Home » एक रहस्य बनून राहिलेल्या राणी पद्मिनी विषयीची ही रंजक तथ्य तुम्हाला आजही माहित नसेल…
History

एक रहस्य बनून राहिलेल्या राणी पद्मिनी विषयीची ही रंजक तथ्य तुम्हाला आजही माहित नसेल…

इतिहासातील अनेक घटना किंवा व्यक्तींबद्दल आपण ठामपणे या गोष्टी घडल्या आहेत किंवा अस्तित्वात होत्या याविषयी भाष्य करू शकत नाही कारण इतिहासा मधील घटना या कालानुसार विविध मार्गाने मांडत गेलेल्या आहेत.इतिहासामधील अनेक पात्र ही सुद्धा विविध प्रकारे आपल्यासमोर मांडली गेली आहेत.त्यामधून अनेक मिथकांना ही जन्म मिळाला आहे.असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे राणी पद्मावती होय ज्यांना राणी पद्मिनी म्हणूनही ओळखले जाते.राणी पद्मिनी विषयी सांगितली जाणारी मिथके म्हणजे रतन सेनने राणी पद्मावती ला तलवारबाजीमध्ये हरवले व ठरलेल्या अटी प्रमाणे पद्मावती ला रतन सिंह सोबत विवाह करावा लागला.

काही मिथके असे सांगतात की  राणी पद्मावती कडे बोलू शकणारा पोपट होता व या पोपटा मुळे या दोघांची भेट घेऊन त्यांचा विवाह होऊ शकला.पद्मावती विषयी सध्याच्या काळातही सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या कथा प्रसारित केल्या जातात.मात्र या सर्व कथांमधून एकच गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते ती म्हणजे राणी पद्मावती ही एक अत्युच्च सौंदर्य प्राप्त झालेली राणी होती व चितोड गड मध्ये असलेल्या जोहार कुंडामध्ये राणी पद्मावती ने जोहार केले होते व त्यामुळे तिला देवीतृवाचा दर्जा प्रदान करण्यात आला.ही घटना‌ पहिल्या तीन शतकामधील होती व जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने महाराजा रतन सेनला पराभूत केले. त्यावेळी स्वतःचे पावित्र्य भंग पावू नये यासाठी राणी पद्मावती ने स्वतःला जोहार कुंडात भस्म करून घेण्याचा निर्णय घेतला.

इतिहासातील या घटना आजच्या काळामध्ये जेव्हा कलेच्या माध्यमातून समोर येतात तेव्हा त्यामध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य नुसार किंवा एखादा विचार अधिक चांगल्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून काही बदल केले तर समाजाच्या अस्मिता दुखावल्या जातात व सर्वत्र याचे पडसाद उमटतात.म्हणूनच यावेळी संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाने ‘पद्मावत’ हा राणी पद्मावती व राजा रतन सिंह व अल्लाउद्दीन खिलजी यांच्यावर आधारित चित्रपट बनवला तेव्हा यामधील काही संदर्भ हे इतिहासाला धरून नसल्याचे सांगत अनेक धार्मिक संघटनांनी आंदोलने केली व संजय लीला भन्साळी वर हल्ला सुद्धा केला.

संजय लीला भन्साळीच्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला असला तरीही राणी पद्मावती च्या संदर्भात इतिहास व साहित्यामध्ये जे दाखले दिले गेले आहेत ते सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हे इथे लक्षात घेणे गरजेचे ठरते‌.या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट अतिशय रंजक आहे ती म्हणजे ज्या वेळी मोहन अल्लाउद्दीन खिलजीने चीतोडगड वर हल्ला केला त्यावेळी साहित्यामध्ये राणी पद्मावती चा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही.राणी पद्मावती चा उल्लेख हा सर्वात प्रथम अवधी भाषेमध्ये मलिक मोहम्मद जैसी यांनी लिहिलेल्या पद्मावत या काव्यामध्ये पाहावयास मिळतो.

पद्मावत या काव्यामध्ये मलिक मोहम्मद जैसी ने राणी पद्मावती या मूळच्या सिंघल साम्राज्याच्या राजकन्या होत्या असे सांगितले आहे.हे साम्राज्य पूर्वीच्या श्रीलंकेमध्ये येते.राणी पद्मावती यांची एका पोपटा सोबत खूप घनिष्ठ मैत्री होती तो पोपट बोलू शकत असे.राणी पद्मावती ची या पोपटासोबतची घनिष्ठ मैत्री त्यांच्या वडिलांना मान्य नव्हती व त्यांनी या पोपटाला मारून टाकण्याचे आदेश दिले.यानंतर हा पोपट उडत उडत निसटून महाराजा रतन सेनकडे पोहोचला.पद्मावतीच्या बोलू शकणाऱ्या पोपटाने रतन सेन जवळ पद्मावतीच्या सौंदर्याची तारीफ केली व यामुळे पद्मावतीच्या सौंदर्याला न पाहताच रतन सेन लुब्ध झाला व त्याने पद्मावती सोबत विवाह करण्याचे ठरवले.त्याप्रमाणे तो सिंघल राज्यामध्ये गेला.सुरुवातीला या दोघांची सहजपणे भेट होऊ शकली नाही मात्र येनकेन प्रकारे या दोघांची भेट झाली व या दोघांचा विवाह संपन्न झाला.मात्र यामुळे रतन सेन यांची पहिली पत्नी नागमती व पद्मिनी यांच्यामध्ये कायमच वितुष्ट आले.

राघव चैतन्य हा रतन सेन च्या दरबारात आचार्य होता.दराबाराच्या कामात फसवणूक केल्याप्रकरणी रतन सेनने राघव चैतन्य ला राजदरबार सोडून जाण्यास सांगितले.रतन सेनने हाकलून दिल्यावर राघव चैतन्य अल्लाउद्दीन खिलजी कडे गेला.राघव चैतन्यने  अल्लाउद्दीन खिलजी कडे पद्मिनीच्या सौंदर्याची  भरभरून प्रशंसा केली.त्यामुळे पद्मावतीला जिंकून घेण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी ने चित्तोर्गड वर हल्ला केला मात्र त्यात यश आले नाही व त्याने खोटा शांती तह रतन सेन सोबत केला व नंतर त्याला धोका दिला व  कैदीही बनवले.यावेळी रतन सेनला त्यांच्या काही विश्वासू लोकांनी खिलजीच्या ताब्यातून सोडवले.रतन सेनने सुटका करून घेतल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी खूपच चिडला व त्याने पुन्हा एकदा यावेळी चित्तोडगडवर हल्ला केला.नागमती आणि राणी पद्मावती यांना जोहर करण्याशिवाय पर्याय नव्हता.

मलिक मोहम्मद जैसी यांच्या अजून एका काव्यामध्ये राणी पद्मावती चा उल्लेख काहीशा वेगळ्या अंगाने केला जातो.यामध्ये असे सांगितले आहे की राणी पद्मावती ही अतिशय उत्कृष्ट तलवारबाज होती व यामुळे  तीच्या स्वयंवराच्या वेळी एका चेहरा झाकलेल्या योद्ध्याला जो कोणी हरवेल त्यांच्यासोबत पद्मावती विवाह करेल असे जाहीर करण्यात आले .अनेक राजे महाराजे व राजकुमार या योद्धयाकडून तलवारबाजी मध्ये हरले मात्र केवळ रावल रतन सेनने तलवारबाजी मध्ये या योद्ध्याला हरवले व यामुळे राणी पद्मावती ला रतन सेन सोबत विवाह करावा लागला.राघव चेतन हा रावल रतन सेन यांच्या दरबारात एक कलाकार होता व अतिशय कपटी होता.त्याला फसवणुकीच्या आरोपाखाली रावल रतन सेनने देशातून बाहेर काढले.त्यावेळी तो अलाउद्दीन खिलजी ला जाऊन मिळाला होता आणि पद्मिनीच्या सौंदर्याची तारीफ केली व यातूनच रावल रतन सेनसोबत युद्ध पुकारले.

वेगवेगळ्या साहित्यामध्ये राणी पद्मिनी चा उल्लेख विविध प्रकारे करण्यात आला आहे व यामधील काही उल्लेख हे वादातीत आहेत.राणी पद्मिनी चा जन्म हा पंधराशेच्या आसपास झाला होता व अल्लाउद्दीन खिलजीचे युद्ध हे त्यानंतर बऱ्याच काळानंतर झाले होते यामुळे राणी पद्मिनी ही अल्लाउद्दीन खिलजीच्या युद्धाच्या वेळी जिवंत असेल का अशी शंका उपस्थित होते.यामुळे पद्मावत हे काव्य केवळ एक कल्पनाविलास असेल असे सुद्धा म्हटले जाते.