Home » काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा इतिहास,जाणून घ्या… 
History

काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचा इतिहास,जाणून घ्या… 

आपल्या देशामध्ये एकूण ५१ शक्तिपीठे आहेत.त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडे तीन शक्तिपीठं आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध श्रद्धास्थान म्हणजे तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर.तुळजापूर ह्या क्षेत्राला आद्य पीठ मानले जाते.

महाराष्ट्रामधील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि येथे तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट डोंगराच्या कडेला पठारावर तुळजाभवानी मातेचे मंदिर वसलेले आहे.समुद्रसपाटीपासून हे तीर्थक्षेत्र २६,००० फुट इतके उंच आहे.अनेक जातीधर्माचे आणि पंथाचे भाविक येथे दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी मातेला महिषासुर मर्दिनी, तुकाई,जगदंबा अशा विविध नावाने ओळखतात.

तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याची कुलदेवता आहे.छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादानेच मिळाली होती.

तुळजा भवानी हे महाराष्ट्र आणि भारतातील मुख्य शक्तीपीठांपैकी एक आहे.असे मानले जाते की शिवाजी  महाराजांना स्वतः देवीने तलवार दिली होती.ही तलवार आता लंडनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.हे मंदिर महाराष्ट्राच्या प्राचीन दंडकारण्य वनक्षेत्रात वसलेल्या यमुनाचल पर्वतावर आहे.तुळजा भवानी मातेची मूर्ती स्वयंभू आहे अशी ही एक लोकप्रिय मान्यता आहे.

या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती कायमस्वरूपी मंदिरात स्थापित केलेली नसून ‘हलणारी’ आहे.वर्षातून तीन वेळा,या मूर्तीसह,भगवान महादेव,श्री यंत्र आणि खंडारदेव यांची प्रदक्षिणापथावरही प्रदक्षिणा घातली जाते. शतकानुशतके जुनी मंदिरे ते किल्ले आणि लेण्यांपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता.इतिहासात रस असणाऱ्यांसाठी तुळजापूर हे एक आदर्श ठिकाण आहे.

या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत एका प्रवेशद्वार ला राजमाता जिजाऊ महाद्वार तर दुसऱ्या प्रवेशद्वार ला राजे शहाजी महाद्वार असे नाव आहे.या प्रवेशद्वाराजवळ दोन दिपमाळी आहे.हे मंदिर हेमाडपंती आहे.१४ व्या शतकात बांधलेले पुरातन काळातील हे मंदिर अतिशय सुंदर आहे.

या मंदिराचा मुख्य दरवाजा चांदीच्या पत्राने मढवलेला आहे.त्यावर सुरेख नक्षीकाम केलेले आहे.नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसाचा असतो परंतु तुळजापूरला हा उत्सव २१ दिवसाचा असतो.