Home » प्लेगच्या साथीने हादरली होती मुंबई…यामध्ये लाखो हिंदू मृत्युमुखी पडले पण पारशी वाचले जाणून घ्या यामागील कारण…
History

प्लेगच्या साथीने हादरली होती मुंबई…यामध्ये लाखो हिंदू मृत्युमुखी पडले पण पारशी वाचले जाणून घ्या यामागील कारण…

एकोणविसाव्या शतकात भारतात इंग्रजांचे राज्य होते.संपूर्ण देशातून लोक पोटापाण्यासाठी कामाच्या शोधात मुंबईला येत होते.तेव्हा लोकसंख्येचा आकडा वाढतच चालला होता.मुंबईला तेव्हा अग्रगण्य शहर म्हणायचे.तेव्हा मुंबई खऱ्या अर्थाने भारताची आर्थिक राजधानी बनली होती.

अशा वेळी १९९६ ला मुंबईवर एक संकट आलं

तेव्हा नेमकेच भुयारी गटारे बनवले होते.हि गटारे जमिनीखालून असतात यामुळे रोगराई होणार नाही असे त्याकाळातील गव्हर्नर चे म्हणणे होते पण या उलटेच घडले.प्लेग हा रोग उंदरामध्ये असतो आणि उंदरामधून माणसांना होऊ शकतो.वर्षा ऋतूत धान्य बाहेर आल्यावर जसे कि भूकंपातून धान्य बाहेर आल्यावर उंदीर होतात आणी त्यामुळे प्लेग होऊ शकतो.

असेच मुंबई मध्ये घडले होते जुलै महिन्यामध्ये खूप पाऊस झाला होता त्यामुळे धान्याची गोदामे पूर्ण पने भिजली होती त्यामुळे तिथे असलेले उंदीरही मेले.या उंदीरामुळे एक भयंकर रोग पसरला होता.तो रोग म्हणजे प्लेग. 

प्लेग हा रोग अतिशय दुर्धर होता त्याचबरोबर संसर्गजन्यही होता.या रोगावर काही उपायही नव्हता आणि लोकांच्या अडाणीपणामुळे या रोगाचे प्रमाण वाढतच चालले होते. 

सुरुवातीला मांडवीमध्ये आलेला हा रोग थोड्याच काळात सगळ्या मुंबईमध्ये पसरला.गोव्यामधील डॉक्टर अकासियो गेब्रिएल विएगस होते ते धोबीतलाव च्या जवळ राहायचे त्यांचं क्लीनिक मांडवी या वस्तीकडे होते.त्यांना पहिल्यांदा कळलं कि लोकांच्या काखेत गाठी येत आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं कि ह्युबाॅनिक प्लेग आहे.आधी फक्त ताप आला म्हणून झोपलेल्या पेशंटला प्लेगची गाठ दिसू लागली यावर कोणत्याच औषधाचा असर होत नव्हता.आठ ते दहा दिवसामध्ये रुग्णाचा मृत्यू होत होता.सप्टेंबर १९९६ मध्ये हा रोग मुंबईमध्ये सगळीकडे पसरला होता.ठिकठिकाणी औषध फवारणी केली,साफसफाई केली,घरोघर जंतुनाशक औषध फवारणी केली.त्यामध्ये काही लोकांनी घरात औषध फवारणी करू नाही दिली.घरात येण्याने धर्म भ्रष्ट होईल असं त्यांचं म्हणणं होत.

मुंबई मध्ये हा प्लेग वेगाने पसरत होता  त्यामुळे शेकडो लोक मरण पावली.अनेक लोंकानी शहर सोडण्याचा निर्णय घेतला

मात्र मुंबई मधून हा रोग दुसरीकडे पसरू नये यामुळे बस रेल्वे आणि जहाज येथे वैद्यकीय तपासणी करत होते त्याशिवाय उतरणाऱ्यांना चढू देत नव्हते.गाव ओस पडल्यासारखं झालं होत.

ज्या ज्या घरात फवारणी करू दिली नाही तिथे लष्करी मदत घेऊन औषध फवारणी केली होती.तरी देखील हा प्लेग रोग नियंत्रणात आला नाही.या प्रयत्नानंतर मुंबईच्या गव्हर्नरने सँडहर्स्टने पत्र लिहून एका खास व्यक्तीला बोलावून घेतलं.त्यांचं नाव म्हणजे “डॉ.वाल्डेमेर हाफकिन” हे मुळचे रशियन होते.जन्माने ज्यू रशियामध्ये ज्यू लोंकावर तेथील राजा अत्याचार करायचा तेव्हा डॉ.हाफकिन फ्रान्सला पळून आले होते.पॅरिस मधील जगप्रसिद्ध संशोधक लुईस पाश्चर यांच्या हाताखाली काम करत होते.तिथे वेगवेगळ्या रोगांवर उपाय शोधण्याचे प्रयोग सुरु होते.

याच काळामध्ये लुईस पाश्चर यांनी देवी रोगावरील लसीचा शोध लावला होता.लुईस पाश्चर चा अग्रेसर शिष्य म्हणजे हाफकिन.कोलकत्त्यात कॉलराची साथ आली होती.यूरोप मध्ये पैसे कमवण्याचे सोडून भारतात आले.तिथे मेहनत करून हि साथ नियंत्रणात आणली.

तोपर्यंत मुंबईवर भयंकर संकट पसरले होते.सगळे मुंबई सोडून चालले होते.अशा वेळेस हाफकिन स्वतः मुंबई मध्ये आला.तो दिवस म्हणजे ७ ऑक्टोबर १८९६. मुंबई मध्ये स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी प्रचंड रांगा लागलेल्या होत्या.प्लेगवर काहीतरी उपाय आणि लस यांची अत्यंत गरज होती.अशावेळी हाफकिन ला ग्रॅन्ट मेडिकल विद्यालयात प्रयोगशाळेची खोली उपलब्ध करून देण्यात आली.सोबत काहीजण मदतीला देखील दिले.

हाफकीनने लवकरात लवकर आपले प्रयोग सुरु केले… 

हाफकीनने प्लेग रोगाचे जंतू घेतले त्यांना वाढू दिले त्यानंतर त्यांना क्लोरोफॉर्म दिला तेव्हा ते जंतू मरण पावले.हे मरण पावलेले जंतू म्हणजे हाफकिनची प्लेग वरील लस होती.काही उंदरावर त्याने हा प्रयोग केला म्हणजे उंदरांना त्याने हि लस दिली तर ते उंदीर खणखणीत बरे झाले.आता हा प्रयोग माणसांवर करायचा होता पण त्या साठी कोणीही तयार होत नव्हतं.तेव्हा हाफकीनने स्वतःवर हा प्रयोग केला.मुंबईमधील लोकांचे भाग्य कि हा प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर हाफकीनची प्रयोगशाळा राजवाड्यात हलवण्यात आली.

पण अजूनही काही प्रतिबंध होते… 

हिंदू धर्मातील काही लोकांनी आम्ही शाकाहारी आहे म्हणून लास टोचून घेण्यास नकार दिला.जुन्या अंधश्रध्येत गुंतलेले अडाणी लोंकाना लास घेतल्या पेक्षा नवस केल्यावर हा रो नियंत्रणात येईल असा गैरसमज होता.या उलट पारशी समाजातील लोक रंग लावून दोनदा दोनदा लस घेऊन आले.यामुळे मृत्यू झालेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाण हिंदू लोकांचे होते.
हाच प्रकार पुण्यामध्ये सुद्धा घडला होता.७ लाखाच्या जवळपास लोक मृत्युमुखी पडले होते.देवासारख मदतीला धावून आलेल्या हाफकीनचे मुंबईवर खूप उपकार आहेत.हाफकिन च्या प्रयोगशाळेला त्याच्या समरणार्थ हाफकिन इन्स्टिट्यूट असे नाव देण्यात आले.१०० वर्षांपूर्वी प्लेगमुळे जशी परिस्थिती झाली होती.तशीच आज कोरोनामुळे परिस्थिती पुन्हा जगावर आलेली आहे.