Home » मानवी शरीरामध्ये असणारे प्लेटलेट्सचे महत्त्व…
Health

मानवी शरीरामध्ये असणारे प्लेटलेट्सचे महत्त्व…

प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कशा असतात? आपल्या शरीरात प्लेटलेट्स काय कार्य करतात? अशी अनेक प्रश्न आपल्याला पडली असतील तर आपण या विषयी काही माहिती जाणून घेऊया…  

‘प्लेटलेट्स’ म्हणजे नेमकं काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.तर आपण पहिले प्लेटलेट्स  म्हणजे काय हे पाहूया रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात पांढऱ्या पेशी(WBC),तांबड्या पेशी(RBC) आणि प्लेटलेट्स यालाच मराठीमध्ये तंतूकणिका असे म्हणतात.हिमोग्लोबिन जसा आपल्या शरीरातील महत्वाचा घटक आहे तसाच प्लेटलेट्स हा देखील महत्वाचा घटक आहे.रक्त पातळ न होऊ देण्याचं काम प्लेटलेट्स करतात आणि रक्तवाहिन्यांना काही इजा झाल्यास रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होऊ नये याचे काम देखील ‘प्लेटलेट्स’ करत असतात.त्यामुळे प्लेटलेट्स ला मानवी शरीराचे ‘कवचकुंडल’ म्हणतात.प्लेटलेट्स चा आकार प्लेट सारखा असतो त्यामुळे त्यांना प्लेटलेट्स असे नाव शास्त्रज्ञांनी दिले असावे.रक्तामधील प्लेटलेट्स ची संख्या अधिक प्रमाणात असते.

प्लेटलेट्स कुठे असतात बर? हा देखील प्रश्न तुमच्या डोक्यात आलाच असेल.प्लेटलेट्स ह्या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेमध्ये असतात म्हणजेच रेड बोन मॅरो मधील मेगा कॅरोसाईट्स या पेशींपासून प्लेटलेट्स तयार होतात.प्लेटलेट्सचे रक्तातील आयुष्य फारतर ५ ते ९  दिवसांचे असते.जुन्या प्लेटलेट्स प्लिहा आणि यकृत या मध्ये नष्ट होतात.प्लटलेट्स नष्ट होण्याची आणि निर्माण होण्याची प्रक्रिया शरीरामध्ये सुरूच असते. 

प्लेटलेट्स ची संख्या प्रमाणापेक्षा अधिक आणि कमी झाल्यास शरीरावर होणारे परिणाम… 

मित्रांनो मानवी शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या किती असेल बर? चला तर बघूया मानवी शरीरातील प्लेटलेट्स ची संख्या…मानवी शरीरामध्ये प्लेटलेट्स ची संख्या दिड ते साडे चार लाख इतकी असते.

शरीरात यापेक्षा जास्त प्रमाणात  प्लेटलेट्स झाल्या तर रक्तामध्ये गाठी निर्माण होतात आणि रक्तप्रवाहासाठी अडचण निर्माण करतात.त्यामुळे हृदयरोग,स्ट्रोक यांसारखे आजार होतात.हातापायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये रक्त प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यामुळे शरीराचा तो भाग बधिर होऊन निकामी होऊ शकतो.

प्लेटलेट्सची संख्या प्रमाणापेक्षा कमी झाली तर आपल्या शरीरातून रक्तस्त्राव अधिक होत असतो.प्लेटलेट्सची कमतरता असल्यास थर्मोसायटोपेनिया हा आजार होतो.हिरड्यातून रक्त येणे,नाकातून रक्त येणे,थुंकल्यावर तोंडातून रक्त येणे अशा समस्या उद्भवतात.त्वचेवर लाल रंगाचे डाग पडतात.मासिक रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो.

प्लेटलेट्स कमी होण्या मागची काही कारणे बघुयात… 

शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले तर प्लेटलेट्स ची संख्या कमी होते.जसे से की ताप,एच.आय.वी,डेंगू,मलेरिया या सारखे आजार झाले असेल तर प्लेटलेट्स कमी होतात.त्यामुळे हे आजार झाल्यास त्वरित रक्ततपासणी करावी आणि त्यानुसार उपचार करावा.पपईच्या पानांचा रस करून पिल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.औषधाचे सेवन केल्यामुळे काही औषध असा प्रकारची असतात ज्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात.थकवा जाणवणे जखम झाल्यावर त्यामधून होणार रक्तस्त्राव होणे यामुळे देखील प्लेटलेट्स कमी होतात.

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय…

१) पपई : पपई आणि पपईच्या पानाचा उपयोग प्लेटलेट्स वाढवण्यासाठी होतो.डेंगू सारखा आजार झाल्यावर रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात तेव्हा पपईच्या पानाच्या रसाचे सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.पपईचे पाने पाण्यामध्ये उकळून प्यावी याची चव ग्रीन टी सारखी लागते. 

२) गुळवेल : गुळवेल प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपायकारक आहे.डेंगू झालेल्या रुग्णांनी गुळवेलच्या ज्यूस चे सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.तसेच याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते.२ चमचे गुळवेल १ चमचा मधासोबत घ्यावे किंवा गुळवेल रात्री पाण्यात भिजू घालावा आणि सकाळी ते पाणी गाळून पिल्यास प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल. 

३) पालक : पालक या भाजी मध्ये व्हिटॅमिन-क असते.व्हिटॅमिन-क ब्लड क्लॉटिंग साठी आवश्यक आहे.जास्त रक्तस्त्राव होत असेल तर कमी करण्यासाठी पालक फायदेशीर आहे.पाण्यामध्ये पालकची पाने उकळून ते पाणी पिल्यास आणि पालक भाजी खाल्ल्याने प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते.

 ४) आवळा : आवळा हा एक आयुर्वेदिक घटक आहे याचे खूप सारे फायदे आहेत त्याच बरोबर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते यामुळे प्लेटलेट्स आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.नियमितपणे आवळ्याचे सेवन केल्यास प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होईल. 

५) बीट : बीट मध्ये अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात यामुळे प्रतिरोधक क्षमता वाढते आणि याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन आणि प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते तसेच बीटचे ज्यूस करू शकतो किंवा बीटचा हलवा करून खाऊ शकतो असे केल्याने जलद गतीने प्लेटलेट्सची संख्या वाढते.१ ग्लास गाजराचा रस घेऊन त्यात २ चमचे बिट चा रस मिक्स करून सकाळी नियमितपणे घ्यावे.

६) भोपळा : भोपळ्यामधे असणारे व्हिटॅमिन-अ प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतात तसेच भोपळ्यातील बिया देखील खूप उपयुक्त आहे फास्ट प्लेटलेट्स वाढवण्यास फायदेशीर ठरतात.भोपळ्यातील पोषक तत्व प्रोटीन निर्माण करण्याचे काम करतात. 

प्लेटलेट्स कमी झाल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे… 

१) लसूण खाऊ नये.

२) शक्यतो दगदग होईल अशी कामे टाळावीत.

३) ब्रश करताना हिरडयांना ब्रश लागू नये याची दक्षता घ्यावी.

४) आजारी असल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

५) टोकदार वस्तू काळजी पूर्वक वापराव्यात जेणे करून शरीराला कोणतीही इजा होणार नाही.