Health

तुळशीची पाने चावून का खाऊ नयेत ? काय आहे यामागील कारण ,जाणून घ्या सविस्तर

तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरातील अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती. तुळशीचे पाने खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. परंतु आपल्याला माहीत आहे का तुळशीचे पाने चावून खाल्ली जात नाहीत. तुम्ही विचार कराल काय हे कारण काहीही. हो हे अगदी खर आहे. तुळशीचे पाने चावून खाऊ नयेत ती चगळावीत कारण यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे. ते कारण आणि या बरोबरच धार्मिक कारण देखील आहे. ते आपण जाणून घेणार आहोत.  

तुळशीचे पाने चावून का खाऊ नयेत – शास्त्रीय कारण जर तुम्ही तुळशीची पाने चावून खात असाल तर तुमचे दात खराब होऊ शकतात, यामागे असे कारण आहे की तुळशीच्या पानात खूप जास्त प्रमाणात पारा आणि आयन असतात. जे आपल्या दातासाठी हानिकारक ठरू शकतात. या बरोबरच तुळशीचे पाने नैसर्गिक रित्याच आम्ल युक्त असतात ,त्यामुळे तुमच्या दाताला इजा होऊ शकते. आणि खूप जास्त प्रमाणात जर तुळशीचे पाने खाल्ली तर तुमचे दात आंबू शकतात. त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या तुळशीची पाने चावून खाऊ नयेत . आता पाहू या धार्मिक दृष्ट्या तुळशीची पाने का चावून खाऊ नयेत. तुळशीला हिंदू संस्कृतीत देवी समान मानले आहे. आपण तुलसी मातेची पूजा करतो. या बरोबरच तुलसी माता ही विष्णूची पत्नी आहे. त्यामुळे आपण तुळशीची पाने चावून खात नाहीत.

तुळशीची पाने  एका ग्लासात पाने घेऊन ती पण्यासोबत पीवून टाकावीत. म्हणजेच गिळून टाकावीत. जर तुम्हाला चहा आवडत असेल तर चहामध्ये देखील तुळशीची पाने टाकून चहा पीवू शकता. जर तुम्ही हर्बल टी पित असाल तरी देखील तुम्ही त्यामध्ये चहा टाकून पीवू शकता. पूजेसाठी तुळशीची पाने वापरली जातात. पंढरपूरच्या विठोबाला तर तुळशीच्या माळा खूप प्रिय  आहेत.  तुळशीच्या झाडातून  ऑक्सीजन  खूप मोठ्या प्रमाणातून मिळतो ,त्यामुळे प्रत्येक घरासमोर तुळशीचे रोपटे लावले जाते. वातावरण शुद्ध करते. सध्या प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे ,तुळस मात्र प्रदूषण कमी करण्यास मदत करते. घराच्या बाहेर तुळशीचे रोपटे लावण्यामागेच एक कारण हे देखील आहे ,तुळस बाहेरून किंवा घरांमध्ये देखील काही नकारात्मक शक्ती असतील तर त्यांना दूर ठेवते.  आयुर्वेदात तर तुळशीला खूप महत्व देण्यात आले आहे. अनेक औषधासाठी देखील तुळशीची पाने वापरली जातात. ‘ सर्दी -खोकला येत असेल तर तुळशीच्या पानाचा अर्क उपयुक्त ठरतो. डोके दुखी कमी करतो.  एलर्जी ची  समस्या कमी होण्यास मदत होते.  तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो ,त्यामुळे तुळशीची पाने  जास्त चावून खाऊ नयेत. तुळशीच्या पानांमुळे घरात मच्छर ,डास होत नाहीत.  तुळशीत प्रतिजैविके आणि वेदनानाशके असतात त्यामूळे तापावर तूळसपाने खाल्ल्यानेही आराम मिळतो)तोंडातील सूज व फोड तूळस खाल्ल्याने बरे होतात . मुखाच्या कर्करोगासाठी तुळशीची पाने खाणे आरोग्यास लाभदायक मानले जाते.)दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे, या सर्वांवर केल जातो. तूळस पाने 5,10 मिनीटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो.पहाटे निर्जळी 4,5 तुळशीची पाने खाल्ल्यास मुतखडा शरीराबाहेर टाकला जातो. तुळसपाने चावल्यामुळे लघवीत त्रास होत नाही.

स्त्रियांच्या खाजगी जागांवरील विविध संक्रमणासाठी तुळसपानांच्या लेपाचा वापर होतो. तुळशीच्या पानांनी अंघोळ केल्यास त्वचा टवटवीत होते. तसेच त्वचेवर संक्रमण होत नाही.केसांच्या तेलात तुळसतेल मिसळून त्याने केसाची मालीश केल्यास डोकेदुखी कमी होते. तुळशीतील कॅम्फेन, किनोल, यूग्नोल, कार्वक्रोल आणि मिथाईल चााविकोल या औषधीय घटकांमुळे डोकेदूखी कमी केल्या जाते.डोळयांमध्ये संक्रमण झाल्यास त्यांना तुळसपानांनी धूतल्यास डोळयातील संक्रमण बरे होते. डोळयांची सूज, आणि डोळे जळजळीवर तूळसतेल डोळयांत 2,3 थेंब टाकल्यास डोळे निरोगी होतात.पाणी स्वछ करण्यासाठी तुळशीच्या  पानांचा रस खूप उपयुक्त ठरतो. आता तुळशीच्या पानांचा अर्क काढलेला ड्रॉप देखील मिळतो. तो देखील तुम्ही वापरू शकता. जठराचे दुखणे, डांग्याखोकला, काॅलरा, हातपायामधील दुखणे या सर्वांवर चांगले वेदनानाशक मानले जाते )तुळस आपल्या शरीरासाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. ताजी तुळशीची पान रोज सकाळी गिळल्यास शरीराचं ईम्यून सिस्टम चांगलं राहतं