या ५ गोष्टी बुद्धिमान माणसाने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत

0
1271
chanakya niti - Being Maharashtrian
chanakya niti - Being Maharashtrian

नमस्कार मित्रांनो आजचे युग हे कलियुग आहे आणि या कलियुगात जर तुम्ही साधेपणाने आणि मोकळेपणाने वागू लागला तर तुमचा फायदा उचलणारे या जगात टप्प्याटप्प्यावर पदोपदी तुम्हाला भेटतील हे लोक तुमचा अचूक फायदा उचलून तुमचं नुकसान कसं करायचं तुम्हाला डब्यात कसं घालायचं यासाठी तपून बसले आहेत.

Loading...

आणि म्हणून चाणाक्य नीती मध्ये चाणक्यांनी लोकांबरोबर कसं वागायला हवं समाजात कशाप्रकारे आपलं वागणं असायला हवं हे समजावून सांगितले चला तर पाहूया

Loading...

१) मूर्ख लोकांशी कधीही वाद घालू नका. चाणाक्य म्हणतात की मूर्ख लोक तुम्हाला भेटले आणि ते भेटतातच या जगात खूप सारे मूर्ख आहेत ही दुनिया मूर्खांनी भरलेली आहे तर असे मूर्ख लोक तुम्हाला भेटले तर त्यांच्याशी वाद घालू नका कारण त्यांना जर तुम्ही समजावून सांगायला गेले तर हे लोक तुमचं अजिबात ऐकत नाहीत उलट त्या लोकांना तेच ऐकायचं असत जे त्यांना ऐकावसं वाटतं आणि म्हणून यांच्याशी वाद घालू नका.

Loading...

तुमचा अनमोल वेळ वाया घालवतील आणि तुमच्या मनातील सकारात्मक गोष्टी काढून टाकून तुमच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टींच जाळं पेरतील असे लोक भेटलीचं तर यांचं एका कानाने ऐकावे आणि दुसऱ्या कानाने लगेच सोडून द्या मित्रांनो यांच्याशी वाद घातल्याने एकतर ह्या लोकांबरोबर आपले संबंध खराब होतात हे लोक दहा ठिकाणी आपली बदनामी करतात आणि म्हणून हा अतिशय चांगला मार्ग यांच्याशी वाद घालू नये.

Loading...

२) दुसरी गोष्ट स्वतःची कमजोरी कधीही कुणालाही सांगू नका बरेच काही लोक आपले मित्र बनतात आपल्या खूप जवळ येतात मग अशा लोकांना आपण आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो सांगतो मित्रांनो कोणताही मित्र हा सदासर्वकाळ मित्र राहत नसतो तुम्ही शालेय जीवनाच्या शाळेत होता त्यावेळी तुमचे असणारी मित्र आहेत का ? तुम्ही कॉलेजला होता त्यावेळची मित्र आहेत का ? अहो ते जाऊद्या उद्या दोन वर्षांपूर्वी अगदी जवळचे मित्र होते ते आज राहिलेत का ? कधी कधी तर बरेचशे आपले मित्र सुद्धा आपले शत्रू बनतात.

३) तिसरी गोष्ट मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात तसेच काही दोष सुद्धा असतात आपल्या मध्ये सुद्धा काही दोष असतात तर हे लक्षात घ्या की लोकांना तुमच्यातील गुणांचा काही हि देण घेणं नसतं ते तुमचे दोष पाहण्यासाठी टपून बसलेले असतात त्यामुळे जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट करत असाल तुम्ही एखाद्या शाळेला किंवा एखाद्या अनाथाश्रमा ला दान करत असाल तर हे दान अश्या प्रकारे करा कि ते एका हाताने दुसऱ्या हाताला पण कळता कामा नये.

तर अशाप्रकारे गुप्तदान तुम्ही करा कोणत्याही गोष्टीत गुप्त ता ठेवा कारण एखादी गोष्ट करताना जर त्यामुळे काही चूक झाली तर त्या एका चुकी मुळे तुमच्या सर्व पुण्याई वरती पाणी करून

४) चौथी गोष्ट तुमच्याकडे आज जो पैसा आहे हा पैसा अगदी विचार करुन खर्च करा शक्यतो पैसा जास्तीत जास्त गुंतवा कारण आज तुम्हाला काळ अनुकूल आहे आज वेळ तुमच्या बाजूने आहे पण हि वेळ कायम तुमच्या बाजूने राहील तसं नाही कदाचित काही वर्षांनंतर तुम्हाला प्रतिकूल काळ येईल त्यावेळी तुमच्याकडे पैसा राहणार नाही त्यावेळी आज गुंतवणूक केलेला पैसा तुमच्या उपयोगी येणार आहे. पैसा आहे तोपर्यंत तोपर्यंत लोक तुमच्याकडे येणार आहेत नाहीतर तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाही. त्यामुळे पैसा विचार करून खर्च करा.

५) शेवटची गोष्ट जे लोक तुमचे ऐकत नाहीत अशा लोकांवर विश्वास ठेवू नका कारण जो तुमचं म्हणणंच व्यवस्थित ऐकत नाही तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन तुमची बदनामी करायला तुमच्याविषयी काही पण लोकांना सांगणार तुमचे काही सिक्रेट्स असतील ते हि बाहेर शेअर करणार. त्यामुळे तुम्ही लोकं ओळखायला शिका.

Loading...