Health

लोक चांगले सांगितल्यावर संशय घेतात आणि वाईट सांगितल्यावर विश्वास ठेवतात! जाणून घ्या मजेशीर मनोवैज्ञानिक तथ्य

लोक चांगले सांगितल्यावर संशय घेतात आणि वाईट सांगितल्यावर विश्वास ठेवतात! जाणून घ्या मजेशीर मनोवैज्ञानिक तथ्य

व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. जगभरात वेगवेगळ्या व्यक्तींचा स्वभाव, राहणीमान, धर्म, भाषा प्रांत वेगवेगळे असतात. मात्र माणसाचा स्थायीभाव आणि काही गोष्टींच्या प्रति विचार करण्याची पद्धत काही प्रमाणात सारखी आढळते. म्हणून बऱ्याचदा सर्व भौतिक गोष्टी वेगळ्या असल्या तरीही काही माणसांचे विचार पटकन जुळतात. हे माणसाच्या स्थायीभावाचे द्योतक आहे. माणसाच्या स्वभावाविषयी काही मजेशीर मनोवैज्ञानिक तथ्ये आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

नियमित हसणाऱ्या व्यक्ती : जो व्यक्ती विनोदी स्वभावाचा असतो अथवा जो नेहमी हसतमुख असतो अशा व्यक्ती मानसिकरीत्या खचलेल्या असतात असे आपण नेहमी ऐकतो. काही अंशी यामध्ये तथ्य आहे. कारण तज्ज्ञांच्या मते जो व्यक्ती जास्त हसतमुख राहू शकतो तो तेवढ्याच प्रमाणात वेदना किंवा दुःखदेखील सहन करू शकतो.

मत्सर किंवा हेवा : मनोवैज्ञानिक संशोधनानुसार मानवी स्वभावाविषयी एक महत्वाचे तथ्य समोर आले आहे. लोक तुमच्याविषयी स्तुती केली असता त्यावर संशय घेतात तर तुमच्याविषयी वाईट सांगितल्यावर लगेच विश्वास ठेवतात असे समोर आले आहे. याचे कारण म्हणजे इतर व्यक्तीविषयी मत्सर किंवा हेवा असणे असे असू शकते.

तुम्हीही यापैकी आहेत का? : बहुतांश लोकांच्या मनात ‘हा काळ रिवर्स केला तर किती बरं होईल’ असा विचार येतो. मात्र हा विचार फक्त ठराविक लोकांच्या मनात येत नसून जगभरातील जवळपास ९०% लोकांच्या मनात हा विचार येत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे भूतकाळात केलेल्या चुका सुधारण्याची संधी मिळावी हा विचार माणसाच्या मनात असतो.

राग : एखादी व्यक्ती तुमच्यावर छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवत असेल तर याचा अर्थ असा आहे कि त्या व्यक्तीला तुमची गरज आहे. अशा व्यक्तीला तुमच्याकडून जास्त अपेक्षा असतात. यामुळे तुमच्यावर छोट्यामोठ्या कारणांनी रागावणाऱ्या व्यक्तींचा राग किती प्रमाणात गंभीर आहे हे जाणून घ्या.

महिलांविषयी..: महिलांचा स्वभाव कुणालाच समजत नाही असे आपण म्हणतो. कारण महिलांचा स्वभाव मृदू, वात्सल्यपूर्ण वाटत असला तरी त्यांच्या स्वभावातील गूढ गोष्टींचा अंदाज लावणे कठीण असते. मात्र महिलांच्या स्वभाववैशिष्ट्यातील एक गोष्ट समोर अली आहे. महिला आपल्या संपूर्ण आयुष्यातील जवळपास एक वर्ष आज कोणते कपडे घालू हा विचार करण्यात घालवतात.