Articles Featured Health

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मिळतात ‘हे’ ४ संकेत

 सजीव प्राण्यांना व अर्थातच मनुष्याला सुद्धा जिवंत राहण्यासाठी अन्ना सोबतच पाणी खूप आवश्यक असते. पाण्याने मनुष्याचे शरीर बनलेले आहे. पुरेसे पाणी पिणे हे शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी नितांत आवश्यक असते. दिवसभरामध्ये प्रत्येक मनुष्याने किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे. शरीराच्या गरजेइतके पाणी न पिल्याने डीहायड्रेशन सोबतच अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

दिवसभरामध्ध्ये किमान सात ते आठ ग्लास पाणी न पिणाऱ्या व्यक्तीस आळसावले पणा येणे, शरीरामध्ये ऊर्जा न राहणे, थकवा जाणवणे यासोबतच काही दीर्घ काळ चालणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरामध्ये पाण्याचे आवश्यक ते प्रमाण घेतले जात आहे की नाही नाही हे कसे ओळखता येईल हा प्रश्न निश्चितच निर्माण होतो .

जेव्हा आपल्या शरीरामध्ये पुरेसे पाणी सेवन केले जात नाही तेव्हा आपले शरीर काही संकेत देत असते. कोणत्याही पोषक मूल्यांची कमतरता शरीरामध्ये निर्माण झाल्यास शरीर कोणत्या न कोणत्या स्वरूपात यासंबंधीचे संकेत देत असते. आज आपण शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचे संकेत शरीराकडून दिले जातात हे पाहणार आहोत.

1) तोंडामध्ये लाळेचे उत्पत्ती करण्यामध्ये शरीरातील पाणी महत्त्वाचे भूमिका बजावते यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर तोंडातील लाळेचे प्रमाण सुद्धा कमी होते व परिणामी तोंडामधून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते .त्यामुळे जर आपल्या तोंडामध्ये दुर्गंधी निर्माण होत असेल तर आपल्या शरीरात पुरेसे पाणी सेवन केले जात नाही हे समजून घ्यावे.

2) शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा निरनिराळ्या स्वरूपात आपल्याला यासंबंधीचे संकेत मिळत असतात. जर लघवी करताना लघवीचा रंग पिवळसर असेल आणि लघवी करताना जळजळ होत असेल तर आपल्या शरीरामध्ये योग्य त्या प्रमाणात पाणी जात नाही हे स्पष्ट समजावे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने किमान एक ग्लास पाण्याचे सेवन करावे .शरीरामध्ये योग्य ते पाण्याचे प्रमाण राहण्यासाठी जास्तीत जास्त चार ते पाच लिटर पाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.

3) पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये काही दीर्घकाळ चालणा-या समस्या निर्माण होतात. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास सुद्धा निर्माण होतो .मात्र डोकेदुखीला अन्य कारणांमुळे निर्माण झालेला त्रास समजून बऱ्याचदा काही अँलोपँथिक औषधे घेतली जातात. मात्र यामुळे ही समस्या तात्पुरती दूर होते. यासाठी दिवसभरात किमान दहा ग्लास पाणी पिल्यामुळे डोकेदुखीचा त्रास तर दूर होतो मात्र शरीर सुद्धा निरोगी राहते.

4) पाण्याच्या कमतरतेमुळे पोटाचे विकार सुद्धा निर्माण होतात. गँसेस आणि अपचन हे पाण्याच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या साधारण समस्या आहेत .पोटातील गॅस दूर करण्यासाठी पाण्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. दिवसभरामध्ये आठ ते दहा ग्लास पाणी नक्कीच प्यावे व रोज सकाळी दिवसाची सुरुवात ही पाणी पिल्याने केली तर अजूनच चांगले होय.