Home » जाणून घ्या लोणार सरोवराच्या रहस्यमय गोष्टी…
History

जाणून घ्या लोणार सरोवराच्या रहस्यमय गोष्टी…

पौराणिक दृष्ट्या लवणासूर राक्षसाला विष्णूने मारले त्या राक्षसाच्या नावावरूनच या सरोवराला आणि गावाला लोणार हे नाव मिळाले.लोणार हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.५२ हजार वर्षांपूर्वी सरोवराची निर्मिती एक अतिवेगवान उल्कापात आदळल्यामुळे झाली आहे.या सरोवराचा आकार अंडाकृती आहे.या सरोवराची जमिनीपासूनची खोली १३७ मीटर तर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १.१३ चौकिमी आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसर उल्का पूर्वेकडून येऊन ३५ अंश ते ४० अंश कोणात आदळला त्यामुळे त्याचा आकार अंडाकृती झाला.लोणार सरोवर हे पृथ्वीतलावावरील अग्निजन्य खडकातील एकमेव असे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.जून २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्याने राज्यातील सात आश्चर्याची घोषणा केली त्यापैकी हे सातवे आश्चर्य म्हणून घोषित केलेले आहे.लोणार सरोवर हे समुद्रसपाटीपासून ४८० मीटर उंची वरती आहे. 

या सरोवरामधील पाण्याची pH पातळी जास्त आहे त्यामुळे यामधील पाणी अल्कधर्मी आहे यालाच सोडा वॉटर लेक सुद्धा म्हणतात.हे सरोवर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेले जगातील पहिले सरोवर आहे.अशा प्रकारचे सरोवर फक्त मंगळ ग्रहावरच सापडतात त्यामुळे लोणार सरोवराचे महत्त्व वाढले आहे.येथे जगभरातून पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या सहल मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी येतात.

पौराणिक धारेचा इतिहास… 

धारा मंदिर कुंडामध्ये पाण्याची धार पडते.त्यामुळे या मंदिराला धार मंदिर म्हणतात.इथे येणारे भाविक या धारेत अंघोळ केल्याशिवाय समोर जात नाही कारण या धारेखाली अंघोळ केल्याने सर्व रोगराई आणि पाप दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांनी मदत केली आहे असे तेथील ग्रामस्थ सांगतात.वैज्ञानिक दृष्ट्या गोमुखातून येणारे पाणी १८ किमी दूरवरून सायपण पद्धतीने येते असे त्यांचे म्हणणे आहे.आणि हे सिद्धही झाले.गो मुखातून पडणारे पाणी खाली सरोवरात जाते. 

पौराणिक दृष्ट्या थेट गंगेतून येणारी धार तिलाच गो मुख धार म्हणतात.जेव्हा भगवान विष्णू ने लवणासुराचा वध केला तेव्हा विष्णूच्या शरीराचा दाह होत होता.तो दाह क्षमावण्यासाठी काशीवरून गंगा नदीची धार येथे प्रगटली होती.आणि तिने विष्णूच्या शरीराचा दाह शांत झाला तेव्हापासून लोणारची धार अखंडपणे वाहत असते.त्याला विष्णू-गया असे नाव आहे.असे पुराणामध्ये सांगितले जाते. 

विहिरीतील पाणी गोड आणि खारट… 

पुरातन काळातील विहीर आहे या विहिरीचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे पाणी खारट आहे.सरोवराच्या पायथ्याशी असणाऱ्या कमळजा मातेच्या मंदिरासमोर हि विहीर आहे.त्या विहिरीला सासू-सुनेची विहीर असे म्हणतात.संपूर्ण तलावात खारे पाणी पण या विहिरीमध्ये अर्धे गोड आणि अर्धे खारे पाणी असणे हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे.

लोणार सरोवराच्या आजूबाजूला सगळ्या औषधी वनस्पती आहे.आणि या सरोवराच्या पाण्यात अनेक क्षार असल्यामुळे त्वचेच्या रोगासाठी खूप फायदेशीर आहे.या पाण्यात क्षार चे प्रमाण जास्त असल्यामुळे इथे एकही जलचर प्राणी नाही आणि या पाण्यात कोणताही जलचर प्राणी जीवंत राहू शकत नाही. 

पाण्याचा रंग बदलन्या मागचे कारण…

लोणार सरोवराच्या पाण्यामध्ये नेहमी कोणतीना कोणती रासायनिक क्रिया घडत असती.जुन २०२० मध्ये लोणार सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाले होते.तज्ञांच्या मते तलावात काही रासायनिक क्रिया घडवून आल्यामुळे किंवा हॅलो बॅक्टेरिया व ड्युनोलीला या बॅक्टेरिया मुळे झाला असावा या घटनेमुळे लोणार सरोवर पुन्हा चर्चेत आले.