Home » विंचवाची पिल्ले जन्म झाल्यावर आपल्या आईला मारुन टाकतात हे सत्य आहे का,जाणून घ्या…
Infomatic

विंचवाची पिल्ले जन्म झाल्यावर आपल्या आईला मारुन टाकतात हे सत्य आहे का,जाणून घ्या…

भूतलावर मनुष्य प्राण्याव्यतिरिक्त अन्य जीवसृष्टी सुद्धा अस्तित्वात आहे.जीवसृष्टी ही सूक्ष्म जीवजंतू पासून ते बलाढ्य प्राण्यांनी व्यापलेली आहे. या जीवसृष्टीच्या कार्यरत राहण्यासाठी जीवसृष्टी ही निसर्गाच्या नियमांच्या आधारे चालू राहते. प्रत्येक जिवाचे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध प्रकारच्या क्रिया चालू असतात.काही जीवांच्या जीवनचक्रातील काही क्रिया या अगदीच आकलना पलीकडच्या असतात.

आपल्या सर्वांना विंचवांबद्दल काय माहित आहे विंचू डंक मारतो एवढेच ना ? लहान पानापासून आपल्याला सांगितले जाते कि विंचू हा खूप विषारी प्राणी आहे.तसेच विंचू हा जीव डंख मारण्यासाठी आणि आपल्या विषारीपणा साठी ओळखला जातो.निसर्गामध्ये टिकून राहण्यासाठी विंचू डंख मारतो.विंचवाचा डंख वेदनादायी असतो.विंचवाच्या अनेक प्रजाती संपूर्ण जगभरात आढळून येतात. विंचवाची काही सर्वसाधारण वैशिष्ट्ये खूपच अनाकलनीय असतात. यामध्ये असे आढळून येते की विंचवाच्या मादीने पिलांना जन्म दिल्यावर काही दिवसांनी ती पिल्ले मादीला खाऊन टाकतात.

या निरीक्षणामध्ये कितपत तथ्य आहे व या मागची कारणं काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत… 

१) काही निरीक्षणामध्ये असे आढळून आले आहे की विंचवाच्या मादीने पिलांना जन्म दिला की मादी आपल्या पिल्लांना खाऊ शकते.या मागचे कारण म्हणजे जेव्हा विंचवाच्या मादीला पिल्लांना जन्म दिल्यानंतर खाण्यासाठी बाहेरील वातावरणात कोणत्याही प्रकारचे किडे किंवा अन्य खाद्य मिळत नाही तेव्हा जिवंत राहण्यासाठी ती आपल्या पिल्लांना खाऊ शकते.

२) अन्य निरीक्षणामध्ये असे आढळून आले आहे की विंचवाची मादी ही स्वतः आपल्या पिल्लांचे ही भक्ष्य बनू शकते याला कारण म्हणजे विंचवाच्या मादीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर पिल्लं थोडी मोठी होतात तेव्हा त्यांना आपल्या शरीरातील स्त्राव ही माझी सेवन करू देते व त्या वेळी या पिल्लांच्या अंगातील विष मादीच्या शरीरात जाते व वेळप्रसंगी तिचा मृत्यू होतो. विंचवाची पिल्लू आपल्या मृत मातेचे  शरीर काही दिवस जतन करून आपले अन्न म्हणून वापरतात.

३) विंचवाच्या मादीने पिल्लांना जन्म दिल्या बरोबर ते आपल्या आईच्या पाठिला चिकटतात व त्यांचे अन्न हे त्यांच्या आईचे शरीराच असते. विंचवाची पिल्ले आपल्या मातेच्या शरीराचे तोपर्यंत भक्षण करत राहतात जोपर्यंत त्या  वरील सर्व मांस संपत नाही. एकदा का तिच्या शरीरावरील सर्व मांस संपले की ती पिल्लं त्या भागावरुन खाली उतरतात व आपले स्वतंत्र जीवन जगण्यास सुरुवात करतात.