Home » ‘या’ मंदिरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती होती अगदी ठणठणीत बरी, जाणून घ्या…!
Infomatic

‘या’ मंदिरात पॅरालिसिस झालेली व्यक्ती होती अगदी ठणठणीत बरी, जाणून घ्या…!

विज्ञान, तंत्रज्ञान शास्त्र यांच्या सोबत आरोग्य शास्त्र ही आधुनिक काळात खूप अत्याधुनिक सुविधा व‌ उपचारपद्धतींनी सुसज्ज आहे. मात्र आजही काही दूर्धर आजारांपासून पूर्ण मुक्त होणे हे दैवाच्या हाती आहे असे मानले जाते. अशा वेळी अंतिम आशा म्हणून ईश्वर चरणी नतमस्तक केले जाते. असाच एक आजार म्हणजे पक्षाघाताचा झटका किंवा पॅरालिसिस होय.

पक्षाघाताच्या रुग्णांना मालिश, वैद्यकीय उपचार देऊनही पूर्ववत होण्याची शक्यता नसते. मात्र राजस्थान मधील‌एका मंदिरात चक्क प्रदक्षिणा घालून हा आजार‌ सात दिवसांत बरा होतो अशी प्रचिती अनेकांना आली आहे. हे मंदिर म्हणजे राजस्थानातील देगाना तालुक्यातील बुटाती धाम होय. बुटाती धाम हे नागोरपासून जवळ अंतरावर आहे.

या बुटाती धाम मध्ये पक्षाघाताने ग्रस्त रूग्णांनी सात दिवस प्रदक्षिणा घातली असता हे रूग्ण ठणठणीत बरे झाल्याचे स्थानिक व‌काही रूग्णांनी सांगितले आहे‌. यामागे पूर्णपणे श्रद्धा व विश्वासाचा पाया आहे कारण या चमत्काराला अजून‌ कोणतेही शास्त्रीय कारण मिळाले नाही.

बुटाती धाम मध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा न चुकता आरती केली जाते. या आरतीच्या वेळी रुग्णांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली असता त्यांचा आजार बरा होतो. यासाठी सकाळी आरतीच्या वेळी बाहेरील बाजूस प्रदक्षिणा घातली जाते व सायंकाळी आतील बाजूस प्रदक्षिणा घातली जाते. याठिकाणी संपूर्ण देशभरातून रूग्ण येतात. या परिसरात सात दिवस त्यांची राहण्याची व भोजनाची सोय मोफत केली जाते.

फुटांची धाम येथे मूलतः संत चतूरदास यांचे मंदिर होते. काही शतकांपूर्वी संत चतूरदास यांचे या ठिकाणी वास्तव्यास होते. ते बालब्रम्हचारी होते. हिमालयात तपस्या करण्यासाठी त्यांनी आपल्या श्रीमंती आयुष्याचा त्याग केला होता. तपस्या पुर्ण केल्यानंतर याठिकाणी येऊन त्यांनी प्रणिमात्रांसोबत रुग्णांची ही सेवा केली व आजही त्यांच्या पुण्याची प्रचिती येते येते.

याठिकाणी केल्या जाणा-या स्वप्नातील उदीला औषधी मानले जाते व ही उदी पक्षाघात झालेल्या व्यक्तीला लावली असता शरीरामध्ये चैतन्य येते असे मानले जाते. विज्ञान युगात प्रत्येक घटना तर्क व पुराव्यांच्या शास्त्र निष्ठ कसोटीवर सिद्ध केली जाते त्यामुळे फुटांची धाम मधील चमत्कार हा वैयक्तिक अनुभव व श्रद्धेवर आधारित ठरतो.