Home » व्यर्थ मानली जाणारी ही वनस्पती आहे आरोग्याविषयी असणाऱ्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय…
Health

व्यर्थ मानली जाणारी ही वनस्पती आहे आरोग्याविषयी असणाऱ्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय…

तुम्ही बघितलेच असेल की लाजाळू ही वनस्पती कुठेही उगते.घराच्या कोपऱ्यावर,उकिरड्यावर,डोंगरावर,मातीच्या ढिगाऱ्यावर अशा अनेक ठिकाणी ही वनस्पती आपल्याला उगवलेली दिसते.कित्येक जनांना लाजाळू हि वनस्पती कशी दिसते हा प्रश्न पडला असेल?  लाजळूच्या झाडाची पाने अगदी चिंचेच्या पानांसारखी असतात.परंतु या झाडाचा आकार चिंचेच्या झाडासारखा मोठा नसतो तर हे झाड आकाराने खूप छोटे असते.

लाजळूच्या झाडाची एक आश्चर्यकारक गोष्ट आहे ती म्हणजे या झाडांच्या पानांना हात लावल्यास ही पाने लगेच मिटतात. म्हणूनच या झाडाचे कदाचित लाजाळू नाव पडले असेल.त्यानंतर स्पर्श केल्यानंतर थोडया वेळाने ह्या झाडाची पाने पुन्हा जशीच्या तशी होतात.लाजाळूच्या झाडाला काटे देखील असतात.पाण्याचा थेंब पडल्यावर आणि हातांचा स्पर्श झाल्यावर लाजळूच्या झाडाची पाने मिटतात.

लाजाळूच्या झाडाचे लाजन्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे हे बघूया…

लाजाळूच्या झाडाला इंग्लिश मध्ये ‘टच मी नॉट प्लान्ट’ असे म्हणतात.लाजळूच्या पानांमध्ये टर्गर नावाचे द्रव्य असते.टर्गर या द्रव्यामुळे लाजळूच्या झाडाची पाने ताट असतात.जेव्हा कोणत्याही गोष्टीचा लाजळूच्या झाडाला स्पर्श होतो तेव्हा टर्गर या द्रव्याचा दाब कमी होतो त्यामुळे लाजळूची पाने मिटतात.लाजळूच्या झाडाला गुलाबी रंगाची फुले येतात.शास्त्रज्ञाच्या मते हे झाड स्वतःच्या संरक्षनासाठी असे करते.

कित्येक घरांमध्ये लाजळूचे झाड आवडीने लावले जाते.लाजळू ही एक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदामध्ये देखील या वनस्पतीचे अनेक फायदे आहेत.पित्त,खोकला,मूळव्याध,दमा,कफ हे आजार दुर करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

चला तर मग जाणून घेऊया लाजाळूचे झाड कोणत्या समस्यांवर उपायकारक आहे…

१) लाजळूच्या मूळाचे आणि बियांचे पावडर दुधात मिक्स करून पिल्यास पुरुषांमधील वीर्य वाढण्यास मदत होते.असे नियमित केल्यास लगेच फरक दिसून येईल.तसेच शारीरिक दुर्बलता देखील वाढते.

२) डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी लाजळूच्या पानाचा काढा घेतल्याने आराम मिळतो.कफ आणि पित्त यावर देखील लाजाळू उपायकारक आहे.

३) लाजाळूच्या पानांचे पावडर दुधात मिसळुन पिल्यास मूळव्याध आणि भगंदर या सारखे आजार बरे होतात.मूळव्याध च्या जखमेवर लाजाळूच्या पानांचा रस लावल्यास जखम कोरडी पडते.

४) हाडांचे तुटणे आणि मांसपेशी मध्ये असणाऱ्या जखमा भरुन काढण्यासाठी देखील लाजाळूच्या झाडाचे मुळ उपयुक्त आहे तसेच जखम झाल्यावर देखील फायदेशीर ठरते.

५) खोकला असल्यास लाजाळूच्या झाडाची पाने किंवा मुळ चावून खाल्यास आराम मिळतो.कोणतेही मूत्र विकार असतील किंवा मुतखडा तर या झाडाच्या मुळांचा काढा प्यावा आराम मिळतो.

६) जखम झाल्यावर रक्त थांबत नसेल तर त्यावर लाजाळूच्या झाडाच्या पानांची पेस्ट करून लावावि रक्त थांबण्यास मदत होते.