Health National News

‘लशीमुळेही नष्ट होणार नाही कोरोना’, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा खुलासा

WHO
WHO

कोरोनाच्या संकटाने सर्वांनाच धारेवर धरले आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात याचे संकट मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात उपाययोजना करत असून नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. काहीजण याची काटेकोरपणे काळजी घेत आहेत मात्र काही नागरिक जीवाशी खेळताना दिसून येत आहेत. अनेकजण सरकारच्या सूचनांचे पालन करताना दिसून येत नाहीत. यामुळे ते स्वतः संकटात येत आहेतच मात्र दुसऱ्यांना देखील संकटात टाकत आहेत.

कोरोनावर लवकरच लस येण्याची अपेक्षा जगभरातील नागरिक व्यक्त करत आहेत. अनेक देशांमध्ये या लसीची चाचणी सुरु असून काही देशांची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र यामध्ये आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडॅनॉम यांनी हि लस लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र याचबरोबर त्यांनी एक काळजी देखील व्यक्त केली आहे. कोरोनाची लस लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्याबरोबरच सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे आणि ते मिळेल असेही दिसत नाही आहे, असे सांगितले. WHO ने सोमवारी म्हटले आहे की, COVID-19 टाळण्यासाठी लस तयार करण्याची शर्यत तीव्र झाली असली तरीही कोरोनावर कोणताही ‘रामबाण उपाय’ कदाचित कधीच मिळू शकणार नाही. WHOने असेही म्हटले आहे की भारतासारख्या देशात ट्रान्समिशनचे दर खूप जास्त आहेत आणि त्यांनी दीर्घ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे.त्यामुळे ता त्यांच्या या वक्तव्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

संचालक टेड्रोस यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोनावर कोणताही ठोस उपचार नाही. बहुधा कधीच होणार नाही. मात्र आपण यावर मात नक्कीच करू शकतो. कोरोनाची परिस्थिती गंभीर असून याला सामान्य होण्यास वेळ लागणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर ते म्हणाले कि, कोरोना कधीही संपू शकत नाही आणि त्याबरोबर जगायला शिका. टेड्रोस म्हणाले की कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जगभरातील लोक सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे आणि मास्क घालत आहेत आणि हे सुरू ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत जगभरात एक कोटी ८१ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दरम्यान, लस मिऴाल्यानंतरही कोरोना संपेल, असे नाही’ असेही टेड्रोस यांनी स्पष्ट केले. अनेक देशांच्या लसीची चाचणी हि तिसऱ्या टप्प्यात आहे. हि लस लोकांना संसर्गापासून वाचवेल अशी अपेक्षा आहे. मात्र यावर अद्याप कोणतेही निश्चित औषध नाही आणि असेही शक्य आहे की ते कधीही सापडणार नाही. अशा परिस्थितीत, आपण टेस्ट, आयसोलेशन आणि मास्कद्वारे कोरोना थांबविण्याचे कार्य चालू ठेवूया. त्याचबरोबर आम्हाला माहित आहे की वृद्ध वय असलेल्यांपेक्षा मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी असतो, परंतु असे बरेच रोग आहेत जे मुलांना जास्त धोका देऊ शकतात आणि स्तनपानामुळे असे आजार रोखले जाऊ शकतात”. दुसरीकडे लवकरात लवकरत लस मिळेल अशी आशाही टेड्रोस यांनी यावेळी व्यक्त केली.त्यामुळे आता त्यांच्या या विधानानंतर लस आल्यानंतर काय परिणाम पाहायला मिळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

About the author

Being Maharashtrian