Home » सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ या भूमिका साकारणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा शिवचरित्रासी आहे अगदी जवळचा संबंध…!
History

सोनपरी ते द्रौपदी, जिजाऊ या भूमिका साकारणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा शिवचरित्रासी आहे अगदी जवळचा संबंध…!

महाराष्ट्रातील अस्मिता, स्वाभिमान व स्वराज्य यांविषयी जाज्वल्य अभिमान बाळगणा-या कोणत्याही व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे काम हाती घेणे म्हणजे निश्चितच सोपे नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील पात्र कलात्मकता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अक्राळविक्राळ रुपात दाखवली जात आहेत व यांचा निषेध चिमणे, राजकीय व‌ सामाजिक संघटनाही करत आहेत. भालजी पेंढारकर व‌ ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत, सुर्यकांत यांना शिवकाल अगदी हुबेहूब वठवण्याचे श्रेय जाते. आजच्या पिढीमध्ये सुद्धा असे काही कलाकार आहेत ज्यांनी ऐतिहासिक पात्र म्हणजे आपली अगदी ब्रँड बनवला आहे.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी होय. मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीमध्ये अनेक ऐतिहासिक पात्र साकारले आहेत. त्यांच्या पदार्पणातील स्वामी मालिकेमध्ये त्यांनी रमाबाई हे पात्र साकारले होते. यानंतर जिजाऊंचे पात्र मृणाल कुलकर्णी यांनी अनेक मालिकांमध्ये व चित्रपट साकारले आहे.

मृणाल यांनी फर्जंद, फत्तेशिकस्त या चित्रपटांमध्ये जिजाबाईंची भूमिका साकारली आहे तसेच शिवछत्रपती या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी जिजाऊंची भूमिका साकारली आहे. जिजाऊंची भूमिका त्या इतका अभ्यास करूनच  साकारतात की ती भूमिका जिवंत होते. त्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी ही साहित्यिक लाभलेली आहे. मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा गो.नी दांडेकर हे प्रसिद्ध साहित्यिक आहेत.

त्यांनी अनेक प्रवास वर्णन ललित अंगाने लिहिलेले आहे. त्यामध्ये गड किल्ल्याविषयी सुद्धा त्यांनी वर्णन केले आहे. त्यांची ही वर्णन आजही अगदी आवडीने वाचली जातात व त्यामधील त्यांचा अभ्यास व सहजपणा सर्वांनाच भावतो. गो.नी. दांडेकर यांचे हेच संस्कार मृणाल कुलकर्णी यांना जणूकाही उपजत मिळाले आहेत.

ज्यावेळी मृणाल यांच्या आई गर्भवती होत्या त्यावेळी त्यांनी रायगडावर भेट दिली होती व याचे वर्णन त्यांचे आजोबा गो.नी. दांडेकर यांनी आपल्या दुर्गभ्रमणकथा या साहित्यामध्ये केलेले आहे म्हणजे आपल्या आईच्या गर्भात असल्यापासूनच शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांचा स्पर्श मृणाल यांना झाला होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.