कैलास पर्वताबद्दल माहित नसलेल्या 9 रहस्यमयी गोष्टी – भाग २

कैलास पर्वताबद्दल माहित नसलेल्या 9 रहस्यमयी गोष्टी – भाग १

कैलास पर्वतावरील 9 न पाहिलेली रहस्ये, नासा हे देखील जाणून हादरले – भाग १

3) कैलास पर्वताचा आकार एखाद्या पिरामिड प्रमाण आहे.जवळपास छोट्या छोट्या आकारातील 100 पिरामिड मिळून कैलास पर्वत बनलेला आहे. कैलास पर्वतावर काही वेळा सात प्रकारचे प्रकाश छटा दिसतात यामागे शास्त्रज्ञांचा दावा आहे की कैलास पर्वतावर चुंबकीय बलाचा प्रभाव आहे जो अवकाशा मधील ऊर्जेशी संपर्कात येऊन कधीकधी अशा प्रकारच्या छटा निर्माण करू शकतो.

4) कैलास पर्वतावर चढाई करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे .असा दावा केला जातो की आत्तापर्यंत या पर्वतावर कोणीही चढून जाऊ शकले नाही .अकराव्या शतकामध्ये बौद्ध तिबेटन योगी मिलारेपा यांनी कैलास पर्वताला सर केले होते असा दावा वेळोवेळी प्रसारमाध्यमांकडून केला जातो .स्वतः योगी मिलारेपा यांनी याबाबत कधीही काही विधान केले नाही मग याबाबतच्या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी त्यांच्याकडे समर्थनार्थ काही पुरावे नव्हते यामुळे ते शांत आहेत किंवा त्यांना याबाबत काहीही बोलायचे नाही  व.तसे का हे सुद्धा रहस्य आहे.

5) कैलास पर्वताच्या आजूबाजूचा परिसर हा रहस्यांनी भरलेला आहे. या पर्वताच्या बाजूला स्थित असलेल्या दोन सरोवरांची निर्मितीसुद्धा अशीच रहस्यपूर्ण आहे. कैलास पर्वताच्या एका बाजूला संपूर्ण जगभरातील शुद्ध असे प्राकृतिक पाण्याचा झरा मानले गेलेले मानसरोवर आहे .दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्यालायक नसलेल्या पाण्याचा स्त्रोत राक्षस सरोवर आहे .मानस सरोवराचा आकार सूर्याप्रमाणे आहे तर राक्षस सरकारने वराचा चंद्राप्रमाणे आहे. हे दोन्ही सरोवर अनुक्रमे सूर्य आणि चंद्र यांच्या ऊर्जेने भारलेले आहे. या दोघांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे .या सरोवरांची निर्मिती नैसर्गिक पणे झालेली आहे किंवा यांना मानवाद्वा्रे बनवले गेले हे एक न उलगडलेले कोडे आहे.

6) कैलास पर्वतातून सर्व नद्यांचा उगम कसा झाला आहे याचा शोध आजही लागला नाही. कैलास पर्वताच्या चारी बाजूला ब्रह्मपुत्रा, सतलज,सिंधू व करनाली या चार नद्या वाहतात व इथून पुढे गंगा व चीनमधील अन्य नद्या सुद्धा इथूनच उगम पावतात. कैलास पर्वताच्या चारही दिशांना निरनिराळ्या प्राण्यांची मुख आहेत व या मुखां मधून नद्या प्रवाहित होतात जसे की पूर्व दिशेला अश्व मुखआहे पश्चिम दिशेला हत्तीचे मुख आहे तर दक्षिण दिशेला सिंह मुख व उत्तर दिशेला मोराचे मुख आहे.

7) कैलास पर्वतावर केवळ पुण्या कर्म केलेले आत्माच वास्तव्य करू शकतात असे येथील तिबेटी योग्यांनी सांगितले आहे. रशियन संशोधकांना काहीवेळा याठिकाणी टेलीपैथी द्वारे अध्यात्मिक गुरुंसोबत सोबत संपर्क झाल्याच्या आभास काही तपस्वींना  झाल्याची उदाहरणे आहेत.

8) कैलास पर्वत किंवा मानसरोवर या क्षेत्रात गेल्यावर एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी आसमंतामध्ये सातत्याने घुमत असतो थोडे लक्षपूर्वक ऐकले असता हा ध्वनी म्हणजे डमरू आणि ओमचा नाद असल्याचे समजते. संशोधकांच्या मते हा आवाज बर्फाच्या विरघळण्यामुळे निर्माण होतो किंवा ध्वनी आणि प्रकाश यांच्यामधील समागमा मुळे सुद्धा असा आवाज निर्माण होऊ शकतो.

9) कैलास पर्वताशी निगडीत रहस्यांमध्ये एक मुख्य रहस्य म्हणजे याठिकाणी  हिममानवाच्या किंवा यतीचे वास्तव्य आहे असे मानले जाते. हिमालयाच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी याठिकाणी आजही हिममानव राहत असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे जगभरातील जवळपास तीस वैज्ञानिकांनी हिममानव अस्तित्वात आहे असे मानले गेले आहे. हिम मानवाला येथील स्थानिक भाषेत भूरा भालू म्हटले जाते व हिममानव सामान्य मनुष्याला खाऊन टाकतो म्हणजे तो नरभक्षक आहे असे सांगितले जाते.