Home » धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचे हे आहेत अत्यंत गुणकारी आणि आश्चर्यकारक फायदे, एकदा नक्की वाचा!
Health

धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचे हे आहेत अत्यंत गुणकारी आणि आश्चर्यकारक फायदे, एकदा नक्की वाचा!

घरामध्ये किंवा विशेषतः स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू असतात ज्यांचे आपल्या त्वचा व एकंदरीतच आरोग्यासाठी खूप फायदे असतात. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तांदूळ उकळून घेतल्यानंतर राहिलेल्या पाण्याचा वापर करुनही आपण अनेक फायदे मिळवू शकतो. जपान आणि कोरियामध्ये तर आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करणे अगदी सर्वसाधारण गोष्ट आहे.

अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा आज काल तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याचे दिसून येते. जापान व कोरियामध्ये पिढ्यान पिढ्या चमकदार व नितळ त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. आज आपण तांदळाच्या पाण्यामुळे होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

1) तांदळाचे पाणी हे अमिनो एसिडने समृद्ध असते यामुळे त्वचेवर वार्धक्य निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा पुढे ढकलली जाते. त्वचेमध्ये घट्टपणा निर्माण होण्यासाठी तांदळाचे पाणी उपयुक्त असते.

2) त्वचेचा पोत सुधारणे हे तांदळाच्या पाण्याचे मुख्य कार्य आहे. तांदळाच्या पाण्याने चेहरा नियमितपणे धुतला असता त्वचा नितळ बनते. यामुळे त्वचा तजेलदार व निरोगी बनते.

3) त्वचेचे बाह्य आवरण त्वचेला होणारी हानी रोखते. त्चेच्या बाह्य आवरणामुळे एक्झिमासारखे त्वचेला होणारे आजारांपासून बचाव होतो. तांदळाच्या पाण्यात असलेल्या स्टार्च मुळे त्वचेच्या बाह्य आवरणाला संरक्षण मिळते.

4) सुर्यप्रकाशात जास्त काळ वावरल्यामुळे होणारे सनबर्न, त्वचेला होणारी लाही, जळजळ, खाज या सर्वांपासून तांदळाच्या पाण्यामुळे मिळणारा थंडावा आराम देतो. तांदळात असलेल्या स्टार्च मुळे निसर्गतः थंडावा मिळतो.