Health

उन्हाळ्यात थंड, ताजे आणि तंदुरुस्त राहण्याचे हे आहेत 5 मार्ग, रोग राहतील दूर आणि डिहायड्रेशन होणार नाही

Watermelon-juice
Watermelon-juice

उन्हाळा आता एकदम चरम सिमेवर आहे.उकाड्यामुळे सतत घाम येण आणि अस्वस्थ वाटण या तक्रारी सुरू झाल्या आहेत.कोरोनो साथीमुळे एसी लावण्यावर बंधन येत आहेत, अशावेळी उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत थोडासा बदल केल्यास फायदा होऊ शकतो.उन्हाळयात चक्कर येणे, उन्हाळे लागणे, अपचन, डिहायड्रेशन असे त्रास जाणवतात.यावर उपाय म्हणून हलका आहार आणि रसाची फळ खाण मस्त.या वर्षीचा उन्हाळा कूल आणि सुसह्य करण्याचे५ सोपे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1) जास्त पाणी प्या: भरपूर पाणी प्या उन्हाळयात जेवण कमी आणि पाणी जास्त असे प्रमाण ठेवा. भरपूर पाणी पिल्याने अस्वस्थता कमी होते.रक्तप्रवाह वाढून कामात उत्साह जाणवतो.नुसत पाणी पिण्याचा कंटाळा आल्यास पाण्यात लिंबू स्लाइस आणि पुदीन्याची पाने चिरडून टाका.यामुळे घरच्या घरी डिटॉक्स तयार होईल. तुमच्याकडे वाळा असल्यास तो पाण्यात टाका त्याने पाणी सुगंधी आणि चविष्ट होईल.

2) फळांचे सेवन करण्यास विसरू नका: मोसमी फळे, कलिंगड काकडी खा.उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असणारी फळ सहज उपलब्ध होतात. कलिंगड, संत्री, टरबूज, किवी, ही फळ तर काकडी, कोबी, लेट्यूस या भाज्या शरीराला गारवा देतात, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवून रक्तप्रवाह सुधारतात.ही फळ व भाज्या तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता.

3) फळ-भाजीपाला रस: ज्यूस, स्मूदी आणि शेक उन्हाळयात तुम्ही गरम चहा टाळून ज्यूस, शेक, स्मूदी पिऊ शकता.चहाबाजांसाठी हे अवघड आहे.परंतु गरम चहाला पर्याय म्हणून कोल्ड ग्रीन टी,कोल्ड कॉफी पिऊ शकता. परंतु हेल्दी निवड करायची असेल तर फळांचा ज्यूस,स्मूदीची करा.फळांबरोबर तुम्ही भाज्यांचीसुद्धा स्मूदी सहज बनवू शकता.उन्हाळ्यात एनर्जी बूस्ट करणारी काकडी, कोबी, किवी, आंबा या स्मूदी तुम्ही नक्की ट्राय करा. परंपरागत कैरीच पन्ह, उसाचा रस, नारळ पाणी, सगळ्यांच्या आवडीच लिंबू सरबत याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

4) वारंवार केस धुणे: आठवड्यातून दोनदा धुवा केस उन्हाळ्यात केसात घाम येतो तसेच केस खाजतात यावरचा उपाय म्हणजे आठवड्यातून दोनदा शिकेकाई किंवा चांगल्या शाम्पूने केस कोमट किंवा गार पाण्याने धुवा.केस चमकदार राहावे यासाठी उन्हात बाहेर पडताना केसांना स्कार्फने झाका.आठवड्यातून दोनदा केसाला तेलाने मसाज करा.

५) त्वचा च संरक्षण देखील महत्वाचे आहे: ग्लोईंग स्कीनसाठी अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी उन्हात बाहेर पडताना तोंड स्कार्फने बांधा.तसेच सनस्क्रीन लोशन लावा.रोज त्वचेला क्लींजींग, स्क्रबींग, मॉश्चरायझेशन आणि टोनींग करा.दिवसातून ३ते४ वेळा चेहरा थंड पाण्याने धुवा.