कैलास पर्वताबद्दल माहित नसलेल्या 9 रहस्यमयी गोष्टी – भाग १

विज्ञानाला प्रत्येक. अनाकलनीय गोष्टीचे उत्तर देण्यासाठी सक्षम यंत्रणा बनवणे शक्य आहे असे बुद्धीवादी वर्ग मानत असतो मात्र आजही जगामध्ये अशी अनेक रहस्य आहेत जी उलगडणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सुद्धा शक्य झाले नाही. अशाच रहस्यांपैकी एक म्हणजे पवित्र असे कैलास पर्वत होय. भगवान शिव  यांचे वास्तव्य असलेल्या कैलास पर्वताजवळ मानस सरोवर वसलेले आहे. भारतीय संस्कृतीतील  महान अशा स्कंदपुराण, मत्स्यपुराण इत्यादींमध्ये कैलास पर्वताचे स्वतंत्र कैलास खंड असे वर्णन करण्यात आले आहे.

असे मानले जाते की कैलास पर्वताच्या बाजुलाच कुबेराची नगरी वसलेली आहे आणि भगवान विष्णू यांच्या करकमलामधून पवित्र अशी गंगा कैलास पर्वताच्या शिखरावर प्रवाहित होते व येथून भगवान शंकर यांच्या जटांद्वारे ती निर्मल धारेच्या रूपात पृथ्वीतलावर अवतरीत  होते.प्राचीन धारणांच्या आधारे कैलास पर्वताच्या वरती स्वर्गलोक आहे तर खाली पाताळलोक वसलेले आहे .कैलास पर्वत अनेक अनाकलनीय रहसयांनी व्यापलेला आहे .

नासासारख्या वैज्ञानिक संशोधन संस्थांनी सुद्धा कैलास पर्वतावर संशोधन केले आहे. माणसाप्रमाणेच काही रशियन वैज्ञानिक संशोधन संस्थांनी सुद्धा कैलास पर्वताशी निगडीत रहस्यांचा शोध घेण्यासंदर्भात आपले अहवाल प्रसिद्ध केले आहेत .विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून कैलास पर्वतावर भगवान शिव किंवा अन्य मानवेतर शक्तीचा वास असल्याचे सिद्ध झालेले नाही मात्र याठिकाणी काही अद्भूत ऊर्जा असल्याचे वैज्ञानिक संस्थांनी सुद्धा मान्य केले आहे. आज आपण अशाच काही अनाकलनीय रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

कैलास पर्वतावरील 9 न पाहिलेली रहस्ये

1) पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आहे तर दुसर्‍या बाजूला दक्षिण ध्रुव आहे व या दोघांच्या मध्ये हिमालय पर्वत उभा आहे आणि हिमालय पर्वताचा म्हणजेच पर्यायाने पृथ्वीचा अगदी मध्यबिंदू म्हणजे कैलास पर्वत होय.कैलास पर्वताची ही अनोखी रचना एक अनाकलनीय कोडे आहे.

2) कैलास पर्वतरांगांमध्ये अलौकिक शक्तिंचे वास्तव्य आहे असे मानले जाते. पृथ्वी दलाचे अगदी मध्यभागी असलेली रचना अॅक्सिस मुंडी म्हणजेच अलौकिक शक्तीचे स्त्रोत मानले जाते. अँक्सिस  मुंडी म्हणजे पृथ्वीच्या अवकाशीय केंद्र आणि भौगोलिक केंद्र यांचे मध्ये स्थान होय.या अॅक्सिस मुंडीच्या प्रभावामुळे दाही दिशांचा परस्परांशी एका बिंदुला संपर्क होतो व या ठिकाणी प्रचंड अशा हा ऊर्जेचा, शक्तीचा स्रोत असतो. व हे पृथ्वीतलावरील सर्वात शक्तीशाली स्थान असल्याचे रशियन शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

कैलास पर्वताबद्दल माहित नसलेल्या 9 रहस्यमयी गोष्टी – भाग २