Health

मधमाशा मध का गोळा करतात? जाणून घ्या

नैसर्गिक शर्करेच्या स्वरूपात मध सेवन करण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मध हा नैसर्गिक स्वरूपामध्ये मधमाशांच्या पोळ्या मधूनच मिळवला जातो.मधमाशांच्या पोळे म्हणजेच मधमाशांची वसाहत एक संघटित वसाहतीचे अत्यंत उत्तम असे उदाहरण आहे.मधमाशांना कष्टकरी माशी असे म्हटले जाते. मधमाशांचे प्रमुख कार्य हे मध गोळा करणे आहे . मधमाशांचा याच कार्याविषयी आपण थोडे विस्तृत  जाणून घेणार आहोतः

मध गोळा करण्याचे काम एपीस जमातीतील माशांकडून केले जाते. सर्वसाधारणपणे मधमाशा वर्षभरातील थंडीचा महिना सोडून अन्य सर्व दिवसांमध्ये फूलांमधून मध गोळा करण्याचे काम करत असतात .एपिस मँलिफिरा आणि एपिस सेरेना या दोन जाती मुख्यत्वे मधमाशा पालनासाठी व मध गोळा करण्यासाठी पाळल्या जातात.मधमाश्यांच्या या दोन प्रजाती माणसाळलेल्या आहेत.

 मधमाशा या सामाजिक व्रूत्ती किंवा समूह वर्तन असलेल्या प्रजातींमध्ये मोडतात .मधमाशी आपल्या वसाहती तयार करून समूहाने राहतात .मधमाशांचे पोळे हे 60000-70000 इतक्या माशांनी मिळून बनलेले असते .या मधमाशांचे पोळ्यांमध्ये एखाद्या वसाहती प्रमाण रचना व संघटितपणा असतो. मधमाशांच्या वसाहतीमध्ये एक राणीमाशी असते.हंगामानुसार काही नर वसाहती चा भाग बनतात व  सातत्याने बदलणार्‍या काम करी किंवा कष्टकरी माशा अशी श्रेणीवार रचना असते.

मधमाश्यांकडून फुलांमधून जो मकरंद गोळा केला जातो तो म्हणजे मध नसतो .फुलांमधून मकरंद गोळा करत असताना तमधमाश्यांच्या पायांना फुलांचे चे पुंकेसर किंवा स्त्रीकेसर चिकटतात व याद्वारे  फुलांचे परागीभवन ही प्रक्रिया पार पाडली जाते. मकरंद गोळा करतेवेळी मधमाशांच्या पाय आणि शरीराला फुलांमधील पुंकेसर व स्त्रीकेसर चिकटलेले असतात व ते त्यांना आपल्या पोळ्यामध्ये आणतात.फुलांच्या बहराच्या काळामध्ये एपिस मँलिफिरा या जातीच्या मधमाशांना वसाहतीच्या स्वरूपात येथे ठेवले असता उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचे दिसते त्यामुळे अशा काळामध्ये मधुमक्षिका पालन केले जाते.

फुलांमधून मधमाशांनी गोळा केलेल्या मकरंदावर त्यांच्या तोंडातून स्त्रवणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या वितंचकाची प्रक्रिया होते व या वितंचका  द्वारे मकरंदाचे स्वरूप अधिकाधिक शुद्ध करण्यास  साहाय्य होते .मकरंदाचे रूपांतर जेव्हा मधामध्ये होते तेव्हा त्यामध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज आणि माल्टोज या स्वरूपातील शर्करा ही 83 टक्के असते व पाणी केवळ 17 टक्के असते म्हणजे हा शुद्ध स्वरूपात मध असतो.

फुलांमधील मकरंद मधमाशांच्या तोंडातून माशांच्या पोळ्यामध्ये पोहचेपर्यंत तो एका मधमाशीच्या तोंडातून दुसऱ्या मधमाशीच्या तोंडामध्ये असा जात साधारण आठ ते दहा मधमाशांचा टप्पा पार करून जातो. या सर्व प्रवासात मकरंदावर विविध मधमाशांच्या तोंडातून स्त्रवणाऱ्या वितंचकामुळे मकरंदाचे रूपांतर मधामध्ये खूप जलद गतीने होते. मध जेव्हा मधमाशांच्या पोळ्यामध्ये साठवला जातो तेव्हा कष्टकरी माशांकडून आपल्या छोट्या पंखांनी वारा घातला जातो व त्यामधील पाण्याचे प्रमाण कमी करण्यास साहाय्य केले जाते.

मधमाशांच्या मधाप्रमाणेच मेणालासुद्धा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. या मेणाचा उपयोग विशेषकरून सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.विशिष्ट वयाच्या मधमाशांच्या पोटा मधून मेण स्त्रवते.या मेणाचा उपयोग मधमाशांच्या पोळ्या मध्ये नवीन कोठड्या तयार करणे, अंडी घातलेल्या कोठड्यांना बंद करणे इत्यादींसाठी केला जातो.त्यांच्या पायाला चिकटून आलेल्या स्त्रीकेसर किंवा पराग कणांचा वापर हा पोळयामधील अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्यांना सुरुवातीला प्रथिने म्हणून केला जातो.

मधमाशा  मध का तयार करतात या प्रश्नाचे उत्तर पाहिले तर सुरुवातीच्या काळात नव्याने जन्मलेल्या पोळ्यातील अळ्यांना केवळ पराग कण आणि मध यावर ठेवले जाते व त्यांचे संगोपन केले जाते. वर्षभर मध गोळा करणाऱ्या मधमाशा थंडी असते तेव्हा 10 अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान आल्यानंतर उडू शकत नाही त्यामुळे त्या आपल्या पोळ्या मध्येच वास्तव्य करून असतात.थंडीपासून बचाव होण्यासाठी मधमाशा पोळ्यामध्येच असतात त्यामुळे या काळामध्ये मधमाशा मधाचे सेवन करत असतात ज्यामुळे त्यांच्या शरीरातील तापमान हे साधारण राहते व थंडीपासून त्यांना संरक्षण मिळते .या काळामध्ये साधारण पंचाहत्तर टक्के मध हा वापरला जातो त्यामुळे पोळ्याचे वजन हे हलके भासू लागते.

विशिष्ट वयाच्या मधमाशा या पोळ्याच्या निरनिराळ्या कार्यासाठी आवश्यक असलेले मेण तयार करतात मात्र ठराविक वयानंतर त्यांची मेण निर्माण करण्याची क्षमता समाप्त होते.मेण निर्माण करू न शकणाऱ्या कष्टकरी मधमाशांना मध गोळा करणे व फुलांमधून परागकणांचे परागीभवन करणे यांसारखे कार्य हे आयुष्याच्या शेवटपर्यंत करावे लागते.