कमरेवर पडणाऱ्या या दोन खळ्यांचा अर्थ काय होतो? याला का भाग्यशाली समजलं जातं?

कमरेवर पडणाऱ्या या दोन खळ्यांचा अर्थ काय होतो? याला का भाग्यशाली समजलं जातं?

अनेकांच्या कमरेला मागील बाजून दोन छोट्याशा आकाराच्या खळ्या पडतात. याविषयी अनेकांना कुतूहल दिसून येते. या खळ्या का पडतात? यांचा उपयोग काय? अशा खळ्या असणं भाग्यशाली असत का? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांच्या मनात घर करून उभे असतात. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण कमरेवर मागच्या बाजूस पडणाऱ्या या दोन खळ्यांविषयी माहिती पाहणार आहोत.

खरंतर कमरेवर अशा खळ्या असणं चांगल्या नशिबाचं द्योतक मानलं जातं. इंग्रजीमध्ये या खळ्यांना ‘विनस डिंपल’ असेही म्हटले जाते. ‘रोम’मधील सुंदरतेची देवी मानल्या जाणाऱ्या ‘विनस’ या देवीच्या सौंदर्याच्या संदर्भाने या खळ्यांचे वर्णन केले जाते. कमरेवर अशा खळ्या असणाऱ्या महिलांना सौंदर्यपूर्ण मानले जाते.

या खळ्या ओटीपोटीच्या जवळच असल्यामुळे यांना ‘अपोलो होल्स’ असेही म्हटले जाते. या खळ्या निसर्गाची देण असतात. त्या कृत्रिमरीत्या बनवता येत नाहीत.

ज्योतिषशास्त्रात विनस अर्थात शुक्राला सौंदर्य आणि कामेच्छेचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे या खळयांनादेखील ‘विनस डिम्पल’ म्हटले जातं असल्याने, या खळ्यांचे सौंदर्य आणि कामशास्त्राच्या दृष्टीनेदेखील मोठे महत्व सांगितले जाते. ज्या महिलांच्या कमरेला या खळ्या असतात त्या महिला लैंगिक जीवनाचा परिपूर्ण आनंद घेतात.

कमरेवर अशा खळ्या कृत्रिमरीत्या किंवा व्यायाम करून पाडता येत नाहीत. त्या नैसर्गिकरीत्याच शरीरावर असतात. मात्र त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असतीलच असे नाही. शरीराच्या काही भागांमध्ये मांसपेशींचा विकास न झाल्यामुळे शरीरातील त्वचा आणि स्नायू खेचले जातात आणि अशा प्रकारचे खड्डे/खळ्या निर्माण होतात असे कारण यामागे सांगितले जाते.