History

अबब! इतिहासातील सर्वात मोठी चूक. चीन च्या ‘या’ चूकी मुळे जवळपास ४ कोटी लोकांना गमवावे लागले प्राण.

चिमण्यांनी हरवले “चिनी सरकारला ..”!!! खरं  वाटत नाही ना ? कि हत्ती-मुंगी प्रमाणे विनोद वाटतोय ? पण नाही ही  , दंत  कथा आहे , ना विनोद … ही  सत्य-घटना आहे १९५८-६२ या कालावधीतील . 

चीन हा जसा त्याचा डोंगराळ प्रदेश , भरमसाठ लोकसंख्या या साठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ६० च्या दशकात तो उंदीर, डास  आणि माश्या यांच्या वाढत्या संख्येमुळे पण त्रासला होता . प्लेग , टायफॉईड  आदींमुळे मनुष्यहानी तर होत होतीच पण उंदीर , पक्षी यामुळे पिकांचं  देखील अतीव नुकसान होत होतं . याला वैतागून त्यावेळेस चिनी सरकारने एक उपक्रम राबविला  त्याचं  नाव होतं ” फोर  पेस्ट कॅम्पेन ” आणि त्यात उंदीर, माश्या आणि डास  यांना सामील करण्यात आला  आणि चिमण्या मारण्यासाठी एक  ऍडिशनल कॅम्पेन राबवण्यात आली ज्याचं  नाव होतं ” किल अ  स्पॅरो “!

मंडळी खरं  तर , निसर्गाने आपला समतोल राखण्यासाठी एक अन्नसाखळी निर्माण केली आहे ती म्हणजे ” छोट्या हिरव्या वनस्पतींना , कीटक /आळ्या खातात , या कीटक आणि अळ्यांना  , चिमण्या/कावळे असे छोटे पक्षी खातात ; अश्या छोट्या पक्ष्यांची शिकार घार /गरुड यांसारखे मोठे पक्षी खातात “. अश्या अनेक प्रकारच्या अन्न-साखळ्या निसर्गात अस्तित्वात आहेत ज्याचा उपयोग निसर्गाचा समतोल राखण्यासाठी होतो. 

चीनने , चिमण्या मारण्याचा  फतवा काढून त्यावेळी निसर्ग-नियमांमध्ये छेडछाड केली. परंतु या फतव्याला लोकांचा अमर्याद प्रतिसाद मिळाला . ठीक-ठिकाणी चिमण्यांसाठी सापळे लावण्यात आले. बंदूक/गोफण वापरून शेतकरी त्यांची शिकार करू लागले. एव्हढेच  पुरेसे नव्हते तर मोठीमोठी वाद्ये वापरून या छोट्याश्या  चिमण्यांना घाबरवण्यात येई , ज्यामुळे त्या घाबरून खाली पडत आणि यात त्यांचा मृत्यू होई . उंदीर , डास  यांच्या बाबतीत काही वेगळी परिस्थिती नव्हती .

या विक्रमी उपक्रमातून , अंदाजे ,१०० कोटी चिमण्या , १५० कोटी उंदीर आणि किती तरी माश्या /मारले गेले . चिनी सरकारचा उपक्रम जिंकला पण मग भरभरून पीक आलं  का ? तर त्याचं  उत्तर आहे ” नाही ” . चिमण्या मारल्यामुळे पिकांवरील किडीच्या रोगांना शत्रू उरला नाही आणि त्यांनी सर्व शेती खाऊन फस्त केली , सुरुवातीला १५% असणारा अन्नाचा तुटवडा  पुढे पार ७०% पर्यंत पोहोचला. किडीचे रोग , टोळ  आणि नाकतोडे यांनी थैमान घातले . 

जास्त लोक आणि कमी अन्न  हे व्यस्त प्रमाण हे पुढे अधिकाधिक व्यस्त होऊ लागले आणि चीनमध्ये ” दुष्काळाने हाहाकार माजवला ” आणि त्यात चिमण्यांपेक्षा कैकपटीने जास्त म्हणजे साधारण २/४ कोटी माणसे मृत्युमुखी पडली . 

निसर्ग-नियमांच्या विरुद्ध जाण्याची आणि चिमण्या मारण्याची शिक्षा “चीन” ला मिळाली होती , आपली चूक सुधारण्याची तजवीज ही  त्यांनी केली ; चिमण्यांना कॅम्पेन मधून वगळून तिथे “ढेकूण ” टाकण्यात आले . पण तोपर्यंत चीन मधील चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर लागल्या होत्या . 

आपल्या देशात अशी कॅम्पेन नसतात परंतु ” प्रॉपर्टीच्या नावाखाली हिरवी शेतजमीन बळकावणे , नदी-नाल्यांच्या मार्गांवर घर बांधणे  , एका घरात ४-४ कार असणे इत्यादी गोष्टी करून आपण निसर्गाला आव्हान तर करत नाही आहोत ना??