Home » बहुगुणी कोरफडीचे आरोग्यासाठी असणारे फायदे…
Health

बहुगुणी कोरफडीचे आरोग्यासाठी असणारे फायदे…

कोरफडीचे अनेक फायदे आहेत तुम्हाला माहीतच असेल.परंतु कोरफडीचा रस देखील आरोग्यदायी आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए,सी,बी फोलिक ऍसिड हे घटक असतात.तर मॅग्नेशियम,झिंक,लोह,कॅल्शियम,पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो.त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.कोरफड ही बारामाही वनस्पती आहे.कोरफडी मध्ये खुप सारे औषधी गुणधर्म आहेत.

कोरफड अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती आहे.आपण कोरफड सहजपणे कुठेही लावू शकतो बाल्कनीत,घराच्या गच्चीवर,कुंडीमध्ये लावल्यावर सहजपणे कुठेही ठेऊ शकतो.त्वचा आणि केसांसंबंधित काही समस्या असेल तर त्यावर कोरफड हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.जगभरात कोरफडीला खूप मागणी आहे.

तर आज आपण कोरफडीचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत…  

१) सर्दी आणि खोकल्यापासून आराम : सर्दी आणि खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा उपयोग केला जातो.कोरफडीमधील अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे श्वसनाच्या इन्फेक्शन ला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत होते.कोरफडीमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असतात त्यामुळे कोरफडीचा रसाचा आपण एनर्जी ड्रिंक म्हणून वापर करू शकतो.यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील  मदत मिळते. 

२) वजन घटण्यास मदत : कोरफडीचा रस पिल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते.कोरफडीच्या रसामुळे मेटाबॉलिक रेट वाढतो त्यामुळे वजन घटते.या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री-रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.कोरफडीच्या रसामुळे शरीरातील चरबी चे प्रमाण कमी होते आणि चयापचय क्रिया सुरळीत राहते. 

३) पचन क्षमता वाढते : बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी कोरफडीचा रस हा अत्यंत गुणकारी उपाय म्हणून कार्य करतो.कोरफडीच्या रसामुळे आतड्यामधील उपयोगी बॅक्टेरिया ची वाढ होते,त्यामुळे आतड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढते आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते.कोरफडीचा रस पिल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी मदत मिळते.यामुळे पचनशक्ती वाढते.  

४) दातांचे आरोग्य सुधारते : नियमितपणे कोरफडीचा रस पिल्याने दातांचे आरोग्य सुधारते हे अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांवर आलेली सूज कमी होते आणि तसेच प्लाकची निर्मिती रोखण्यास मदत होते.तोंडातले आल्यावर कोरफडीचा रस लावावा आराम मिळतो.कोरफडीचा रस पिल्याने दातांचे आरोग्य व्यवस्थित राहते. 

५) मऊ आणि मुलायम ओठांसाठी : कोरफडीमध्ये ई जीवनसत्व आहे.त्यामुळे सुकलेल्या किंवा उललेल्या ओठांसाठी कोरफड जणू वरदानच आहे.ओठांवर कोरफड जेल लावा.कोरफड जेल मध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून लिप बाम सारखे ही वापरू शकता.

६) डोळ्यांच्या आरोग्यासाठी : डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे वाटत असल्यास कोरफडीचा वापर केल्याने फरक पडेल.डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या भागात कोरफड जेल लावल्याने डोळ्यांना आराम मिळतो.वेगवेगळ्या प्रकारच्या आय क्रीम मध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो.

७) सनरेज पासुन बचाव : सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा खराब होते.सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी देखील कोरफडीचा उपयोग होतो.यातील अँटी ऑक्सीडंट गुणामुळे त्वचा नेहमी ओली राहते.त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही ऊन असताना बाहेर पडणार असाल तेव्हा कोरफडीचा रस चेहऱ्याला व्यवस्थित लावा.

८) केसांसाठी फायदेशीर : कोरफडीला घृतकुमारी असे ही म्हटले जाते.कोरफडीत असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते.ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच चे संतुलन कायम राखण्यास मदत करते.कोरफड ने केस गळणे थांबते,केसांची वाढ चांगली होते,केसांतील कोंडा जाण्यास मदत होते आणि केसांचे चांगले पोषण ही होते.कोरफडीमधील गर आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण करुन हे मिश्रण हलक्या हाताने ओल्या केसांवर लाववा.आठवड्यातून एकदा असं केल्यास केस दाट,मऊ आणि सुंदर होतात.