पायांना भेगा पडत असतील तर करा हे सोप्पे उपाय

पायांना म्हणजेच टाचणां पडलेल्या भेगा दिसायला तर खूपच खराब दिसतात पण त्याहून अधिक त्यामुळे होणारा त्रास हा अधिक जास्त दुःखद असतो. हिंदीमध्ये यासाठी एक म्हण  वापरली जाते. जाके पैर न फटी बिवाई, वो क्या जाने पीर परायी! सर्वात प्रथम पायांना भेगा का पडतात हे जाणून घेणार आहोत. पायानं भेगा पडणाऱ्याचे मुख्य दोन  कारणे आहेत. तुमच्या त्वचेला व्यवस्थित पोषण मिळत नाही. दुसरे कारण म्हणजे त्वचा कोरडी पडत जाणे. भेगा पडलेल्या टाचा  नीट करण्यासाठी तीन मुख्य उपाय  करणे जरुरी आहे. पहिले त्वचा स्वच्छ करून घेणे , स्वच्छ केल्यामुळे त्वचेतील इन्फेकशन कमी होते.

घाण निघून जाते.मृत त्वचा काढून टाकणे.  त्या नंतर त्वचेला पोषण देणे. सर्वात आधी त्वचा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब  वापरावे. स्क्रब  तुम्हाला बाजारात आयते मिळते. ते देखील तुम्ही वापरू शकता. घरी देखील स्क्रब  बनविता येते. घरी स्क्रब  बनविण्यासाठी तुम्हाला हवे आहे संत्र्याची साल व ब्राउन शुगर, संत्र्याच्या साली उन्हात दोन दिवस  चांगल्या  सुखवा. अर्ध्या कप सालीचा तुम्हाला एक मोठा चमचा  ब्राउन शुगर पुरेशी आहे. संत्र्याची  सुकलेली साल व शुगर एकर करून पावडर बनवा.

साल तुम्ही अगदी पूड स्वरुपात वाटली तरी चालतील.तयार पूड काचेच्या अथवा प्लास्टिकच्या एअरटाईट भांड्यात ठेवून द्या.ओला चमचा शक्यतो या पूडमध्ये घालू नका.अधे-मध्ये या पावडरला उन दाखवायला विसरु नका. संत्री व्हिटॅमिन सीनं परिपूर्ण असतात. हिवाळ्यात आपण आवडीनं संत्री खातो. मात्र असं करतांना संत्र्यांची साल आपण फेकून देत असतो. पण हीच संत्र्याची साल भेगा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

लिंबाच्या रसामुळे तुमची त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम बनते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पाय कोमट पाण्यात 5-10 मिनिट्स बुडवून ठेवा. पाण्यामध्ये थोडंसा लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर तुम्ही पायांना प्युमिक स्टोनने स्क्रब करा आणि मग धुवा. यामुळे तुम्हाला नक्की चांगला परिणाम दिसून येतो. तुम्ही हा उपाय नियमित करत राहायला हवा. 
 

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सर्वात पहिले आपल्या भेगा पडलेल्या पायांना नारळाचं तेल लावा आणि मोजे घाला. सकाळी उठल्यानंतर पाय धुवा. असं तुम्ही सतत काही दिवस सतत करत राहिल्यास,  तुमच्या पायांवरील भेगा जाऊन तुमचे पाय मऊ आणि मुलायम होतील आणि पायांवरील कोरडेपणा निघून जाईल.  रूक्षतेमुळे पायांच्या भेगादेखील वाढतात. म्हणून यावर सोपा उपाय म्हणजे दिवसातून एकदा तरी दरदरून घाम आला पाहिजे असे व्यायाम अथवा एखादे काम करणे. तसेच सायंकाळी चार-पाच लिटर मिठाचे कोमट पाणी करून त्यात १५ मिनिटं दोन्ही पाय भिजत ठेवावेत. मग स्वच्छ पुसून घेऊन त्यावर आमसुलाचे तेल, राळेचं मलम अथवा घरातील देशी गायीचे शुद्ध तूप काशाच्या वाटीने घासून लावावे.