History

…म्हणून मुगलांच्या हरम मध्ये हिजड़े ठेवले जात असत

जोधा-अकबर आणि पद्मावत  सारख्या तत्सम चित्रपटांमधून  किंवा अकबरावर आधारित सिरिअल्स यातून आपण बघितलं  की  लक्षात येतं  की  

त्या काळात या मुघल राजांना राज्य विस्तारासाठी आणि राज्य सुरक्षेसाठी अनेक राण्या करण्याची मुभा होती .  त्याचबरोबर लढाईत जिंकलेल्या स्त्रिया ही  कालांतराने या हरम  किंवा अंतःपुरात समाविष्ट होतं . 

त्यामुळे एका-एका राजाच्या हरम  मध्ये हजारो राण्या असत. आणि या राण्यांच्या सुरक्षेसाठी पुरुष अथवा स्त्रिया नव्हे तर तृतीयपंथी नेमलेले असत. त्यामागे काही विशिष्ट कारणे  होती ती अशी :

१) ह्या तृतीयपंथीयांना स्वतःचा परिवार किंवा आयुष्य नसल्याने राजा आणि त्याचा परिवार  ह्यांच्याशी हे सेवक मरेपर्यंत एकनिष्ठ राहत . 

२) खूप स्रिया आणि त्याही एका जागी म्हटल्या की  भांडणे , कटकारस्थाने ही  आलीच त्यामुळे त्यांना सांभाळण्यासाठी हे शरीराने धष्टपुष्ट तृतीयपंथी कामास येत शिवाय स्त्रियांना त्यांच्या सोबत बोलताना किंवा त्यांच्यासोबत कुठेही जाताना काहीही धोका जाणवत नसे . याउलट त्यांना तृतीयपंथी असल्याने जास्त मोकळं  वाटे. 

३) आणि याहूनही अतिशय महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राजा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा एका राणीकडे जाऊ शके , या वैफल्याने ग्रस्त होऊन , त्या राणीने दुसऱ्या कुठल्याही पुरुषाशी संधान बांधून , राजाला धोका निर्माण करू नये यासाठीही हे तृतीयपंथी बारीक लक्ष ठेवून राहत.