Home » कोंबडी आधी का अंडे? अखेर सगळ्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले…
Infomatic

कोंबडी आधी का अंडे? अखेर सगळ्यांना बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले…

आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न ऐकला असेल की ‘कोंबडी आधी की अंडे’ हा प्रश्न विचारला की सगळेच गोंधळात पडायचे मात्र आता जर कोणी हा प्रश्न विचारला तर गोंधळून जाऊ नका कारण ब्रिटन मधील शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे आणि कोंबडीचं अगोदर हे स्पष्ट केले आहे.

ब्रिटनमधील शेफिल्ड आणि वारविक या विद्यापीठामधील शास्त्रज्ञ खूप दिवसापासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी संशोधन करत होते.अखेर त्यांनी याचा शोध लावला आहे आणि त्यांना या प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं.

या जगामध्ये अंड नाहीतर कोंबडीच अगोदर आली आहे असे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. या संशोधाना मधील प्रमुख डॉ कॉलिन फ्रिमन यांच्या म्हणण्यानुसार अंड्याच्या कवचात ‘ओव्होक्लिडन’ हे प्रोटीन असते आणि ते फक्त कोंबडीच्या गर्भाशयातच तयार होते.

त्यामुळेच या जगामध्ये प्रथम कोंबडी तयार झाली आणि तिच्या गर्भाशयामध्ये हे प्रथिन तयार झालं आणि त्यानंतर अंड्याच्या कवचापर्यंत हे प्रथिन आले.