Home » शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…!
Health

शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय…!

शरीराचे तापमान नियंत्रित राहणे आवश्यक असते.शरीराचे सामान्य तापमान 98.6 f इतके असते. शरीरामध्ये उष्णता वाढली असता शरीराची जळजळ होणे, तोंडामध्ये अल्सर निर्माण होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. शरीरामध्ये संसर्ग झाल्यामुळे ताप येणार असेल तरीसुद्धा शरीराचे तापमान वाढते अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

आवश्यकतेपेक्षा जास्त दमट किंवा उष्ण वातावरणामध्ये सातत्याने राहिल्यास शरीराचे तापमान वाढते. थायरॉईडमुळे हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवतात व त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. ल्युकेमिया ,आर्थ्राइटिस यांसारख्या आजारांमध्ये शरीराचे तापमान वाढते.

मसाले घातलेले व तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा शेंगदाणे ,जास्त प्रथिने असलेले पदार्थ वारंवार सेवन केल्यामुळे सुद्धा शरीरातील तापमान वाढते. व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण आणि स्नायूंमध्ये अंतर्गत प्रक्रिया घडून शरीराचे तापमान वाढते. काही अँटिबायोटिक औषध  शरीराचे तापमान वाढवतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास शरीराचे तापमान नैसर्गिकपणे वाढते.

शरीराचे तापमान नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आपण पाहणार आहोत

  1. गार पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवले असता शरीरातील उष्णता  निघून जाते यासाठी एखाद्या बादलीमध्ये किंवा पसरट पाण्यात गार पाणी किंवा बर्फाचे खडे टाकून तयार केलेले थंड पाणी घ्यावे व या पाण्यामध्ये पाय बुडवून बसावे असे पंधरा ते वीस मिनिटे केले असता शरीरामधील उष्ण तापमान कमी होते.
  2. शरीरामध्ये डीहायड्रेशन झाल्यास  शरीराचे तापमान वाढते. शरीरामध्ये डीहायड्रेशन दूर करून शरीराला हायड्रेट करण्यासाठी नारळाचे पाणी प्यावे. नारळाचे पाणी पिल्यामुळे शरीरामधील डीहायड्रेशन दूर करून शरीरामध्ये पुन्हा एकदा उर्जा निर्माण होते. शहाळ्यामध्ये असलेल्या जीवनसत्व क्षार आणि इलेक्ट्रोलाईट मुळे शरीराला हायड्रेशन मिळते.
  3. पुदिन्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचे गुणधर्म असतात यामुळे पुदिन्याच्या रसापासून बर्फाचे तुकडे बनवून या क्युब्जचा वापर करून आईस टी बनवावा.मिंट आईस टीमुळे शरीराला थंडावा प्राप्त होतो.
  4. शरीरातील उष्ण तापमान कमी करण्यासाठी पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नघटकांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. यासाठी स्ट्रॉबेरी ,कलिंगड यांसारखी फळे काकडी ,ब्रोकोली ,काँलीफ्लाँवर या भाज्यांचा आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात समावेश करावा.
  5. शरीरातील उष्ण तापमान थंड करणा-या विशेष प्रकारच्या कापडाची निर्मिती सध्या केली जाते.उन्हाळ्यामध्ये जेव्हा अतिरिक्त उष्णता असते व इतरवेळी शक्यतो सुती,लिनेन या प्रकारचे थंडावा देणाऱ्या कापडापासून बनवलेले कपडे घालावेत.
  6. शरीराला थंडावा देणारे एक प्रमुख पर्याय कोरफड  मानले जाते. बाजारामध्ये कोरफड जेल उपलब्ध होते किंवा झाडावरील कोरफड काढून तो गर शरीराला लावला असता फायदा होतो.अधिक फायद्यासाठी आलोवेरा जेल लावण्यापूर्वी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून थंड करावे.
  7. ताकाचे सेवन केल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहून पचनाची प्रक्रियाही सुरळीत चालू राहते.ताका मध्ये असलेल्या प्रोबायोटिक मुळे शरीरातील अतिरिक्त तापमान कमी होते. ताकामध्ये जिरे,पुदिना इत्यादी टाकून गार करून मग सेवन करावे.
  8. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी गार दूध आणि मध एकत्र  करून हे मिश्रण प्यावे यामुळे शरीराचे तापमान कायम राहते.
  9.  चंदनाची पावडर शरीरावर लावल्यामुळे उष्णता कमी होते.चंदनाची पावडर नियमितपणे लावली असता शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी  फायदेशीर ठरते.