Health

आल्याचे आरोग्यासाठी हे आहेत १६ फायदे, ६ व्या फायद्या मध्ये आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता

अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती या आपल्या रोजच्या आहारामध्ये सामाविष्ट असतात. अशीच एक वनस्पती म्हणजे आले होय. चहामध्ये, भाज्यांमध्ये ,लोणच्यामध्ये आल्याचा वापर केला जातो. सकाळी आले घालून बनवलेल्या चहाने भारतातील अनेक जणांचा दिवस सुरू होतो. अशा या बहुपयोगी आल्याचा आजीबाईच्या बटव्यामध्ये निश्चितच सामावेश होतो. खूप पूर्वीपासून आपल्याला आल्याचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. अशाच अनेक औषधी गुणधर्म भरलेल्या बहुगुणी आल्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. आज आल्याचे फायद्यांबद्दल आपण काही तथ्य जाणून घेणार आहोत.

1) व्यायाम करतेवेळी शरीरातील स्नायू व मांस पेशी कधीकधी आखडल्या जातात.  यामुळे स्नायू व मांसपेशीमध्ये मोठ्या प्रमाणात वेदना निर्माण होतात. या वेदना दूर करण्यासाठी दररोज दहा दिवसांपर्यंत दोन ते तीन ग्राम आले सेवन केले तर वेदनांपासून आराम मिळू शकतो. आल्याच्या सेवनामुळे लगोलग स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळत नाही तर तर हळूहळू काही दिवसांनी याचा परिणाम दिसू लागतो.

2) थंडीच्या दिवसात निरनिराळ्या आरोग्याच्या समस्यांवर  आले हे अतिशय रामबाण असा उपाय आहे याबद्दल दुमत होऊ शकत नाही. आले सर्दी वर खूप उपायकारी ठरते. आल्याच्या रसामध्ये मध घालून त्याचे सेवन केले तर खोकल्यापासून आराम मिळतो .अशाप्रकारे मध आणि आल्याच्या रसाचे सेवन केले तर घशाच्या खवावण्यापासून बचाव होतो.
3) बराच व्यक्तिंच्या भूक लागत नाही अशा तक्रारी असतात अशा परिस्थितीमध्ये काही दिवस सातत्याने आल्याचे छोटे छोटे काप करून ते खाल्ले तर पोट व्यवस्थित साफ होऊन भूकसुद्धा व्यवस्थित लागते.

4) सध्या बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना भेडसावत असतात. पचनाशी निगडीत समस्यांवर चमत्कारिक पद्धतीने आले उपाय करते .ज्या व्यक्तींना अपचनामुळे मळमळल्यासारखे होते त्यांनी आल्याचा रस ,जिरे ,सैंधव मीठ आणि मध टाकून ते मिश्रण सेवन केल्यास निश्चितच आराम मिळतो. आल्याचा रस, लिंबू, जिरे आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण सेवन केल्यास करपट आंबट ढेकर येणे थांबते व यामुळे अपचना मुळे होणाऱ्या उलट्या सुद्धा थांबतात.आल्याचा रस आणि कांद्याचा रस एकत्र करून या मिश्रणाचे थोड्या प्रमाणात सेवन केल्यास पचनाच्या समस्या निश्‍चितच कमी होतात.

5) आल्याचे मूळ गुणधर्म वेदना शामक आहेत यामुळे शरीराच्या कोणत्या भागावर सूज आली किंवा वेदना होत असेल  तर त्याठिकाणी आल्याचे मिश्रण आणि कापूर यांचा लेप करून लावला तर त्या ठिकाणची सूज कमी होऊन वेदना सुद्धा दूर होतात हा उपाय मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनांना सुद्धा दूर करू शकतो.

6) आल्या मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची क्षमता असते तसेच ते एक उत्तम एंटीऑक्सीडेंट सुद्धा आहे. आल्याच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते व रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत झाल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल निर्माण होण्याची शरीराची प्रवृत्तीही नियंत्रणात आणली जाते.

7) शरीरातील हाडांचे स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी आल्याचे आलेपाक अशा स्वरूपातील नियमित सेवन करणे नेहमीच उपयुक्त असते.
8) शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आले हे खूपच उपकारक ठरते. दातांच्या समस्या दूर करण्यामध्ये सुद्धा आले अतिशय प्रभावी ठरते. दातांमध्ये जमा होणाऱ्या हानीकारक बँक्टेरियांना आल्याच्या सेवनामुळे नष्ट केले जाते आणि मुखदुर्गंधीलाही  दूर ठेवले जाऊ शकते.
9) काही संशोधनांमध्ये आले हृदय विकारांवरही अत्यंत प्रभावी असा उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे.आले आणि पाणी  एकत्र करून त्याचे सेवन केले असता ह्रदय मधील रक्ताभिसरण उत्तम पद्धतीने चालू राहते व यामुळे हृदयविकारां पासूनही बचाव होतो. शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्यापासून बचाव केला जातो.

10) स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये आले अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. महिलांमध्ये सध्या गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या उत्प्रेरक पेशींपासून आल्याचे नियमित सेवन केल्यास बचाव होऊ शकतो.
11) पित्त.उद्भवणे हेसुद्धा एक आजकालची खूप मोठी समस्या बनली आहे .पित्त उद्भवल्यास बेचैन होते ,आजारी पडल्यासारखे वाटते अशा परिस्थितीत पाच ग्राम आले व पाच ग्राम डाळिंबाचा रस एकत्र करून पिल्यास पित्ताच्या समस्येपासून आराम मिळतो.
12) स्त्रियांप्रमाणे पुरुषांना सुद्धा आल्याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. रोज आले घालून केलेला एक कप चहा पिला तरी  पुरुषांमधील प्रजनन क्षमता काही प्रमाणात वाढते असे संशोधनात आढळून आले आहे.
13) त्वचेवरील चमक कायम राहावी असे प्रत्येकाला वाटत असते .आले हे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण वनस्पती मानले जाते.रोज सकाळी थोड्या पाण्यासोबत आल्याचा छोटा तुकडा खाल्ला तर आपल्या त्वचेवरील तेज द्विगुणित होते.
14) आल्या मध्ये ऑंटी फंगल गुणधर्म असतात यामुळे त्वचेवर उठणारे पुरळ ,एलर्जी इत्यादींना दूर राखण्यास साहाय्य मिळते.
15) आल्या मध्ये तणाव आणि कंटाळा घालवण्याचे गुणधर्म आहेत असे मानले जाते व यामुळे कदाचित आपल्याला कधी कंटाळा आला तर एक आल्याचा चहा आपण नक्की घेतो.

16) असे इतके सारे फायदे आल्यामध्ये निश्चितच आहेत मात्र तरीही उन्हाळ्यात आल्याचे सेवन हे कमीच करावे कारण आल्यामध्ये उष्णता अधिक असते. तसेच ज्या व्यक्तींना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी आल्याचे फायदे आपल्या शरीराला मिळवून देण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांसोबत चर्चा करावी.  आले सेवनामुळे अँसिडीटीची समस्या उद्भवू शकतात  त्यामुळे अशा व्यक्तींनी आपल्या प्रकृतीनुसार आल्याचे सेवन किती करावे याची मात्र निश्चित करावी.