Home » ताजमहल बद्दल अशा काही रहस्यमय गोष्टी ज्या तुम्हालाही माहित नसेल…
History

ताजमहल बद्दल अशा काही रहस्यमय गोष्टी ज्या तुम्हालाही माहित नसेल…

जगातील सात आश्चर्यापैकी एक मानले जाणारे ताजमहल भारतातील मध्यप्रदेश मधील आग्रा शहरामध्ये आहे.ताजमहल म्हणजे भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण वास्तू दिल्ली पासून २०० किमी अंतरावर आहे.भारतातील आग्रा येथे यमुना नदीच्या काठी बांधलेले आहे.प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.प्रेमाची निशाणी म्हणून मुघल बादशहा शहाजहान यांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर ‘मुमताजमहल’ नावाने बांधलेली ही वास्तू जगभरात प्रसिद्ध आहे. 

असे म्हणतात या जगप्रसिद्ध वास्तूच्या निर्मितीचे काम इ.स. १६३१ मध्ये या सुरु झाले आणि ए.स. १६५४ मध्ये ताजमहलचे काम पूर्ण झाले.ताजमहल मुघल स्थापत्याचे एक उदाहरण आहे.भारताच्या इतिहासामध्ये अनेक युद्ध झाली पण ताजमहलला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.ए.स.१९८३ मध्ये ताजमहल या भव्य वास्तुला युनिस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान दिले गेले होते.ताजमहालच्या सौंदर्या बद्दल आणि कारागिरी बद्दल नेहमी बोलले जाते. 

अशा या ऐतिहासिक वास्तूबद्दल आजही आपल्याला माहित नसलेल्या काही रहस्यमय गोष्टी जाणून घेऊया...  

१) ताजमहाल बांधण्यासाठी एकूण २८ प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला होता.त्यामधील संगमरवरी हा दगड राजस्थानच्या मकराना येथून आणला होता.जेड आणि क्रिस्टल चीनमधून,लॅपीस लॅझली अफगाणिस्थान मधून,टरकोईस तिबेटमधून जस्पर पंजाब मधून सॅफायर श्रीलंका मधून आणि कार्नेलीयन अरब मधून आणले होते.अशा २८ वेगवेगळ्या रत्नांना पांढऱ्या संगमरवर मध्ये लावले होते या सगळ्या वास्तूला विदेशातून आग्र्यामध्ये आणण्यासाठी १००० हुन अधिक हत्तींचा वापर करण्यात आला होता.  

२) ताजमहालचे बांधकाम शहाजहानच्या कारकिर्दीत १६३१ मध्ये सुरु झाले होते ताजमहाल बांधण्यासाठी २२ वर्षे लागली होती.बांधकाम सुरु झाल्यावर प्रत्येक वर्षी मुख्य गेटवर एक घुमट बसवत होते असे २२ वर्षात २२ घुमट बसवले होते.ताजमहल प्रेमाचे प्रतीक आणि वास्तुकलेचे एक अप्रतिम उदाहरण आहे.मुघल साम्राज्याने भारताला दिलेली मौल्यवान आणि सर्वोत्तम देणगी आहे.

३) ताजमहालचा पाया बांधताना चारही बाजूने विहिरी खोदून त्यात विटा,दगड आणि आबनूस आणि महोगनी ही लाकडे टाकली होती.या विहिरी ताजमहलचा पाया भक्कम बनवतात.आबानूस आणि महोगनी या लाकडांचे एक रहस्य आहे यांना जेवढा ओलावा भेटतो तेवढी ती मजबूत होतात.यांना ओलावा ताजमहालच्या बाजूला वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्याने भेटत होता.परंतु आता वर्षानुवर्षे यमुना नदीचे पाणी कमी होत आहे त्यामुळे २०१० मध्ये ताजमहालला भेगा पडलेल्या दिसून आल्या होत्या. 

४) ताजमहल बांधण्यासाठी एकूण २८ प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला होता.त्यापैकी एक मुख्य दगड म्हणजे संगमरवरी राजस्थान मागविण्यात आला होता.उस्ताद अहमद लाहोरी यांच्या मार्गदर्शनाने २०००० कामगारांनी हे बांधकाम केले होते.ताजमहाल २४० फूट उंच आणि १३० फूट रुंद आहे.

५) ताजमहलाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे दिवसातून तीन वेळा ताजमहालाचा रंग बदलतो.सकाळी गुलाबी रंगाचे दिसते रात्री पांढरेशुभ्र दिसते आणि चांदण्याच्या प्रकाशाखाली सोनेरी रंगाचे दिसते.अशाप्रकारे ताजमहालचा रंग वेळेनुसार बदलतो.  

६) ताजमहालासमोरील कारंजे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात एकसाथ उडणारे हे कारंजे मन मोहून टाकतात.प्रत्येक कारंज्यातून सारखे फवारे येतात.प्रत्येक कारंज्याखाली तांब्याचे भांडे बसवलेले आहे.त्यात पाणी भरले जाते आणि नंतर ते कारंज्यातुन बाहेर  पडते.

७) ताजमहालच्या चारही बाजूचे मिनार बघितले तर ते ताजमहालच्या बाहेरील बाजूस झुकलेले दिसते.नैसर्गिक आपत्ती पासून ताजमहलला काही हानी पोहचू नये म्हणून असे बांधलेले आहे.मिनार जर पडले तर ते ताजमहालावर पडणार नाही. 

८) असे म्हणतात कि ताजमहल हा दिल्लीच्या कुतुबमिनार पेक्षाही उंच आहे.कुतुबमिनार भारतातील सर्वात उंच मिनार आहे.पण तुम्हीही जाणून थक्क व्हाल ताजमहल ची उंची ७३ मीटर आहे आणि कुतुबमिनारची ७२.५ मीटर आहे.

९) १९८९ मध्ये भारतीय लेखक पुरुषोत्तम नागेश ओक यांचे पुस्तक Tajmahal:The True Story यामध्ये त्यांनी असे लिहिले होते की ताजमहालच्या ठिकाणी अगोदर हिंदू मंदिर होते ज्याचे नाव तेजोमहालय हे होते आणि नंतर तिथे ताजमहाल बांधला गेला परंतु या बद्दल कोणालाही माहिती नाहीये. 

१०) असे म्हणतात की शहाजहानला असाच अजून एक काळा ताजमहल बांधायचा होता.त्याची प्रतिकृती त्यांना  नदीच्या दुसऱ्या बाजूला बनवायची होती परंतु त्यांचा मुलगा औरंगजेब याने त्यांना कैद केले त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. 

११) असे देखील म्हणतात की हे बांधकाम झाल्यानंतर शहाजहानने कारागिरांचे हात कापून टाकले होते परंतु त्यानंतर या कामगारांनी अनेक मकबरे बांधली,लाल किल्ला,जामा मशिद जर त्यांना असाच ताजमहाल पुन्हा बंड्याचा होता तर ते त्या कारागिरांचे हात कशाला कापतील.शहाजहानच्या इच्छेनुसार ताजमहालमध्ये एकही चूक नसली पाहिजे परंतु एका कारागिराने ताजमहाल मध्ये एक छिद्र ठेवलं होत ज्यामधून पाऊस पडल्यावर पाणी थेट मुमताजच्या कब्रीवर पडते.