Home » हे आहेत जादूई कापराचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क…
Health

हे आहेत जादूई कापराचे आरोग्यदायी फायदे जाणून तुम्ही देखील व्हाल थक्क…

कोणत्याही धार्मिक विधी मध्ये कापराला महत्त्व दिले जाते.पूजा-आरती असेल तेव्हा देवीदेवतांच्या फोटोला कापूर लावून ओवाळले जाते.यामुळेच देवघरातील पूजेला लागणाऱ्या साहित्यात कापूर हमखास असतो.कापरामध्ये अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्मामुळे कापूर मानवी आरोग्यसाठी खुप उपयुक्त ठरतो.

आपल्या सर्वांना माहित आहे की कापराचा उपयोग देवघरात,पूजा,हवन यासाठी केला जातो परंतु या कापराचे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदे आहेत हे खूप कमी जणांना माहीत असेल तर आज आपण कापराचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते बघणार आहोत.

चला तर मग मानवी आरोग्यासाठी कापराचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया…

१) जखम झालेली असेल किंवा चाकूने कापले असेल तर कापरामध्ये पाणी मिक्स करुन त्या जखमेवर लावावे. कापरात अँटीबायोटिक असल्यामुळे लवकर जखम भरण्यास मदत होते.

२) शरीराचा एखादा भागा दुखत असेल तर कापराच्या तेलाने मसाज करावे असे केल्याने वेदना कमी होतील.सांधेदुखी असेल तर कापराचा उपयोग करावा.कापराच्या तेलाने मसाज केल्यावर सांधेदुखी पासून आराम मिळतो.

३) डोक्यातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी कापराचा वापर करता येतो.खोबऱ्याच्या तेलात कापूर मिसळून त्या तेलाने केसांना मसाज करावे आणि अर्ध्या तासाने केस धुवावे.आठवड्यातून दोनदा असे केल्यास फरक दिसून येतो. 

४) खोबऱ्याच्या तेलात कापूर मिक्स करून मिश्रण तयार करा आणि याचा वापर खाज आलेल्या जागेवर करा यामुळे खाज कमी होते आणि लगेच आराम मिळतो.त्वचेला सतत खाज येत असेल तर त्यावर कापराचे तेल लावावे.

५) जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर त्या जागेवर कापूर लावून स्वच्छ केल्याने फरक पडतो. कापराच्या धुरामुळे देखील इन्फेक्शन दूर होते.  

६) टाचांना भेगा पडलेल्या असतील तर त्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात थोडावेळ पाय बुडवून ठेवावे असे नियमित केल्यास लगेच फरक जाणून येतो आणि आराम मिळतो.

७) कीड लागलेल्या दातांमध्ये वेदना होत असतील तर त्या ठिकाणी कापूर पावडर लावावे किंवा कापराची वडी ठेवावी. याने दातांचे दुखणे लगेच कमी होईल.

८) सर्दी-खोकला झाल्यावर एका पातेल्यात गरम पाणी घ्यावे त्यामध्ये कापूर बारीक करुन टाकावा आणि त्याची वाफ घ्यावी किंवा नाकाला,कपाळावर आणि छातीला कापूर लावावा याने फरक पडतो.

९) डास चाऊ नये यासाठी देखील कापूर फायदेशीर ठरतो.रात्री झोपण्यापूर्वी आजूबाजूला कापूर ठेवावा यामुळे डास चावत नाही त्याबरोबर उंदीर,किटकही लांब राहतात.

१०) त्वचेवरील मुरूम,लालसरपणा,जळजळ होणे आणि सूज येणे यावर कापूर हा रामबाण उपाय आहे.ट्री ऑईल आणि कापूर एकत्र मिसळून कापसाच्या बोळ्याने त्यावर लावावे असे केल्यास फरक पडतो.