Home » शरीरावरील चामखीळ मुळापासून दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…!
Health

शरीरावरील चामखीळ मुळापासून दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…!

विषाणूंच्या संसर्गामुळे त्वचेवर काही समस्या निर्माण होत असतात. मानेवर, हाताच्या व पायाच्या च्या मागील बाजूस बोटांना, चेहऱ्यावर, मांडी किंवा पोटावर चामखीळ आल्याचे आपल्याला दिसते. चामखीळ ही वेदनादायक नसली तरीही  त्यामुळे निश्चितच आपल्या त्वचेच्या सौंदर्याला हानी पोहचते. तळपायावर चामखीळ असेल तर चालताना निश्चितच त्रास होतो.

चामखीळ होण्याची काही कारणे म्हणजे  विषाणूंच्या संसर्गामुळे मुख्यत्वे चामखीळ होते किंवा काही वेळा पौगंडा अवस्थेमध्ये किंवा मेनोपॉज च्या काळात हार्मोनल बदल खूप मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये घडून येतात अशावेळी या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर चामखीळ निर्माण होऊ शकते. काही प्रकारांमध्ये चामखीळ चा त्रास हा अनुवंशिक असतो.

चामखीळ वर उपचार करण्यासाठी डॉक्टर काही औषधे देतात तर काही वेळा शस्त्रक्रियेच्या आधारे चामखीळ मुळापासून काढून टाकले जाते.चामखीळ दूर होण्यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा खूप पूर्वीपासून केले जातात आज आपण असेच काही घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यांच्या मुळे चामखिळ मुळापासून काढली जाऊ शकते मात्र हे उपाय सातत्याने केले जाणे खूप आवश्यक आहे.

  1. आपल्या आहारामध्ये अगदी दररोज वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लसूण होय. लसूण  औषधी असा घटक आहे ज्यामुळे कफ,सर्दी ,खोकला यावर आराम मिळतो. अगदी त्याचप्रमाणे त्याच्या मुळे त्वचेला खूप सारे फायदे मिळतात. चामखीळ झाली असता लसूण वाटून तो चामखीळ असलेल्या ठिकाणी लावून त्यावर सुती कपडा बांधावा. रात्रभर ठेवावे व सकाळी गार पाण्याने व्यवस्थित लसूण धुऊन घ्यावा हा उपाय करावा.
  2. सौंदर्य आणि त्वचेशी निगडित कोणत्याही समस्येसाठी कोरफड हा एक उत्तम पर्याय ठरतो. निरनिराळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफडीच्या गराचा वापर केला जातो .चामखीळ आलेल्या ठिकाणी कोरफडीचा गर  लावावा व सुकल्यानंतर थंड पाण्याने व्यवस्थित धुऊन टाकावा.
  3. कांदयाचा रस हा  सौंदर्य आणि केसांचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी वापरला जाणारा अतिशय सहज उपलब्ध होणारा घटक आहे.चामखीळ आली असता कांद्याचा रस त्या ठिकाणी लावावा व साधारण दहा ते पंधरा मिनिटे तसाच ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा।दोन ते तीन आठवडे हा उपाय करावा.चामखीळ  मुळापासून दूर होते.
  4. केळी खाणे हे वजन वाढणे व कँल्शिअम मुबलक प्रमाणामध्ये मिळते. याव्यतिरिक्त त्वचेची चमक वाढवण्यासाठी सुद्धा केळीचे सेवन केले जाते व केळी शरीराला लावली सुद्धा जाते.चामखीळ वर सुद्धा केळी हा अतिशय रामबाण उपाय मानला जातो. केळीला कुस्करून  केळी ज्या ठिकाणी चामखीळ आली आहे त्या ठिकाणी लावून काही वेळ सुकू द्यावी व नंतर थंड पाण्याने धुऊन टाकावे 
  5.  बेकिंग सोडा हा निरनिराळ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये व त्वचा विषयक समस्यांवर उपाय म्हणून वापरला जातो. बेकिंग सोडा हा आपल्या कोणत्याही तेलामध्ये मिसळून हा लेप चामखीळ असलेल्या ठिकाणी लावावा.
  6. त्वचेवर असलेले डाग किंवा व्रण घालवण्यासाठी अननस हा खूप उत्तम पर्याय मानला जातो. चामखीळ वरसुद्धा अननसाचा रस लावल्यामुळे चामखीळचा मुळापासून नायनाट होतो.
  7. बटाट्यामध्ये उत्तम प्रकारचे ब्लीच करणारे गुणधर्म असतात. शरीरावरील कोणत्या डागांवर बटाट्याचा रस लावला असता ते डाग नाहीसे होतात. त्याचप्रमाणे चामखीळ घालवण्यासाठी बटाट्याचा रस चामखीळ आलेल्या ठिकाणी लावावा व त्याला एखाद्या स्वच्छ कापडाने बांधून ठेवावे असे सातत्याने काही आठवडे केल्यास चामखीळ  निघून जाते.
  8. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जितके चविष्ट असते तितकेच त्वचेसाठी फायदे सुद्धा अनेक असतात. स्ट्रॉबेरी चामखीळ असलेल्या ठिकाणी सातत्याने घासली असता चामखीळ दूर होते.
  9. विटामिन बी असलेले कॉलिफ्लॉवर वेगळीच चमक निर्माण करते  चामखीळ असलेल्या ठिकाणी रस काढून लावा व तो सुकला नंतर स्वच्छ धुऊन घ्यावी.
  10. लिंबाचा रस क जीवनसत्वाचा एक परिपूर्ण स्त्रोत असतो. या जीवनसत्वामुळे त्वचेशी निगडित अनेक समस्या दूर होतील. लिंबाचा रस चामखीळ आलेल्या ठिकाणी सतत काही आठवडे लावावा.
  11. नारळाचे तेल बहुगुणी असते. रोज रात्री  नारळाचे तेल चामखीळवर चोळून लावावे यामुळे चामखीळ दूर होण्यास साहाय्य मिळते.