Health

त्या भागावरील केस काढणे खरंच गरजेचे असते का? जाणून घ्या फायदे आणि दुष्परिणामही

त्या भागावरील केस काढणे खरंच गरजेचे असते का? जाणून घ्या फायदे आणि दुष्परिणामही

मानवी शरीराविषयी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसतात. शरीरात कोणत्या क्रिया कशासाठी घडतात याबद्दल आपल्याला काही तुरळक गोष्टी सोडल्या तर जास्त माहिती नसते. त्यामुळे शरीराविषयी आपण कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळतपणे चुका करत असतो. याच अनुषंगाने आपण आज शरीराच्या गुप्त भागावरील केस काढणे कितपत आवश्यक आहे याविषयी माहिती घेणार आहोत.

पुरुष असो कि स्त्री दोघांच्याही जननेंद्रियावर वयात आल्यानंतर केस यायला सुरुवात होते आणि पुढे हे केस कायम राहतात. मात्र अनेकजण हे केस कापून टाकून तिथली त्वचा गुळगुळीत ठेवतात. कटिंग, दाढी जेवढ्या सहजतेने घेतली जाते अगदी तेवढ्याच सहजतेने जननेंद्रियावरील केससुद्धा अनेकजण काढतात. मात्र हे केस काढणे खरंच आवश्यक आहे का याविषयी अनेकांना माहिती नसते.

खरंतर ज्या अर्थी नैसर्गिकरित्या जननेंद्रियावर केस येतात त्याअर्थी त्याचा काहीतरी उपयोग असावाच. या केसांमुळे बाहेरील इन्फेक्शनपासून तुमच्या लैंगिक अवयवांचे अर्थात जननेंद्रियांचे संरक्षण होण्यास मदत होते. त्याअर्थाने हे केस उपयोगी ठरतात.

असे असले तरी या केसांच्या मुळाशी असलेल्या शरीरातील घर्मग्रंथीतील घामाचा निचरा योग्यवेळी न होता त्याठिकाणी ओलसरपणा राहतो. यामुळेदेखील त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे असे केस काढणे हे एकप्रकारे योग्यदेखील ठरते. त्यामुळे जननेंद्रियावरील केस काढावते कि काढू नये यासाठी एकवेळ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

(Disclaimer : ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नसून, ही माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. यामध्ये सांगितलेले उपचार किंवा सल्ला अंमलात आणण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)