Home » शरीरातील थकवा दूर करण्यासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर नक्की करून पाहा…
Health

शरीरातील थकवा दूर करण्यासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर नक्की करून पाहा…

संपूर्ण दिवसभर काम केल्यानंतर किंवा धावपळ जागरण झाल्यानंतर थकवा येणे हे खूपच सर्वसाधारण मानले जाते मात्र वारंवार थकल्या सारखे वाटणे,शरीरामध्ये ऊर्जा नसल्याची भावना निर्माण होणे हे निश्चितच सर्वसाधारण नाही.वारंवार थकल्या च्या भावनेमुळे केवळ मानसिक दृष्ट्या निराश झाल्यासारखे वाटत नाही तर शारीरिक दृष्ट्या सुद्धा संबंधित व्यक्तीला कमजोरपणा निर्माण होतो.

थकल्याची भावना निर्माण होणे यामागे विविध प्रकारची कारणे सांगितली जातात.आज आपण थकवा दूर करण्यासाठी घरच्या घरी अवलंबता येऊ शकणारे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.आधुनिक काळामध्ये धावपळीच्या युगात कमजोरी किंवा थकवा निर्माण होणे ही सर्वात मोठी समस्या मानली जाते.थकवा आल्यामुळे आणि इच्छाशक्ती असूनही व्यक्ती काळाच्या मागे राहते.

थकवा निर्माण होण्याच्या समस्येला अगदी सहजपणे न घेता पुढील उपाय अवलंबून पाहणे फायदेशीर ठरते…

१) मसाल्याचे पदार्थ : आपणास हे बर्‍याचदा माहीत नसते की घरामधील मसाल्याच्या डब्यात असणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर करुन आपल्याला वारंवार निर्माण होणारी थकव्याची भावना दूर केली जाऊ शकते.मसाल्याच्या पदार्थांद्वारे कशा प्रकारे नैसर्गिकरित्या थकवा दूर केला जाऊ शकतो हे आपण पाहणार आहोत.मसाल्याच्या पदार्था पैकी एक कपभर काळे मिरे पाव कप जिरे,मिरे,लवंग,दालचिनी हे पदार्थ वेगवेगळे भाजून घेऊन व्यवस्थित पावडर करावी व ही एक टीस्पून पावडर पाण्यात उकळून घ्यावी त्यामुळे निर्माण होणारा थकवा नाहीसा होऊ शकतो.

२) खजूर : खजूर हे बलवर्धक आणि शक्तिवर्धक मानले जाते. तंदुरुस्तीसाठी आणि थकवा दूर करण्यासाठी पुरातन काळापासून खजूरचा वापर केला जात आहे.थकवा दूर करण्यासाठी खजूर कशा प्रकारे वापरले जाऊ शकते ते आपण पाहूया.सात ते आठ खजूर पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालावेत व सकाळी हे खजूर बारीक वाटून दूधासोबत घ्यावे यामुळे थकवा दूर होतो.हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा घेतले तर निश्चितच नैसर्गिकपणे थकवा दूर झाल्याचे दिसून येते.दररोज सुद्धा एक ते दोन खजूर दुधा सोबत घेतले असता आपल्याला ताजेतवाने वाटते.

३) मसाला चहा : थकवा आणि तणाव या समस्यांवर मसाला चहा सुद्धा खूप प्रभावकारी ठरतो असे दिसून आले आहे.मसाला चहा शरीराला ताजेतवाने आणि स्फूर्तीदायक करतो असे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे.मसाला चहामध्ये असलेल्या टॅनिनमुळे शरीरातील थकवा नैसर्गिक पणे दूर केला जातो.मसाला चहाचे शहरातील थकवा दूर करण्या सोबतच अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

४) आयुर्वेदिक भाज्या : शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सुद्धा सांगितले जातात.शेवग्याच्या शेंगा या भाजीमध्ये शरीरातील थकवा दूर करण्याचे गुणधर्म असतात.शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये उकळून या पाण्याचे सलग काही दिवस सेवन केले असता थकवा नैसर्गिकपणे दूर होतो.कोरफड मध्ये सुद्धा थकवा दूर करण्याचे गुणधर्म असतात.थोड्याशा कोरफडीच्या गरामध्ये चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण सलग काही दिवस सेवन केले असता थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते.

५) व्यायाम : कायमस्वरूपी थकवा घालवण्यासाठी व नेहमीच उत्साहपूर्ण वाटण्यासाठी व्यायामाची सुद्धा शरीराला नितांत आवश्यकता असते.दररोज सकाळी उठल्यावर नियमितपणे काही मिनिटे व्यायाम केला असता मानसिक तणाव व थकवा दूर होतो.व्यायाम म्हणजे कसरतीचे व्यायाम असे नव्हे तर बागकाम,चालणे,सायकलिंग यासारख्या शरीराला हालचाल घडवून आणणाऱ्या प्रकारांचा अवलंब केला तरीही चालतो.