…म्हणून लग्न करताना मूली उंच मुलांची जोडीदार म्हणून निवड करतात, जाणून घ्या शास्त्रीय कारण

असे म्हटले जाते की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात मात्र तरीसुद्धा विवाहासाठी  वधू किंवा वर संशोधन करत असताना आपण सर्वप्रथम आपल्याला हव्या असलेल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा मांडल्या जातात. प्रत्येकाला सुस्वरूप, दिसायला आकर्षक, सुशिक्षित अशा सर्वसाधारण अपेक्षा आपल्या जोडीदाराविषयी असतात. सध्याच्या काळामध्ये मुलींना जेव्हा जोडीदाराबद्दल  अपेक्षा विचारल्या जातात तेव्हा हुशार, वेल सेटल्ड, समंजस, सामाजिक वर्तुळामध्ये प्रतिष्ठा व. मान असलेल्या मुलाला पसंती दिली जाते.

याबरोबरच बऱ्याचदा मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांकडून मुलाच्या उंचीला सुद्धा तितकेच महत्त्व दिले जाते. बहुतांश विवाहित जोडप्यांमध्ये पत्नीची उंची ही पतीपेक्षा कमी असल्याचे दिसून येते याला कारण म्हणजे विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना मुलींकडून आपल्यापेक्षा उंची जास्त असलेल्या मुलांची निवड केली जाते तर मुलांकडून आपल्यापेक्षा कमी उंचीच्या मुलीची निवड केली जाते याला निश्चितच काही अपवाद असू शकतात मात्र सर्वसाधारणपणे फार पूर्वीपासून विवाहा मध्ये वराची उंची ही वधू पेक्षा जास्तच असते. मुलींकडून आपल्यापेक्षा जास्त उंची असलेल्या मुलाची जोडीदार म्हणून निवड का केली जाते याची काही सर्वसाधारण कारणे आज आपण पाहणार आहोत.

 विवाह करताना वराची उंची ही वधू पेक्षा जास्त असावी या समजाचे मूळ हे उत्क्रांतिवादाच्या सिद्धांता मध्ये आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांत अनुसार जो प्राणी सर्वात बलशाली असेल, सामर्थ्यशाली असेल तोच या जीवन जगण्याच्या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो.उत्क्रांतीच्या टप्प्यापासून शारीरिकदृष्ट्या उंच ताकदवान असलेला मनुष्य हा आपल्या स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे कोणत्याही आपत्ती पासून संरक्षण करू शकतो असे मानले जाते. उत्क्रांतीच्या काळामध्ये आपल्यासाठी व कुटुंबियांसाठी जंगलात जाऊन फळे आणि जनावरांची शिकार करणे इत्यादींसाठी शारीरिक दृष्ट्या उंची जास्त असलेला नर अधिक शक्तिशाली मानला जात असे व सध्याच्या आधुनिक काळामध्ये शिक्षण ,पैसा या निकषांच्या बरोबरीने उंच जोडीदाराला प्राधान्य देण्याचा समज तसाच टिकून असल्याचे दिसते.

शारीरिकदृष्ट्या आकर्षक दिसणे यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे निकष असतात. पुरुषांच्या बाबतीत बहुतांश मुली उंच पुरुषांना कमी उंचीच्या मुलांपेक्षा तुलनात्मकद्रुष्ट्या जास्त आकर्षक मानतात. एका सर्वेक्षणाच्या आधारे काही मुलींच्या मते अगदी हाय हिल्सची चप्पल घालूनही आपल्या जोडीदारा पेक्षा काही इंच कमी उंची असणे हे खूप कम्फर्टेबल फिलिंग आहे. आपल्या पती पेक्षा कमी उंची असल्यानंतर एक प्रकारच्या सुरक्षिततेची भावना चारचौघांमध्ये वावरताना निर्माण होते असेही काही स्त्रियांना वाटते.

समाजातील काही स्तरांमध्ये उंची आणि बुद्धिमत्तेचा ही परस्पर संबंध असतो असे मानले जाते. याचा अर्थ उंचीने जास्त असलेल्या व्यक्ती या बुद्धिमान व हजरजबाबी असतात असे काही भागांमध्ये मानले जाते व या समजा पोटी विवाहासाठी वरसंशोधन करताना उंचीने जास्त असलेल्या पुरुषाची निवड केली जाते मात्र यासाठी कोणताही शास्त्रीय आधार अद्याप मिळालेला नाही यामुळे उंचीने कमी असलेल्या सर्वच व्यक्ती या बौद्धिक दृष्ट्या कमी असतात असे मानणे चुकीचे आहे.

उंचीचा संबंध हा सामाजिक वर्तुळातील स्थान व प्रतिष्ठेशी सुद्धा असतो.शारीरिकदृष्ट्या उंच असलेल्या व्यक्ती या अधिक अधिकारवाणीने बोलणाऱ्या आणि सामाजिक प्रसंगांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या असतात असे मानले जाते. यामुळे सामाजिक ठिकाणी सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या, कोणताही न्यूनगंड न बाळगता समायोजन करू शकणाऱ्या जोडीदाराला निवडण्यास मुली व स्त्रिया प्राधान्य देतात.

आपल्यापेक्षा जास्त उंची असलेला मुलगा किंवा पुरुष जोडीदार म्हणून निवडण्यामागे स्त्रियांच्या मानसिकतेचे मूळ हे समाजातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या रुढी परंपरा आहे. समाजाने जोडीदाराची निवड करताना रंग, उंची, शारीरिक ठेवण ,आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सोबतच शारीरिक उंचीला अवास्तव महत्व दिले जाते यामुळे कमी उंचीच्या मुलासोबत लग्न करून समाजाच्या हेटाळणीचा विषय ठरणे कोणत्याही मुलीला नकोसे वाटते त्याचप्रमाणे मुलांनासुद्धा आपल्यापेक्षा जास्त उंची असलेल्या मुली सोबत  लग्न करणे हे मित्रमंडळींमध्ये चेष्टेचा विषय ठरू शकतो अशी भीती वाटते.

कोणताही विवाह सुखी व सामंजस्याने टिकणारा असावा यासाठी शारीरिक उंची जास्त असावी असे कोणतेही शास्त्रीय आधारावर सिद्ध झालेले नाही.कोणताही विवाह टिकण्यासाठी जोडीदारांचे परस्परांतील सामंजस्य, प्रेम, विश्वास आणि त्याबरोबरीनेच त्यांच्या दोघांच्याही कुटुंबीयांची चे एकमेकांसोबत वर्तन आणि संवाद हे घटक महत्त्वाचे असतात. अशावेळी शारीरिक उंची हा केवळ एक आकडा ठरतो असे सुद्धा काही विवाहां मध्ये दिसून आले आहे ज्यामध्ये वराची उंची ही वधू पेक्षा कमी असते.