Home » डोळ्याखालील काळे डाग कमी करण्यासाठी काही फायदेशीर उपाय…
Health

डोळ्याखालील काळे डाग कमी करण्यासाठी काही फायदेशीर उपाय…

आजकाल डोळ्याखाली काळे डाग असणे हि समस्या खूपच सामान्य झाली आहे.सगळ्यांना वाटते आपला चेहरा सुंदर,गोरा आणि डागविरहित असावा.सुंदर डोळे असेल तर चेहरा आणखीनच खुलून दिसतो.आपल्या चेहऱ्यावरील त्वचा अत्यंत नाजूक असते.त्यापेक्षाही नाजूक आणि पातळ त्वचा म्हणजे डोळ्याजवळ असणारी.त्यामुळे येथील त्वचेवर लवकर परिणाम होतो.कमी झोप घेणे,ताणतणाव,तासनतास कम्प्युटर आणि मोबाईल वर काम करणे.

शारीरिक कमजोरी,थकवा या सगळ्यांचा परिणाम डोळ्यावर होतो.या भागात निमुळत्या आकाराच्या धमन्या आणि रक्तवाहिन्या असतात.या भागातील रक्त प्रवाहामध्ये अडथळा आल्यामुळे काळे डाग येणे अशा समस्या निर्माण होतात.डोळ्याखाली काळे डाग येतात त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते.या समस्येचा खूप जणांना त्रास आहे.यामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते.

डोळ्याखालील काळे डाग का येतात… 

१) अनुवांशिक : काही जणांना हे काळे डाग अनुवांशिक असतात.आपण त्यावर कितीही उपाय केले तरी ते डाग तसेच राहतात. 

२) पाण्याची कमतरता : शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे डोळ्याखाली काळे डाग येतात.यामुळे डोळ्याखालील त्वचा कोरडी पडते यासाठी पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.

३) वाढते वय : वाढत्या वयात त्वचेविषयी अनेक समस्या असतात.त्यामध्ये एक म्हणजे डोळ्याखालील काळे डाग.वयाच्या चाळीशी नंतर त्वचेच्या पुनर्निर्मितीची क्षमता कमी होते त्यामुळे डोळ्याखालील काळ्या डागांचे प्रमाण अधिक वाढते. 

४) लोहाची कमतरता : लोहाच्या कमतरतेमुळे त्वचेतील पेशींना ऑक्सिजन मिळत नाही.त्यामुळे डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळे येतात.एनीमिया असणाऱ्यांना हा त्रास लवकर जाणवतो.यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे.

५) व्हिटॅमिन C : शरीरात विटामिन-C च्या कमतरतेमुळे  डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसतात.संत्री,लिंबू,बटाटे आणि ब्रोकोली यामध्ये  व्हिटामिन-C भरपूर प्रमाणात असते त्यामुळे याचे सेवन केल्यास काळी वर्तुळे कमी होतील.  

काळे डाग पडू नयेत यासाठी काय केले पाहिजे…

डोळ्यांखाली काळी वर्तुळे न येण्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण घेवूया.त्यानंतर पण काळे डाग आले तर त्यावर काही घरगुती उपचार ही आहेत.चला तर बघुया कशी काळजी घेतली पाहिजे. 

१) सुर्य किरणापासून बचाव : काळे डाग येण्याचे कारण म्हणजे सूर्यकिरण.त्यामुळे कधीही घराच्या बाहेर पडताना नियमित सनस्क्रिन चा वापर करावा.त्याशिवाय तुम्ही घराबाहेर पडलात तर सूर्यकिरणांच्या त्रासाने चेहऱ्यावर काळे डाग पडतील. 

२) हॅट आणि गाॅगल्सचा वापर : उन्हात जातावेळेस नेहमी हॅट अथवा गॉगल्सचा वापर करा.यामुळे सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्या त्वचेवर पडणार नाही चेहऱ्याला याचा फायदा मिळतो.हॅट आणि गॉगल्स वापरून चेहरा आणि त्वचेला सूर्यकिरणांपासून वाचवण्यासाठी हा अतिशय सोपा उपाय आहे.

३) ताणतणाव : आजकाल धावपळीच्या काळात सतत कामाचा आणि काही गोष्टींचा तणाव घेणे पण त्याचा तणाव कमी घेणं हे देखील तुमच्या हातात आहे.सतत काम करत राहण्यापेक्षा कधीतरी रिलॅक्स होऊन स्वतःसाठी वेळ काढुन मित्र मैत्रिणींबरोबर वेळ घालवा.यामुळे तणाव कमी होतो.

तुमच्या डोळ्याखाली काळे डाग आहेत का?डोळ्याखालील डाग कमी होण्याचे काही घरगुती उपाय…

१) संत्री : संत्री मध्ये व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात असते.जे काळे डाग जाण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.संत्र्याचा रस डोळ्याखालील काळ्या डागांवर लावल्याने काळे डाग कमी होण्यास मदत होईल.संत्री मध्ये असणारे सायट्रिक ऍसिड काळ्या डागांवर अतिशय फायदे युक्त आहे.

२) नारळाचे तेल : नारळाचे तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचा नरम,मुलायम आणि निरोगी राहते.काळ्या डागांना काढण्यासाठी सर्वात सोपा आणि कमी खर्चिक उपाय आहे.डोळ्याखाली नारळाच्या तेलाने मालिश करावी रात्रभर तेल त्वचेमध्ये मुरु द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. 

३) दूध : पूर्वीपासूनच दूध अत्यंत फायदेयुक्त आहे.दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असते ते डोळ्याखालील डाग जाण्यास मदत करते आणि डोळ्याखाली असणाऱ्या सुरकुत्या आणि डाग कमी होण्यासाठी दुधाचा  उपयोग होतो.कापसाचा बोळा दुधात बुडवून डोळ्याखाली असणाऱ्या डागावर लावा आणि नंतर १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

४) कोरफड : कोरफड त्वचेसाठी एकदम उत्कृष्ट औषध आहे.याचे आयुर्वेदामध्ये अनेक फायदे आहेत.त्यापैकीच एक म्हणजे डोळ्याखाली असणारी काळे डाग कमी करण्यासाठी होतो.कोरफडीचा वापर केल्याने काळे डाग कमी होतात आणि चेहरा उजळून दिसतो.

५) काकडी : काकडी थंड असल्यामुळे त्वचेवर तेज आणण्यासाठी याचा उपयोग होतो आणि डोळ्याखाली असणारे काळे डाग काढण्यासाठी देखील खुप उपयुक्त ठरते.काकडी गोलाकार कापून हे काप फ्रिजमध्ये ठेवा त्यानंतर अर्ध्या तासाने डोळ्यांवर ठेवा आणि १५ मिनिटा नंतर डोळे धुवून काढा. 

६) हळद : हळद हि फक्त किचन मध्ये वापरण्याची गोष्ट नाही.त्वचेसाठी देखील हळद अत्यंत गुणकारी आहे.चेहरा उजळण्यासाठी हळदीचा उपयोग होतो तुम्हाला हे माहीतच असेल पण त्याच बरोबर डोळ्याखालील काळे डाग जाण्यासाठी उपयुक्त आहे.