आपल्या आजूबाजूला निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात त्यांपैकी अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म  आणि अन्य उपयुक्त असे घटक असतात. फार पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये काही आजारांवर घरगुती औषध उपचार म्हणून  वनस्पती किंवा जडीबुटी यांचा वापर केला जातो अशाच काही वनस्पतींपैकी एक म्हणजे  रक्तचंदन होय. रक्तचंदनाचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस सँटॅलीनस हे आहे. रक्तचंदन हे फिलिपाइन्स व श्रीलंका या देशांमध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आढळून येते.

रक्त चंदन म्हणजे नेमके काय?

पांढऱ्या रंगाचे चंदन आणि रक्तचंदन यांच्यामध्ये बराच फरक असतो. पांढऱ्या चंदनाच्या झाडाला सुगंध असतो. पांढऱ्या चंदनाच्या लाकडांचा जो सुगंध असतो तो दूरपर्यंत पसरलेला असतो व काही प्रसंगी त्याच्या आजूबाजूच्या झाडांनाही चंदनाच्या झाडाच्या मुळा द्वारे सुवास काही प्रमाणात प्रसारित झालेला दिसून येतो. रक्तचंदनाच्या झाडाला सुगंध किंवा सुवास नसतो.

पांढर्‍या रंगाच्या चंदनाचा उपयोग त्याच्या सुवासिक गंधामुळे याच्या खोडा द्वारे तेल मिळवून या तेलातून निरनिराळी सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो व काही पदार्थांमध्ये सुद्धा सुवास येण्यासाठी पांढऱ्या चंदनाचा उपयोग केला जातो याउलट रक्तचंदन हे मुख्यत्वे सांधेदुखी किंवा सूज यांसारख्या दुखण्यावर उगाळून लावले जाते.

काय आहेत रक्तचंदनाचे फायदे?

चंदनाच्या संपूर्ण जगभरात एकूण पंधरा प्रजाती आढळून येतात यांपैकी एक म्हणजे रक्तचंदन होय. रक्तचंदनामध्ये चंदनाच्या अन्य प्रजाती प्रमाणेच अनेक औषधी गुणधर्म असतात.

रक्तचंदनाच्या झाडाच्या बहुपयोगी गुणधर्मामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते व ते बऱ्याच महाग किमतीमध्ये विकले जाते यामुळे काही प्रसंगी रक्त चंदनाच्या खऱ्या लाकडाऐवजी किंवा खोडाऐवजी अन्य झाडांचे खोडही लाल रंगाने रंगवून विकले जाऊ शकते मात्र खरे रक्तचंदन ओळखण्याची एक युक्ती म्हणजे रक्त चंदनाच्या खोडाची किंवा लाकडाची घनता खूप जास्त असते ज्यामुळे ते अन्य लाकडां प्रमाणे पाण्यावर न तरंगता पाण्याच्या खाली जाते.

रक्तचंदन हे प्रामुख्याने दक्षिण भारतातील पूर्व घाटावर आढळून येते. रक्त चंदनाचे लाकूड हे रक्ता प्रमाणे लाल रंगाचे असते.

रक्त चंदनाचे झाड हे साधारण आठ मीटर इतके उंच वाढते व कमी मातीच्या प्रदेशांमध्ये सुद्धा हे झाड उगवले जाऊ शकते हा याचा फायदा आहे.

चंदनाच्या झाडाची वाढ झपाट्याने होते .तीन वर्षांमध्ये रक्त चंदनाच्या झाडाची वाढ ही साधारण पाच मीटर इतकी होते.रक्त चंदनाच्या झाडाची साल खडबडीत असते तर खोड अत्यंत सरळ असते. या झाडाच्या पानांचा आकार छोटा असतो.

चंदनाचे लाकूड अत्यंत बहुउपयोगी प्रकारचे आहे.रक्त चंदनाच्या सर्व अंगांचा उपयोग निरनिराळ्या उद्देशांसाठी केला जातो. रक्त चंदनाचे लाकूड हे लेप करून मुका मार किंवा सांधेदुखीवर लावले जाते .निरनिराळ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा रक्तचंदनाचा वापर केला जातो. रक्तचंदनाच्या वापरामुळे त्वचेला एक प्रकारचे तेज व चमक मिळते. त्याचप्रमाणे त्वचेवरील पुरळ ,अँलर्जी ,मुरूम व त्वचेचा दाह सुद्धा कमी होतो.

रक्तचंदनाच्या पानांमध्येसुद्धा आरोग्यदायी गुणधर्म असतात. रक्तचंदनाच्या पानांमध्ये क्रूमी आणि जंतांचा नाश करण्याची क्षमता असते.

चंदनाच्या खोडा पासून बनवलेल्या बाहुल्या या निरनिराळ्या आकारांमध्ये अगदी फार पूर्वीपासून आपल्या घरांमध्ये दिसून येतात. या उगाळून घरगुती औषध उपचार जसे की  मुका मार ,त्वचेची जळजळ इत्यादींवर केला जातो. रक्त चंदनाच्या लाकडापासून फर्निचर, देव्हारे ,खेळणे सुद्धा बनवले जातात.