Home » स्त्रियांपेक्षा पुरुषांना लवकर टक्कल का पडते? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण…!
Infomatic

स्त्रियांपेक्षा पुरुषांना लवकर टक्कल का पडते? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण…!

स्त्री व पुरुष या दोघांची शारीरिक रचना ही भिन्न असते त्यामुळे या दोहोंच्या आरोग्यविषयक समस्याही भिन्न असतात. स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक समस्यांची तीव्रता व त्यावरील उपाययोजना ही भिन्न असते. जसे की केस गळण्याची समस्या होय. केस हे आपल्या व्यक्तिमत्वाला उभारी देणारा प्रमुख घटक असतो.

यामळेच केस गळण्याची सुरूवात झाली की स्त्री व पुरुष दोघेही चिंतित होता. मात्र केस जास्त प्रमाणात गळुन अकाली टक्कल निर्माण होण्याची समस्या स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असते. यामागची कारणे शोधून काढण्यासाठी अनेक संशोधन केली गेली व यांपैकी काही महत्त्वपूर्ण कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. केसांचे आरोग्य हे शरीरातील हार्मोन्सच्या समतोलावर अवलंबून असते. पुरुषांमध्ये असलेल्या डायटेस्टोस्टेरॉन हार्मोन्समुळे केस गळण्याची समस्या पुरुषांमध्ये निर्माण होते. हे हार्मोन पुरूषांमध्ये पौगंडावस्थेत अधिक सक्रिय असते. हे हार्मोन स्त्रियांमध्ये अल्प प्रमाणात असते मात्र यामुळे स्त्रियांमध्ये केस गळणे ही समस्या निर्माण होत नाही. काही वेळा स्त्रियांमध्ये स्तनपान करण्याच्या कालावधीत ह्या संप्रेरकामुळे केस गळू शकतात. मात्र नंतर ही समस्या दूर केली जाऊ शकते.
  2. एखाद्या आजारपणात शरीरातील प्रतिकारशक्ती आजाराचा सामना करण्याऐवजी शरीरातील पेशींवर हल्ला करते व यामध्ये केसांच्या पेशींना सर्वात जास्त हानी पोहचून टक्कल पडते. गुप्तरोग, एड्स, यांसारखे आजार असलेल्या पुरुषांमध्ये अकाली टक्कल पडते.