Articles History

…म्हणून कैलास पर्वत आजपर्यत कोणीच सर करू शकले नाही?, जाणून घ्या सविस्तर

हिंदू धर्मात कैलास मानसरोवर यात्रेस अनन्य साधारण महत्व आहे. अशी एक मान्यता आहे की भगवान  महादेव म्हणजेच शिवजी हे कैलास पर्वतावर राहतात.अनेक प्राचीन कथांमध्ये सुद्धा कैलास पर्वताचा उल्लेख आहे. ज्या कैलास पर्वतावर भगवान महादेव राहतात ते स्थान दुर्गम आहे.तिथे पोचणे शक्य नाही. कैलास पर्वत जगातील सर्वात अद्भुत पर्वत आहे. दरवर्षी हजारो भाविक कैलास -मानसरोवर यात्रेस जातात,परंतु दुरूनच दर्शन घेऊन येतात.

परंतु आज पर्यत कैलास पर्वत कोणीच सर करू शकले नाही. कैलास पर्वतावर चढाई करणे खूप अवघड आहे. कैलास पर्वताची उंची ६६०० मीटर इतकी आहे. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट पेक्षा ही उंची जवळपास २२०० मीटर कमी आहे,तरी देखील कैलास पर्वत कोणीच सर करू शकला नाही. माउंट एव्हरेस्ट आतापर्यत ७००० हजारांहून अधिक लोकांनी सर केला आहे. परंतु कैलास पर्वत अजुनपर्यत अजय आहे. अनेकांनी अनेकवेळा प्रयत्न केले परंतु कैलास पर्वत ते सर करू शकले नाही. कैलास पर्वत व कैलास क्षेत्र हे आजपर्यत अनेकांच्या संशोधनाचा विषय राहीला आहे परंतु यातून ठोस असे काही सापडले नाही. अनेक संशोधकांच्या मते एव्हरेस्ट सर करणे अशक्य आहे. ज्या लोकांनी कैलास सर कारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते, कैलास चढताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे ,तेथे असलेला भयानक बर्फ. बर्फाच्या इतके मोठे डोंगर आहेत की ते सर करणे खूप अवघड जाते.

एकाच्या मते तो कैलास पर्वताच्या टोकांच्या अगदी जवळ टोक अगदी जवळ होते परंतु,अचानक त्यांच्या हृदयाचे ठोके अचानक खूप वाढू लागले. हृदयात खूप धकधक होऊ लागले. खूप कमजोरी वाटू लागली.मनात असे वाटू लागले की आपण येथे खूप काळ थांबू नये.त्या क्षणी त्यांनी माघार घेतली व ते पुन्हा परंतु लागले तेव्हा हृदयाचे ठोके देखील नॉर्मल झाले. मनातील भीती देखील कमी झाली. मन हलकं होण्यास सुरवात झाली. खाली आल्यानंतर तर खूपच बरे वाटू लागले. 

कैलास चढण्याचा शेवटचा प्रयत्न हा २००१साली म्हणजेच २० वर्षांपूर्वी करण्यात आला होता. चीनने स्पेनच्या एका टीमला कैलास चढण्याचा परवानगी दिली होती. परंतु कैलास हिंदू धर्मियांनसाठी एक पवित्र स्थान आहे. तेथे कोणास चढण्याची परवानगी दिली जाऊ नये. अशी इच्छा भारतीयांनी व्यक्त केली. त्यानंतर कैलासावर चढण्यास बंदी घालण्यात आली. कैलास त्यांच्या उंची पेक्षा त्यांच्या आकारामुळे अद्भुत आहे.

कैलास पर्वताचा आकार चौमुखी आहे. अगदी दिशादर्शकाप्रमाणे आहे. कैलास पर्वत जगाचा केंद्रबिंदू मानला जातो. संशोधकांच्या मते कैलास पर्वत एका पिरॅमिड प्रमाणे आहे. पर्वताचे निर्माण एका दैवीय शक्तीने केले आहे असे मानले जाते. कैलास पर्वतास जगाचा एक्सिस पॉईंट मानले जाते .कॉस्मिक एक्सिस, वर्ल्ड एक्सिस व  वर्ल्ड पिलर मानले जाते.  एक्सिस मुंडी हा एक लॅटिन शब्द असून त्याला ब्रह्मांड मानले जाते.

कैलास पर्वत हे पृथ्वीचा केंद्र बिंदू आहे. कारण की कैलास पर्वतावर आकाश व धरती यांचे मिलन होते. असे देखील म्हटले जाते जर कैलास पर्वतावरील बर्फ विरघळा तर संपूर्ण जग पाण्यात बुडेल. कैलास पर्वतावर जेव्हा बर्फ विरघळतो तेव्हा  डमरूचा आवाज येतो. यामुळे कैलास पर्वतावर भगवान शिवजी राहतात असे मानले जाते.