Home » सतत तोंडातून दुर्गंधी येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय…!
Health

सतत तोंडातून दुर्गंधी येत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय…!

तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या अनेकांना सतावत असते. ही एक सर्वसाधारण आरोग्याची समस्या आहे.ही समस्या निर्माण होण्यामागे विविध कारणे असू शकतात जसे की तोंडाची स्वच्छता नीट न करणे, जीभ व्यवस्थित न घासणे,रात्री झोपण्यापूर्वी दात न घासणे इत्यादी. मात्र या समस्येमुळे सार्वजनिक ठिकाणी शरमिंदा व्हावे लागते. आज आपण तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

  1. माउथवॉशचा वापर तोंडाला दुर्गंधी येण्यामागे मुख्य कारण म्हणजे दातांमध्ये कीड किंवा बॅक्टेरिया निर्माण होणे होय. यासाठी दररोज दात स्वच्छ घासणे व त्यानंतर माउथवॉशचा वापर करून चूळ भरणे उपयुक्त ठरते. माउथवॉश म्हणुन कोमट पाण्यात मीठ मिसळून चूळ भरणे सुद्धा साहाय्य करते यामुळे दातांना संरक्षण मिळते.
  2. बऱ्याचदा अनेक जण केवळ सकाळी ब्रश करतात. मात्र काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे दातांच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी खूपच आवश्यक आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा दात घासले पाहिजे कारण रात्री दात घासले नाहीत तर दातांवर जास्त प्रमाण बॅक्टेरिया शिरकाव करतात. दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करणे आवश्यक असते.
  3. दातांची स्वच्छता करताना जीभ साफ करणे सुद्धा आवश्यक असते. जिभेवर बॅक्टेरिया निर्माण होऊन दातांना दुर्गंधी येऊ शकते म्हणूनच जिभेला सुद्धा दात स्वच्छ करताना स्वच्छ करावे.
  4. काही लोक बराच काळ काहीही न खाता-पिता राहतात. जिभेवर व तोंडामध्ये यामुळे कोरडेपणा निर्माण होऊन तोंडाला दुर्गंधी येते म्हणून दीर्घ काळ पर्यंत उपाशी राहू नये. काही लोक तंबाखूचे सेवन करतात ते टाळावे. तोंडामध्ये कोरडेपणा निर्माण होऊ नये यासाठी पाणी प्यावे.