Home » चीनच्या भिंतीबद्दल तुम्हाला या ‘१२’ रहस्यमय गोष्टी माहित आहे का? ‘१२’ वे रहस्य जाणून व्हाल चकित!
History

चीनच्या भिंतीबद्दल तुम्हाला या ‘१२’ रहस्यमय गोष्टी माहित आहे का? ‘१२’ वे रहस्य जाणून व्हाल चकित!

तुम्हाला माहीत आहे का चीनची भिंत ही जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे! परंतु आपल्याला या भिंतीबद्दल फक्त एवढेच माहीत आहे.परंतु याव्यतिरिक्त देखील अशी बरीच आश्चर्य आहेत जी आपल्याला माहीत नाही.तर आज आपण चीनच्या ‘द ग्रेट वॉलऑफ चायना’ बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत.चीनची ही भिंत तिच्या लांबी,बांधकाम आणि मजबुतीमुळे इतिहासात जगप्रसिद्ध आहे.

जगातील सर्वात लांब असणाऱ्या चीनच्या भिंतीलाच आपण जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणून देखील ओळखतो.चीनचा क्षत्रू पासून बचाव आणि सुरक्षा करण्यासाठी हि भिंत बांधली होती परंतु असे झाले नाही इसवी सण १२११ मध्ये मांगूल शासक चंगेज खान ने एका ठिकाणी हि भिंत तोडून ती ओलांडून चीनवर हल्ला केला होता.असे देखील म्हंटले जाते कि हि भिंत बांधताना २० लाख मंजूर ह्या भिंतीचे काम करण्यासाठी गुंतले होते परंतु १० लाख मंजुराना आपला जीव गमवावा लागला होता आणि अनेकांच्या मते त्यांना या भिंती खाली पुरले गेले होते.

चला तर आज आपण जगातील प्रसिद्ध ‘वॉल ऑफ चायना’ बद्दल काही मनोरंजक गोष्टी बघणार आहोत..

१) चीनची ही भिंत बांधायला ७ व्या शतकात म्हणजे २८०० वर्षपूर्वी या भिंतीचे बांधकाम सुरू केले होते.चीनचे राजा ‘किन शि हुआंग’ यांची ही भिंत बांधण्याची कल्पना होती ऐतिहासिक माहितीनुसार त्यानंतर २००० वर्षांनी ही भिंत बांधली गेली.

२) चीनची भिंत बनवताना ही दगडांमध्ये तांदळाच्या पिठ वापरले गेले होते.यपीठाचा उपयोग दगडांना जोडण्यासाठी केलेला आहे.

३) सर्व लहान-लहान भागांना जोडून  ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ या भिंतीची लांबी ८८४८ किलोमीटर इतकी असेल.

४) ही भिंत सलग बांधलेली नसून लहान-लहान भागांनी मिळून बनलेली आहे याभिंती मध्ये बर्‍याच ठिकाणी रिकामी जागा सोडण्यात आली आहे.

५) चीनच्या भिंतीची उंची समान नसून कुठे कमी तर कुठे जास्त आहे.काही ठिकाणी नऊ फूट तर काही ठिकाणी ३६ फूट उंच आहे.

६) शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ मध्ये बर्‍याच ठिकाणी मिनारे बांधलेले आहेत.

७) चिनी भाषेत या भिंतीला ‘वानली छंग छंग’ म्हणुन ओळखले जाते.

८) या भिंतीला भेट देण्यासाठी दरवर्षी जवळपास १ कोटीहून अधिक पर्यटक भेट द्यायला येतात.

९) सण १२११ मध्ये चंगेज खान याने ही भिंत तोडून चीनवर हल्ला केला होता.

१०) चीनची भिंत ही जगातील मानवनिर्मित सर्वात लांब भिंत आहे.१९७० मध्ये या भिंतीचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केला होता.

११) १९६० मध्ये काही लोकांनी या भिंतीच्या विटा काढून घरे बांधण्यासाठी वापरत होते.ही एकमेव मानवनिर्मित रचना अशी आहे की जी अंतरळामधून सुद्धा स्पष्ट दिसते.

१२) असेही म्हंटले जाते की ही भिंत बांधताना जे कारागीर काम करत नव्हते त्यांना तिथेच पुरले जात होते.या भिंतीच्या निर्मितीच्या वेळी १० लाख लोकांचा मृत्यू झाला होता म्हणूनच या भिंतीला जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणून ओळखतात.