसे हितावह नसते. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचे काही दुष्परिणाम निश्चितच भोगावे लागतात. आज आपण जास्त प्रमाणात झोपल्यामुळे आपल्या आरोग्याला काय नुकसान होऊ शकते हे जाणून घेणार आहोत.

  1. विविध संशोधनाच्या आधारे असे सिद्ध झाले आहे की ज्या व्यक्ती जास्त प्रमाणात झोप घेतात त्यांच्यामध्ये साधारणपणे सात ते आठ तास झोप येणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण अधिक असते. जर तुम्हाला प्रमाण मानली गेलेली सात ते आठ तास झोप पुरेशी वाटत नसेल तर तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  2. अति प्रमाणात झोपल्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढण्याचा धोका असतो व यामुळे गंभीर स्वरूपाचा मधुमेह भविष्यात होऊ शकतो.
  3. प्रमाणापेक्षा जास्त झोपल्यामुळे मेंदूमधील काही न्यूरो ट्रान्समीटर ला अतिरिक्त तणाव निर्माण होतो तसेच सेरोटिनिनच्या पातळीमध्ये सुद्धा बदल घडून येतात. याचा परिणाम म्हणून डोके दुखणे ,पाठ दुखी, कंबर दुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात.
  4. नैराश्यग्रस्त असलेल्या व्यक्ती सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा अधिक जास्त प्रमाणात झोपतात असे दिसून येते. जास्त प्रमाणात झोपल्यामुळे नैराश्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
  5. रात्रीच्या वेळी नऊ ते अकरा तास इतकी झोप नियमितपणे घेणाऱ्या व्यक्ती व विशेष करून महिलांमध्ये हृदय रोगाच्या समस्या निर्माण झाल्याचे ही काही ठिकाणी समोर आले आहे.