Home » या कारणामुळे अर्जुनाला उर्वशीने दिला होता नपुंसकत्वाचा शाप? जाणून घ्या त्यामागील कारण…
History

या कारणामुळे अर्जुनाला उर्वशीने दिला होता नपुंसकत्वाचा शाप? जाणून घ्या त्यामागील कारण…

आपल्या सर्वांना महाभारत माहीतच आहे.परंतु महाभारतातील खुप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीये.आज आपण अशाच एका गोष्टी बद्दल जाणुन घेणार आहोत ज्यामुळे अर्जुनाला एक वर्ष नपुंसक म्हणून राहावे लागले होते.

कौरवाकडून हरल्यानंतर पांडव त्यांचे राज्य सोडून वनवासात राहण्यासाठी गेले होते तेव्हा पांडव वेदव्यास यांच्या आश्रमात पोहचले त्यांनी वेदव्यासांना त्यांचे दुःख सांगितले.युधीष्ठीरने त्यांना प्रार्थना केली की आमचे राज्य परत मिळून देण्यासाठी आमची मदत करा.

तेव्हा वेदव्यासांनी त्यांना सांगितले की तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्हाला दिव्य अस्त्राची गरज पडेल हे अस्त्र कसे मिळवायचे याविषयी व्यासांनी त्यांना सांगितले.तुम्हा पाच जनांमधून फक्त अर्जुनच देवतांना प्रसन्न करू शकतो.त्यामुळे अर्जुनाने देवाची प्रार्थना करून देवतांना प्रसन्न करावे.

अर्जुनाने तपश्चर्या करायला सुरुवात केली…

वेदव्यासांनी असे सांगितल्यावर अर्जुनने तपश्चर्या करायला सुरुवात केली.अर्जुनाने सुंदर वनात भगवान शंकर यांची तपश्चर्या करायला सुरुवात केली.तेव्हा अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी भगवान शंकर भिल्लाच्या रुपात वनात आले.

तेव्हा भगवान शंकरानी बघितले एक दैत्य शुकराचे रूप धारण करून अर्जुनाला मारण्यासाठी आलेला आहे तेव्हा त्यांनी त्या राक्षसावर बाण सोडला त्यावेळी अर्जुनाची तपश्चर्या भंग झाली त्याने पण त्याचे धनुष्य उचलून त्या राक्षसावर बाण सोडला.तेव्हा त्या राक्षसाचा मृत्यू झाला.

तेव्हा अर्जून आणि भिल्लाचे रूप धारण करणारे शंकर यांच्या मध्ये वाद सुरू झाला.दोघेही म्हणत होते माझ्या बाणाने तो राक्षस मेला.वादाचे रूपांतर युद्धामध्ये झाले.अर्जुन त्या भिल्लावर बाणांचा वर्षाव करत होता परंतु बाण मारून अर्जुन त्या भिल्लाचे काहीही बिघडू शकला नाही.

त्याने मारलेले सर्व बाण जमिनीवर पडायचे थोड्या वेळाने अर्जुनाचे सर्व बाण संपले नंतर त्याने तलवारीने मारायला सुरुवात केली तलवार भिल्लाच्या शरीराला लागताच तिचे दोन तुकडे झाले.अर्जुनाला खुप क्रोध आला आणि त्याने बळाचा उपयोग केला.परंतु भिल्लाच्या एका प्रहाराने अर्जुन बेशुद्ध पडला.

अर्जुनाला दिले दिव्यस्त्र…

थोड्या वेळानंतर अर्जुन जेव्हा शुद्धी वर आला तेव्हा बघितले तर काय भिल्ल त्याच्यासमोर उभा राहून हसत होता.भिल्लाची शक्ती पाहून अर्जुनाला आश्चर्य वाटले आणि त्याला मारण्यासाठी शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याने शिवलिंगावर फुलांची माळ टाकली परंतु ही फुलांची माळ शिवलिंगावर न पडता भिल्लाच्या गळ्यात पडली.

तेव्हा अर्जुनाला समजले भिल्लच भगवान शंकराचे रूप धारण करून आले होते.तेव्हा अर्जुनाने भगवान शंकराचे चरण धरले.तेव्हा भगवान शंकराने त्यांचे खरे रूप धारण केले आणि अर्जुनाला सांगितले,मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आणि तुला पशुपत्यस्त्र देत आहे.

त्यानंतर कुबेर,गंधर्व,इंद्र,वरुण आणि यम तिथे आले त्यांनी देखील अर्जुनाला आशीर्वाद दिले आणि त्याला आपआपले दिव्यास्त्र दिले आणि ते तेथून निघून गेले.

अर्जुन स्वर्गात गेला…

देव इंद्राणी अर्जुनाला सांगितले होते की तुला माझा सारथी घ्यायला येईल तेव्हा अर्जुन तिथे वनात बसून त्याची वाट पाहत होता काहीवेळानंतर इंद्राची सारथी मालती तिथे पोहचली आणि अर्जुनाला इंद्राची नगरी अमरावती येथे घेऊन गेली.

तिथे राहून त्याने दिव्यास्त्र कसे चालवायचे याचा अभ्यास केला आणि त्यानंतर इंद्राने अर्जुनाला चित्रसेन नावाच्या गंधर्वाकडून नृत्य आणि संगीत शिकून घ्यायला सांगितले.

तेव्हा एक दिवस अर्जुन चित्रसेनबरोबर नृत्य आणि संगीत शिकत असतो त्या दिवसाची गोष्ट आहे.अर्जुनला पाहून इंद्राची अप्सरा उर्वशी हिला भुरळ पडली.संधी मिळाल्याबरोबर उर्वशी अर्जुनाला म्हणाली,अर्जुना तुला पाहून माझी वासना जागृत झाली आहे.म्हणून कृपया माझ्याबरोबर रहा आणि माझी वासना शांत कर.यावर अर्जुन म्हणाला की हे देवी तूम्ही आमच्या आईसारख्या आहात.

आमच्या पूर्वजांनी आपल्याशी लग्न करून आमच्या घराण्याचा अभिमान वाढविला आहे.तुम्ही ‘पुरू’ घराण्याची जननी आहात.मी तुम्हाला नमन करतो.अर्जुनाचे हे शब्द ऐकून उर्वशी खूप क्रोधित झाली आणि रागाने अर्जुनाला नपुंसक होण्याचा शाप दिला -“आपण नपुंसकासारखे बोलले.”म्हणून मी तुम्हाला शाप देते की आपण एक वर्ष नपुंसक म्हणून राहाल आणि त्यानंतर उर्वशी तेथून निघून गेली.

देवराज इंद्रांना जेव्हा अर्जुना ला उर्वशीने दिलेला नपुंसक होण्याचा शाप कळला तेव्हा त्यांनी अर्जुनाला सांगितले की ‘वत्स’,तू ज्या पद्धतीने वागलास,ते तुझ्यासाठी योग्य आहे.उर्वशीचा शाप ही देवाची इच्छा होती.हे सर्व तुम्हाला वनवासात कामात येईल तुमच्या वनवासाच्या एक वर्षात तुम्ही नपुंसक राहू शकाल आणि वनवास संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा तारुण्य मिळेल.

उर्वशीने दिलेल्या नपुंसकाच्या शापांमुळे,अर्जुन वर्षभर नपुंसक राहिला आणि नपुंसक होण्याच्या शापांमुळे,अर्जुनाने विराटनगरचा राजा विराट यांची मुलगी उत्तरा हिला नृत्य शिकवले.या वनवासानंतर उत्तराचा विवाह अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्याशी झाला.या शापामुळे वनवासामध्ये अर्जुनाला फायदा झाला.म्हणून अर्जुनाला उर्वशीने दिलेला शाप वरदान ठरला.